बॉलिवूडची अभिनेत्री नेहा धुपिया म्हणाली की, मला पहिलं बाळ झाल्यानंतर चित्रपटात काम मिळत नव्हतं. आत्ता ती पोडकास्ट शो ‘नो फिल्टर नेहा’ चा सीझन 4 होस्ट करत असल्याने चर्चेत आहे. गेल्या वर्षी नेहा धुपियाने मुलगी मेहरला जन्म दिला. तिचे म्हणणे आहे कि, तिने मुलगी मेहरला जन्म दिला तेव्हा पासून तिला काम मिळणे बंद झाले. नेहा धुपियाच्या या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. नेहा धुपियाने आत्ताच एका इंग्लिश वेबसाइट पिंकविला ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आपल्या वैयक्तिक जीवनावर तसेच चित्रपटसृष्टी विषयी खूप काही सांगितले. नेहा धुपिया म्हणाली कि, आपण जेव्हा आई बनतो आणि बाळाला जन्म देतो तेव्हा लोकांच्या मनात एक प्रकारची आशंका निर्माण होते. प्रेग्नेंसी अगोदरचा माझा चित्रपट ‘तुम्हारी सुलु’ हा होता. ह्या चित्रपटासाठी मला पुरस्कार मिळाला, असे असून सुद्दा प्रेग्नेंसी नंतर मला काम मिळू नये, हि केवढी शरमेची गोष्ट आहे.
नेहा धुपिया पुढे म्हणाली, बाळाला जन्म दिल्या नंतर मला चित्रपट मिळत नाही. म्हणून मी आता वेब सिरीजसाठी प्रयत्न करतेय. पाहूया ,काय होतेय. माझं मानणे आहे कि, आत्ताच्या काळात आपण वाट पहात थांबू शकत नाहीत. आज आपल्या जवळ प्लॅटफॉर्म आहे. ‘बॉडी शेमिंग ‘वर बोलताना नेहा धुपिया म्हणाली, माझ्या ‘प्रेग्नन्सी वेळेत मला असुरक्षित अशी कोणतीही भावना नव्हती. परंतु बाळाच्या जन्मा नंतर शरीराच्या आकारामुळे या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो. मी हे नाही म्हणत कि, वजन कमी करण्याची अवश्यकता आहे, म्हणून फिटनेस बद्दल प्रत्येकाची एक परिभाषा असते.’ आपलं बोलणे संपवताना ती म्हणाली, ‘मला एका महीला पत्रकारने माझ्या वजन वाढण्यावर काही वाईट साईट लिहिले होते, आणि मला सर्वांनी निशाणा केला होता. कोणत्याही नवीन आई विषयी असं वाईट साईट बोलणे कितपत योग्य आहे. दुसऱ्याच्या वजन वाढीवर बोलणे आणि त्यावर निशाणा धरणे तितकेसे बरोबर नाही. सोशल मीडियावर नेहा धुपियाच्या या विधानाची खूप चर्चा सुरु आहे.
नेहा धुपिया आणि अंगद बेदी ची मुलगी मेहर आत्ता 1 वर्षाची झाली. ती 1 वर्षांची झाली म्हणून नेहा आणि अंगद आपली मुलगी मेहर बरोबर अमृतसरला गेले. तिथे सुवर्ण मंदिरात जाऊन आपलं डोकं टेकलं. नेहा आणि अंगदने सोशल मीडियावर आपल्या मुली सोबतचे फोटो शेअर केले. मेहरच्या पहिल्या वाढदिवशी पोस्ट करताना लिहिले, ‘हैप्पी फर्स्ट बर्थडे हमारी छोटीसी परी’ म्हणजे जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ‘माझी छोटी परी, माझे मन प्रेमाने भरून आले आहे. मला नाही माहिती मी तुला जीवनात काय दिले पण हा नक्कीच तुझ्या आगमनाने मला एक गिफ्ट मिळाले असे मला वाटते. आई बनण्याचे सुख मेहर मुळे मला मिळाले. नेहा धुपिया आणि अंगद बेदी विवाह बंधानात अडकले तो दिवस होता 10 मे 2018 , वाईट याच गोष्टीचं वाटते की, नेहाने अक्षय कुमार बरोबर ‘द सिंग इज किंग’, अजय देवगण बरोबर ‘कयामत’ सारखे सुपरहिट चित्रपट देऊनही आज तिला चित्रपटात काम मिळत नाही याची खंत वाटते.