आत्ता पर्यंत मराठी गप्पावर अनेक डान्स वायरल व्हिडियोज विषयी तुम्ही वाचलं आहेत. त्या डान्स विषयी वाचून तुम्हाला काय वाटलं? नक्कीच आनंद झाला असेल. स्वतः सुद्धा थोडा डान्स करावा, असं वाटलं असेल. कारण गाणं आणि डान्स या दोन कला अशा आहेत ज्या इतरांना सादर करताना बघून आपणही त्याचा भाग व्हावा, असं वाटतं. पण आजच्या या लेखातून आपण अशा वायरल व्हिडियो विषयी जाणून घेणार आहोत ज्यातून आपल्याला आनंद तर मिळेलच सोबत स्फूर्ती ही मिळेल. तर असं काय विशेष आहे या वायरल व्हिडियो मध्ये? हा वायरल व्हिडियो आहे पुण्यात भरवल्या गेलेल्या हाफ मॅरेथॉन २०१८ चा. यातील एका स्पर्धकाने केलेल्या डान्स चा. बरं हा स्पर्धक ही साधा सुधा स्पर्धक नव्हे. जावेद चौधरी असं नाव असलेला स्पर्धक दि’व्यांग आहे. महाविद्यालयात असताना झालेल्या एका अपघा’तात त्याला आपला उजवा पाय गमवावा लागला होता.
पण म्हणून तो थांबला का? तर नाही. त्याचं आयुष्य पूर्वी पेक्षा अजून प्रखरतेने आणि तेवढ्याच जास्त जोमाने जगू लागला. अहो जावेद काय नाही करत? तो उत्तम स्विमिंग करतो, डान्स करतो, गिटार वाजवतो. एवढंच काय तर व्हीलचेअर बास्केटबॉल च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने भारतीय संघातून आपला बहारदार खेळ दाखवलेला आहे. तसेच ‘चौधरी का आखाडा’ या जिम मध्ये तो अनेक व्यायामप्रकार करत असतो, शिकवत असतो. एवढं सगळं जसं तो करतो, तसंच त्याने एका रियालिटी शो मध्येही भाग घेतला होता. यावरून जावेदचं अष्टपैलू व्यक्तिमत्व दिसून येतं. अपघा’तात पाय गमवावा लागला असूनही त्याची जिद्द मात्र या अपघा’तात त्याने गमावली नाही. आलेल्या प्रसंगाला सामोरं जात,आज त्याने इतकी उत्तुंग झेप घेतली आहे की आपल्या पैकी अनेकांना तो जगत असलेलं आयुष्य म्हणजे स्वप्नवत वाटावं. त्याच्या विजेत्याची असलेली मानसिकता आणि आयुष्याचा आनंद घेण्याची वृत्ती यांमुळे हा व्हिडियो विशेष बनतो.
कारण या व्हिडियोतून ह्या दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा जावेद, इतर स्पर्धक आणि संयोजन करणारी टीम एकत्र गोळा झालेली दिसून येते. अर्थात हाफ मॅरेथॉन संपवून हे सगळे एकत्र झाल्याचं कळत असतं. या प्रसंगी मग आपल्या सगळ्यांचं आवडतं गाणं वाजायला लागतं. होय, सैराट मधील झिंगाट. मग काय जावेद आणि बाकीचे उपस्थित नाचायला लागतात. कॅमेऱ्यामागील व्यक्तीही जावेदला प्रोत्साहन देत असतात. जावेद अगदी तुफान नाचतात. बाकीचे त्यांच्या प्रमाणेच डान्स करण्याचा प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे जावेद अगदी सिनेमातल्याप्रमाणे डान्स स्टेप्स करताना दिसतात. त्यामुळे डान्सची शोभा अजूनच वाढते. तसेच डान्स ची असलेली सवय आणि आवड दोन्हीही यातून दिसून येतात. केवळ काही सेकंदांचा हा व्हिडियो आपल्याला आनंद देऊन जातो. जेव्हा हा व्हिडियो आपण जावेद यांच्याविषयी माहिती नसताना बघतो तेव्हा त्यातून आंनद वाटतो आणि त्यांचं कौतुकही. पण जेव्हा आपण जावेद यांच्या विषयी अजून जाणून घेतो तेव्हा या कौतुकाची मात्रा दुप्पट होते.
आपल्या आयुष्यात एक मोठा अपघात होऊन ही हार न मानता जीवनाचा शंभर टक्के आनंद घेणाऱ्या या खेळाडू ला मराठी गप्पाच्या टिमकडून मानाचा मुजरा. तसेच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!! आपली टीम सदैव विविध विषयांवर लेखन करत असते. पण काही वेळेस समोर येणारे विषय, वायरल व्हिडियोज अपेक्षेपलीकडे बरंच काही शिकवून जातात. एवढंच नव्हे तर आम्ही करत असलेल्या लेखनाचा अजून अभिमान वाटायला लागतो. कारण हे लेख हजारो लाखो वाचक वाचतात. काय कल्पना, यातील काही व्यक्तिमत्वांकडून तुम्हीही ऊर्जा घेत असाल आणि आपल्या आयुष्यात ती वापरत असाल आणि या साठी आम्ही लिहिलेले हे लेख म्हणजे एक माध्यम ठरत असेल. आपल्याला या लेखातून आनंद, स्फूर्ती, प्रोत्साहन आणि बरंच काही शिकायला मिळालं असेल अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा लेख नक्की शेअर करा. काय माहिती, कोणाला तरी नक्कीच याचा उपयोग होईल. आपल्या वेळेसाठी धन्यवाद आणि आपल्या टीमने लिहिलेले नवनवीन लेखही वाचत राहा.
बघा व्हिडीओ :