डान्स करणाऱ्यांचे व्हिडियोज वायरल होतात यात काही नवीन नाही. पण या प्रत्येक व्हिडियोतून काही ना काही नवीन बघायला मिळतं हे नक्की. याच नाविन्याची ओढ, डान्स प्रेमींना लागून राहिलेली असते. कारण डान्स सादर करण्याच्या स्टाईल्स बऱ्याच आहेत. पण प्रत्येक स्टाईलचा कल्पकतेने वापर करत वेगवेगळे डान्स केले जातात त्यात खरी मजा येते. अशीच धमाल मजा आमच्या टीमला अनुभवता आली ती एका व्हिडियो मधून. जवळपास वर्षभरापूर्वी हा व्हिडियो अपलोड केला गेलेला आहे. आजतागायत या व्हिडियोला जवळपास १६ लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. यावरून हा व्हिडियो किती मनोरंजक असावा याची कल्पना यावी.
हा व्हिडियो म्हणजे एका मेडिकल कॉलेज येथील नवीन मुलांच्या फ्रेशर्स पार्टीचा एक भाग आहे. गांधीनगर पाटण येथील जी.एम.ई. आर. एस. मेडिकल कॉलेज मध्ये काही वर्षांपूर्वी फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आलेली होती. यात मंथन गडरा या विद्यार्थ्याने केलेला डान्स खूप भाव खाऊन गेला होता. पुढे मंथन याने जेव्हा स्वतःचं युट्युब चॅनेल सुरू केलं तेव्हा हा डान्स युट्युबवर पण वर उल्लेख केल्याप्रमाणे लोकप्रिय ठरला. या डान्स परफॉर्मन्स मध्ये मंथन आपल्याला चार लोकप्रिय गाण्यांवर डान्स करताना दिसून येतो.
यात सुरुवात होते ती लुका छुपी चित्रपटातील ‘कोका कोला’ या गाण्याने. युट्युबवर १४ करोडहून अधिकांनी पाहिलेलं हे गाणं लोकप्रिय आहे यात शंका नाही. त्यामुळे या गाण्यावर उत्तम डान्स करून परफॉर्मन्स ची एक झकास सुरुवात करण्यात मंथनला यश येतं. गाणं सुरू झाल्यापासून पहिल्या वीस सेकंदात आपल्याला कळतं की हा परफॉर्मन्स मस्त होणार आहे. कारण मंथन गाण्यावर करत असलेल्या स्टेप्स अगदी सहजतेने साकारत असतो. डान्स करणारा आत्मविश्वासपूर्ण नाचत असेल तर मग बघणाऱ्यालाही मजा येते. परफॉर्मन्सची धमाल सुरुवात झाल्यावर दुसरं गाणं वाजायला लागतं. अझर चित्रपटातलं ‘बोल दो ना जरा’ हे ते गाणं. यातल्या संगीतावर त्याची पावलं अशी काही थिरकतात की उपस्थित मुलं मुली त्याला आपसूक टाळ्या शिट्ट्यांनी प्रतिसाद देतात. मग तिसरं गाणं सुरू होतं. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या एम.एस. धोनी चित्रपटातील ‘कौन तुझसे प्यार करेगा, जैसे मैं करता हुं’ हे ते गाणं. या गाण्यावर अगदी आर्ततेने परफॉर्मन्स दिलेला आपल्याला दिसून येतो.
या गाण्यातील ‘हवा के जैसे’ या कडव्यावरची केलेली स्टेप तर अफलातून. ती स्टेप खऱ्या अर्थाने सगळ्यांत जास्त भाव खाऊन जाते. ही दोन गाणी काहीशी शांत म्युझिकची. पण शेवटचं गाणं मात्र उडत्या चालीचं असतं. यो यो हनी सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं ‘उर्वशी’ हे ते गाणं. मूळ गाण्यात आपल्याला शाहिद कपूर आणि किआरा आडवाणी डान्स करताना दिसले होते. या तडकत्या फडक्त्या गाण्यावर मंथनचा डान्स ही त्याला साजेसा होतो. या गाण्यावरच्या सादरीकरणात सगळ्यांत जास्त लक्षात राहतं ते त्याचं दमदार पदलालित्य.
जवळपास सवा चार मिनिटांचा हा व्हिडियो. पण मंथन याच्या डान्स मुळे वेळ कसा जातो ते कळत नाही. ज्यांना डान्स आवडतो किंवा आवडत नाही ते ही अगदी आवडीने हा व्हिडियो दुसऱ्यांदा बघतात. आपणही हा व्हिडियो पाहिला असेलच आणि आपल्याला तो आवडला असेलच. या व्हिडियोसोबतच आपल्या मराठी गप्पाच्या टीमने यावर लिहिलेला लेखही आपल्याला पसंत पडला असेल. तेव्हा नेहमीप्रमाणे हा लेखही नक्की शेअर करा. आपला एक एक शेअर आम्हाला प्रोत्साहन देऊन जातो. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन देणं सतत चालू असू द्या. लोभ असावा. धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :