Breaking News
Home / मनोरंजन / मेव्हणीने नवरदेवाला लग्नामध्ये दिलेले हे अतरंगी गिफ्ट पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

मेव्हणीने नवरदेवाला लग्नामध्ये दिलेले हे अतरंगी गिफ्ट पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

सध्या आमची टीम अगदी तारेवरची कसरत करण्यात व्यस्त आहे. म्हणजे आपलं नेहमीचं लिखाण व्यवस्थित चालू आहे. पण तुम्हालाही माहिती आहेच. लग्नाचा काळ म्हंटला की धावपळ ही आलीच. त्यात यंदा बरीचशी लग्न ही ऐन आठड्याच्या मधल्या दिवसांमध्ये आहेत. त्यामुळे आपापली काम सांभाळून मित्र मैत्रिणींच्या लग्नात जाणं म्हणजे तारेवरची कसरतच असते. तुम्हीही याच काळातून सध्या जात असालच त्यामुळे तुम्ही हे समजून घेऊ शकता.

पण अस असलं तरी जमेल तेव्हा लग्न समारंभाला जाणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं. अगदी नाही म्हंटलं तरी लग्नाला जायला आणि तिथून यायला दगदग ही होतेच ही बाब खरी. पण असं असलं तरी लग्नाचा जो माहोल असतो ना त्याची गंमतच न्यारी असते की आपण आपसूक लग्नसमारंभ असला की जातोच. त्यात एवढ्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात की काही विचारू नका. लग्न मंडपात दाखल झाल्यापासून ते निघेपर्यंत एकेक किस्सेच घडत असतात. त्यात तुमची मित्रमंडळी, आपल्या टीमसारखी अतरंगी असतील तर मजाच मजा. आणि गंमत म्हणजे अतरंगी लोकांच्या बाबतीतच किस्से घडत असतात.

नसतील घडत तर ही अतरंगी मंडळी हे किस्से घडवत असतात. यासाठी त्यांना योग्य संधी हवी असते. काही वेळेस त्यांना ही संधी मिळते पण काही वेळेस बरीच गडबड असते. तेव्हा काही जमत नाही. पण अस असलं तरी एक क्षण असा येतो जो या गंमत्या मित्रांना नामी संधी देऊन जातो. ही नामी संधी म्हणजे नवरदेवाला आहेर देत असतानाचे क्षण. एरवी आहेर आणू नका असं सहसा लग्नपत्रिकेत लिहिलेलं असतं. पण तरीही धमाल मस्ती करायची म्हणून मित्रमंडळी गिफ्ट्स घेऊन हजर होतातच. त्यामुळे एरवी खातापिताना कॉन्ट्रीसाठी खिशातून पैसे न काढणाऱ्या मित्रांच्या हातातली गिफ्ट्स बघून नवरदेवाला जो काही घाम फुटतो की ते बघून हसायलाच येतं. त्याला कळलेलं असतं आता काही खरं नाही. काही वेळा हीच भूमिका आपल्या मेव्हण्या पण अदा करतात. त्यांना सुद्धा होणाऱ्या जिजूंची मस्करी करण्याची ही एक नामी संधी असते. एकूणच काय तर धमाल असते. याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला असण्याची शक्यता आहे. जरी नसेल घेतला तरी हरकत नाही. आज आपल्या टीमने बघितलेला व्हिडियो एकदा बघा. तुम्हाला या गंमतीचा अंदाज येईल. या व्हिडियोत आपल्याला नवरा नवरी दिसून येतात. एव्हाना ते त्यांच्या सिंहासनावर बसलेले असतात. एवढ्यात नवरदेवाच्या हातात एक गिफ्ट दिलं जातं. नवरदेव हुशार असतो. त्याला चट्कन कळतं यात काही तरी मस्ती केलेली असणार. पण आजूबाजूच्यांचा ओढा आणि खुद्द नवरीचं प्रोत्साहन यांमुळे ते समोर असलेलं गिफ्ट उघडून बघायला लागतात.

पण एवढ्या सहजासहजी गिफ्ट देतील ते मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक कसले. त्यामुळे नवरदेवाच्या संयमाची परीक्षाच असते. पण हा सगळा व्हिडियो मात्र आपल्यासाठी धमाल ठरतो. खासकरून यातले संवाद ऐकून मजा येते. त्यात नवरदेवाच्या मेव्हण्या आणि मित्र यांत एकत्र सामील असल्यासारखे वाटतात. त्यामुळे अतरंगी पार्टी दुप्पट असते. म्हंटल्यावर मजा ही हमखास असते. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला याची खात्री पटेल. किंबहुना आपण हा व्हिडियो अगदी आनंदाने बघितला असेल. पण ज्यांनी हा व्हिडियो बघितला नसेल त्यांनी जरूर बघा. चुरचुरीत संवाद आणि एक अतरंगी गिफ्ट यांमुळे हा व्हिडियो थोड्या वेळात खुप धमाल आनंद देऊन जातो. तेव्हा वेळ मिळेल तेव्ह जरूर बघा. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.