Breaking News
Home / मनोरंजन / मैत्री असावी तर अशी, एक कासव खाली उलटे पडले असताना दुसऱ्या कासवाने का’य केले बघा व्हिडीओ

मैत्री असावी तर अशी, एक कासव खाली उलटे पडले असताना दुसऱ्या कासवाने का’य केले बघा व्हिडीओ

मनुष्य हा समूहात राहणारा प्राणी. त्यामुळे कुटुंब, समाज, देश या संकल्पनांना आकार आणि अर्थ मिळतो. या संकल्पनांतून अनेक नाती तयार होत असतात. यातीलच एक नातं म्हणजे मैत्रीचं. रक्तामासांच नसलेलं तरीही वेळप्रसंगी धावून जाणारं, आपली काळजी घेणारं, आपल्याला वेळप्रसंगी हक्काने ओरडणारं. अर्थात आपणही या सगळ्या गोष्टी आपल्या मैत्रिखातर करतो. खासकरून जेव्हा समोरच्या मित्राला मदतीची गरज असते. बरं ही मैत्रीची भावना केवळ मनुष्यात असते असं नाही तर प्राण्यांमध्येही असतेच. अनेक वेळेस डॉक्युमेंटरीज मधून आपण प्राण्यांचा मैत्रीविषयी पाहत असतोच. त्यात भर घालायला आता सोशल मीडिया आहेच.

विविध व्हिडियोजमार्फत आपण अनेक प्राण्यांचे मैत्री दर्शवणारे व्हिडियोज पाहतोच. असाच एक व्हिडियो आमच्या पाहण्यात आला. या वायरल व्हिडिओत आपल्याला दोन कासवं दिसतात. पण एक कासव महाशय सरळ उभे आहेत तर दुसरे आपल्या कवाचवर पालथे पडले आहेत, असं प्रथमदर्शनी दिसतं. एकाच प्रजातीतील ही कासवं. आपल्या पालथ्या पडलेल्या मित्र कासवाला सरळ उभा करण्यासाठी पहिलं कासव अगदी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करत असतं. त्यात काही वेळेस ते उपडी कासव इकडे तिकडे जातं. या उपडी कासवाचे संपूर्ण शरीर या काळात त्याच्या कवचात असते. इथून नीट उभं राहणारं कासव प्रयत्नशील असतं. सरतेशेवटी त्याच्या प्रयत्नांना यश मिळतं. उपडं पडलेलं कासव एका कुशीवर कलंडतं. तेवढयात पहिलं कासव काही वेळ स्तब्ध उभं राहतं. जणू काही श्वासोच्छ्वास नियमित करण्यासाठी उभं असावं. एखाद्या सिनेमातला क्लायमॅक्स चा सिन वाटावा असा हा क्षण. एखाद्या चित्रपटात नाही का अखेरच्या क्षणी काय होणार, याची आपल्याला कल्पना येते तरीही तो सिन पूर्ण होत असताना आपल्याला आनंद होतोच.

आपलं ही काहीसं होतं. नीट उभं असलेलं कासव एक जोरकस धक्का मारून आपल्या मित्राला सरळ करतं. म्हणजे बघा आपल्या मित्राला बोलीभाषेत लाईनवर आणणे, हे केवळ माणसातच नाही तर प्राण्यांमध्येही घडताना दिसतं. गंमतीचा भाग सोडला तरी आपणही आपल्या नकळत त्या कासवाची उपड्या अवस्थेतून सुटका झाली, याचा क्षणभर आनंद मानतो. आपल्याला हा लेख आवडला असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि याची मजा घ्या. मराठी गप्पाच्या टीमने अशाच अनेक वायरल व्हिडियोजवर लेख लिहिले आहेत. आपल्याला ते वाचायचे असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शन चा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च करा, आपल्याला विविध लेख वाचायला मिळतील.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *