Breaking News
Home / जरा हटके / मैत्री असावी तर अशी, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल, बघा व्हिडीओ

मैत्री असावी तर अशी, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल, बघा व्हिडीओ

असं म्हणतात की आपले मित्र मैत्रिणी म्हणजे आपण स्वतः निवडलेला एक दुसरा परिवारच. संकटसमयी आपल्याला जसे आपल्या घरचे आठवतात तसेच आपला मित्र परिवार सुद्धा. त्यांनाही त्यांच्या प्रसंगी आपली आठवण होतेच. हा भाग वेगळा की अशा अडल्या नडल्या वेळेस ‘खरे’ मित्र कोण हे सुद्धा कळतं. पण एक गोष्ट आपण सगळे मान्य कराल, की हे खरे आणि वेळप्रसंगी पाठीशी उभे राहणारे मित्र कोण हे वेळीच कळलं तर आयुष्य सोप्पं होऊन जातं. आपणही अनेक वेळेस ही खऱ्या आणि सच्चा मित्राची भूमिका बजावत असतो. ती ही अगदी मनापासून. कोणत्याही अभिनिवेशाविना. अशाच दोन सच्चा मित्रांचा एक वायरल व्हिडियो आमच्या टीमने काही काळापूर्वी पाहिला. केवळ २९ सेकंदात या व्हिडियोत असलेली या सच्चा मित्रांची मैत्री किती गहिरी आहे याचा प्रत्यय येण्यास पुरेशी होती.

हा व्हिडीओ दक्षिण भारतातील आहे एवढं लक्षात येतं. कोणी तरी सन्माननीय व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त जेवणाचं आयोजन केलेलं असतं. दोन शाळकरी मित्र एकमेकांच्या बाजूला बसून जेवत असतात. पण यात विशेष असं की एक मित्र दि’व्यांग असल्याने त्याचा दुसरा मित्र त्याला घास भरवत असतो. या व्हिडियोच्या सुरवातीलाच हे लक्षात येतं. आपल्या मित्राच्या ताटातील एक घास घेऊन हा शाळकरी मुलगा अगदी मायेने त्याला घास भरवत असतो. मग दुसरा घास भरवतो आणि मग स्वतः एक घास घेतो. पुढेही तसंच चालू राहतं. बरं घास भरावतानाही अगदी काळजीपूर्वक भरवतो. त्याच्या ह्या कृतीमुळे तो आपल्या मित्राची अगदी मायेने काळजी घेतो, हे दिसून येतं. बरं त्याला अजून जेवण वाढू का असं वाढपीने विचारलं असता हाताने नाही असंही दाखवतो. या लहान मुलास आपल्या मित्रासाठी एवढं करावंसं वाटलं यात त्याचा निरागसपणाही डोकावतो. एवढ्याश्या वयात कोणताही हा’वरटपणा न करता आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीने वागावं तसं आपल्या मित्राची काळजी घेणाऱ्या या लहानग्या मुलाचं कौतुकच आणि त्याच्या समंजसपणाचं तर विशेष कौतुक.

त्याने दाखवलेली खरी मैत्री दुर्मिळ असते खरी पण अजूनही कुठे तरी ती त्यांच्या मैत्रीच्या रूपाने जिवंत आहे, याचं समाधान वाटतं. या दोन्ही मित्रांच्या या सच्चा मैत्रीला आपल्या मराठी गप्पा टीमचा सलाम !!!

आपल्याला हा लेख इतर लेखांप्रमाणेच आवडला असणारंच. हा लेख आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. आणि खासकरून आपल्या ‘खऱ्या मित्रांना’ तर हा लेख पाठवाच. त्या निमित्ताने आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतील. आमच्या टीमने या वायरल व्हिडियोज सारख्या असंख्य वायरल व्हिडियोज वर लेख लिहिले आहेत. आपण ते लेखही वाचा. त्यासाठी आमच्या वे’बसाई’टवर असलेला स’र्च ऑप्शन वापरा. आपल्या सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *