Breaking News
Home / मनोरंजन / “मै तो मजाक मे रो रहा हू” ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, शिक्षिकेने स्वतः काढला हा अतरंगी व्हिडीओ

“मै तो मजाक मे रो रहा हू” ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, शिक्षिकेने स्वतः काढला हा अतरंगी व्हिडीओ

आजकालची पोरं काय काय करतील आणि काय नाही याचा नेम नाही. शाळेत पण शांत बसतील ती मुलं कसली. शिक्षकांना वैताग नाही दिला तर शाळा कसली. २१ व्या शतकातील शाळा डिजिटल झाल्या. पण त्याच सोबत अशा गमती जमतीही पाहायला मिळू लागल्या. अशीच गंमत या शाळेत झालेल्या एका मुलासोबत झाली. हा मुलगा रडत आहे, आता तो का रडतोय कशासाठी रडतोय अजून कळलेलं नाही… पण रडतोय ते कुणाला दाखवूनही द्यायचं नाहीये. पण बाई त्याच्यापेक्षाही हुश्शार आहेत. बाईंनी त्याचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. आता शूटींग सुरू झाल्यावर आपण गप्प बसाव की नाही. पण या पोराला गप्प बसवलं नाही. बाईनी व्हिडिओ सुरू करत काय झालं बाळा रडतो, असं डीवचत विचारलं. या मुलाला व्हिडिओ निघतोय हे कळलंही होतं. आजकालची मुलं तेवढ्या बाबतीत हुशार असतात. मी असंच मजाक म्हणून रडतोय असं उत्तर देत त्यानं डोळे पुसायचा प्रयत्न केला. पण कॅमेरा तर सगळं काही पकडतो त्याचे पाणावलेले डोळे दिसून येत होते.

काहीतरी बिनसलंय एवढा मात्र नक्की, पण तो काही बाईंना तो खरं काही सांगेना. बाई हट्टालाच पेटल्या. काय झालंय म्हणत त्याला आणखीन चिडवतात. व्हिडीओ काढून त्याला आणखी डिवचतात. म्हणून त्याने पुन्हा पुन्हा मी फक्त मस्करी तच रडतोय असं म्हणंत उत्तर देण्याचे टाळले. मात्र त्याचा हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला, की हा मुलगा काही मस्करी म्हणून रडत नाही एवढं मात्र कळलं. खरं काय ते शेवटपर्यंत त्याचं काय बिनसलं होतं ते कळलंच नाही. आत्ता काय झालं सगळ्यांच्या हातात मोबाईल, कोण आहे शाळेत ? तर प्रत्येक मुलाकडे ही मोबाईल आहे. मुलाकडे नसेल पण प्रत्येक शिक्षकांकडे तर असा मोबाईल आहे. त्यात दिवसभर विद्यार्थी काय टंगळमंगळ करतात काय करामती करतात, हे बाई टीपून घेतात. कधी शिक्षक खोलीत व्हिडीओ दाखवून खो खो हसतात. तर कधी मुलांच्या पालकांना दाखवण्यासाठी व्हाट्सअप वर सेंड करतात. बऱ्याचदा असे व्हिडिओ मुलांना भविष्यात त्यांचे बालपण जागं करायला कामी येऊ शकतात. काही पालकांना आठवणी मिळूनही ठेवून देतात. मुलं कायम आनंदी आणि बागडत खेळत असतील, असंच नाही. कधी कधी त्यांना हुंदकेही द्यावेसे वाटतात.

अशा वेळी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करावा, बऱ्याचदा होतं असं की काहीही छोटी कारण घेऊन ही मुलं रडत बसलेली असतांत, त्यांची अपेक्षाही छोटीच असते. अशावेळी त्यांना थोडीशी मदत करावी. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं. कदाचित त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य त्यांच्या बालपणातील सर्वात मोठी गोष्ट ठरू शकते. या एका गोष्टीमुळे आपण कायम त्या मुलाशी जोडले जातो. या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या क्लुप्त्या कल्पना करून सोडवाव्या लागतात.

व्हीडिओतील बाईंनी ज्या प्रकारे त्याचा व्हिडिओ काढला आहे आणि त्याच्याकडे लक्ष दिले त्यानुसार त्याचं नुसतं म्हणणं ऐकून घेतलं नसणार असणार तर त्याचं समाधानही केला असणार. पण बऱ्याचदा गडबड गोंधळात आपण अशा मुलांचा हिरमुसूनं बाजूला ठेवतो. शिक्षक किंवा आई-वडील कामाच्या गडबडीत मुलांचा रुसवा-फुगवा काढण्यास विसरून जातात. मुलं कशी कोमेजून झोपून दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेला जातात आणि पुन्हा काहीतरी नव्याने दुखावून परत झोपी जातात. तसं न करता त्यांच्याशी वारंवार बोलत राहा, त्यांच्या म्हणण्यानुसार गोष्टी करायला त्यांच्या कल्पनांना वाव द्यायला हवी. आता या मुलाने म्हटलेलं किती गमतीशीर आहे ना, त्याचा व्हिडिओ पाहून त्याला स्वतःला हसू येईल. त्याला या गोष्टी व्हिडिओ पाहून आपलं काय चुकलं हे समजेल, अशावेळी त्यांच्या पातळीवर जाऊन जगता आला पाहिजे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *