Breaking News
Home / बॉलीवुड / मोठे मोठे स्टार्स असूनदेखील ‘अंदाज अपना अपना’ चित्रपट ह्या गोष्टीमुळे फ्लॉप झाला होता

मोठे मोठे स्टार्स असूनदेखील ‘अंदाज अपना अपना’ चित्रपट ह्या गोष्टीमुळे फ्लॉप झाला होता

१९९४ साली आलेला ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाला आजच्या घडीला एक अस्सल कॉमेडी चित्रपट म्हटले जाते. जेव्हा पण हा चित्रपट टीव्हीवर येतो त्या चॅनेलचा टीआरपी टॉपवर येतो. टीव्हीवर हिट परंतु बॉक्स ऑफिसवर फ्लॉप. होय, जेव्हा अंदाज अपना अपना १९९४ ला नोव्हेंबर मध्ये रिलीज झाला होता, तेव्हा हा चित्रपट खूप वाईटरीत्या फ्लॉप झाला होता. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कि केव्हा ‘अंदाज अपना अपना’ चित्रपट बनवायला सुरुवात केली होती, का हा चित्रपट बॉक्सऑफिस वर फ्लॉप झाला, आणि कसा हा चित्रपट बनला बॉलिवूडचा अस्सल कॉमेडी चित्रपट. ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाची जेव्हा प्लॅनिंग चालू होती तेव्हा प्लॅनिंग पाहून वाटत होते कि हा चित्रपट सुपरडुपर हिट होणार. कारण हा चित्रपट बनवण्यासाठी हिट चित्रपटासाठी लागणारे सर्व फॉर्मुले वापरण्यात आले होते. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यावेळचे सुपरहिट दिग्दर्शक राजकुमार संतोषी करत होते. ज्यांनी त्याअगोदर ‘घायल’, ‘दामिनी’ ह्यासारखे सुपरहिट चित्रपट दिले होते. ह्या चित्रपटात अभिनय करणार होते सुपरस्टार आमिर खान आणि सलमान खान. आमिर खानने त्याअगोदर ‘दिल’, ‘कयामत से कयामत’ सारखे सुपरहिट चित्रपट केले होते. तर सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ चित्रपट नुकताच हिट झाला होता. ह्या चित्रपटात अभिनेत्री होती रविना टंडन. जिचा ‘पत्थर के फुल’ हा चित्रपट हिट झालेला होता. सोबत ह्या चित्रपटात होती बॉलिवूडच्या पहिल्या खानदानातली मुलगी करिश्मा कपूर. म्हणजेच मोठा दिग्दर्शक, मोठे मोठे अभिनेते अभिनेत्री, जगदीप आणि मेहमूद सारखे महान कॉमेडी कलाकार, सोबत गोविंदा आणि जुही चावला दोघांची पाहुण्या कलाकारांची भूमिका. परेश रावल ह्यांची दुहेरी भूमिका त्यातले तेजा कॅरॅक्टर, शक्ती कपूर उर्फ क्राईममास्तर गोगो, रॉबर्ट आणि भल्ला ह्यासारखे जबरदस्त कॅरेक्टर्स ह्या चित्रपटांत होते.

१९९१ मध्ये ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाची घोषणा झाली. तेव्हापासूनच ह्या चित्रपटातील स्टार कलाकार आणि दिग्दर्शकांमुळे हा चित्रपट चर्चेत होता. ह्या चित्रपटाच्या उदघाटन मुहूर्तावर धर्मेंद्र आणि सचिन तेंडुलकरसारखे आयकॉन आले होते. ह्या चित्रपटाला बनायला संपूर्ण ३ वर्षे लागली. हेच सर्वात पहिले कारण आहे हा चित्रपट फ्लॉप होण्याचे. ह्या चित्रपटाची शूटिंग १९९१ पासून सुरु झाली होती, परंतु हा चित्रपट रिलीज झाला १९९४ ला. आणि हेच आहे हा चित्रपट फ्लॉप होण्याचा सर्वात मोठे कारण. सांगितले जाते कि हा चित्रपट शूट होण्यासाठी खूप जास्त वेळ लागला ह्याचे कारण आहेत ह्या चित्रपटाचे सुपरस्टार्स. सलमान, आमिर, करिश्मा आणि रविना. सलमान आणि आमिरमध्ये स्क्रीन टाइम संबंधित खूप वाद झाले. दोघेही एकमेकांपेक्षा चित्रपटात जास्त स्क्रीन टाईम मिळवू इच्छित होते कारण दोघेही मोठे सुपरस्टार्स होते. शेवटी दिग्दर्शकाच्या समजावण्यावर ह्या दोघांनीही समान स्क्रीनटाइम शेअर करण्याचे मान्य केले. तर दुसरीकडे गोष्ट कराल रविना आणि करिश्माची तर दोघीही त्याकाळच्या सुपरहिट अभिनेत्री होत्या. त्यामुळे दोघांमध्ये आपापले इगो होते आणि दोघांनीही संपूर्ण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांसोबत कधीच बोलणं केले नाही. ह्या गोष्टीचा खुलासा रविना टंडनने काही दिवसांअगोदर एका ट्विट मध्ये केला होता कि, ‘ह्या चित्रपटाच्या शुटिंगवर कोणताच स्टार कोणाशी बोलत नव्हता, तरीसुद्धा ह्या चित्रपटाची शूटिंग काय माहिती कशी पूर्ण झाली.’

आमिर आणि सलमानमध्ये सुद्धा सेटवर उशिरा येण्यामुळे वाद होत होता. आमिर खानला मिस्टर परफेक्टनिस्ट म्हटले जाते जेव्हा तो कोणते काम करतो तेव्हा तो संपूर्ण परफेक्ट पद्धतीने करतो, त्या गोष्टीत पूर्णपणे हरवून जातो. तर दुसरीकडे सलमान खानचा ऍटीट्युड थोडा मोकळ्या स्वभावाचा होता. तो सेटवर नेहमी उशिरा यायचा. ह्यामुळे आमिर आणि सलमानचे जे एकत्र सिन असायचे त्या सिनला शूट करायला खूप उशीर व्हायचा. हेच कारण होते कि आमिर खानने ह्या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानच ठरवले होते कि ह्या चित्रपटानंतर तो सलमानसोबत कधी काम करणार नाही. १९९३ सालापर्यंत ‘अंदाज अंदाज अपना अपना’ चित्रपट जवळ जवळ पूर्ण झाला होता. ह्या चित्रपटाचा फक्त एक शूट शेड्युल करायचे राहिले होते. आणि ह्या १ शूट शेड्युल पूर्ण व्हायला १२ महिने लागले. बोललं जाते कि ह्या चित्रपटाच्या स्टार कलाकारांमध्ये इतके जास्त इगो प्रॉब्लेम होते कि कोणीच एका टेबलावर एकमेकांसमोर बसून समजून घेण्यास तयार नव्हते. सर्वांना एकमेकांपासून इनसिक्युरिटी होती. आणि एकमेकांमध्ये इगो वाद होते. ह्या कारणांमुळे टाळत टाळत १ वर्षात हा शेवटचा शेड्युल पूर्ण झाला. ह्यानंतर हा चित्रपट बनला. हेच कारण होते कि ह्या चित्रपटाला बनवायला ३ वर्षे लागली.

चित्रपटात एक सिन आहे ज्यात सलमान खानचे एकाच सिन मध्ये ३ वेळा हेअर स्टाईल बदललेली आहे. १९९३ साली ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटांची गाणी सुद्धा रिलीज झाली होती. परंतु ह्या चित्रपटाची गाणी थोडीशी अपरिचित प्रकारची आणि थोडीशी वेगळी होती. त्यामुळे लोकांना ह्या चित्रपटाची गाणी जास्त आवडली नाहीत. हे होते दुसरे कारण ह्या चित्रपटाचे फ्लॉप होण्याचे. सोबत ह्या चित्रपटाच्या रिलीज तारखेची जेव्हा घोषणा केली होती. तेव्हापर्यंतसुद्धा चित्रपटाच्या डिस्ट्रिब्युटर्स म्हणजेच वितरकांना विश्वास नव्हता कि जी रिलीज तारीख आहे तोपर्यंत त्यांना चित्रपटाची प्रिंट मिळेल कि नाही ते. ह्यामुळे वितरकांनी ह्या चित्रपटाची कोणतीच पब्लिसिटी केली नाही. ह्या चित्रपटाचे पोस्टर्स सुद्धा छापले नाहीत. वितरकांना ह्या चित्रपटाची पब्लिसिटी करण्यासाठी फक्त तीनच दिवस मिळाले होते. शेवटच्या वेळी सुद्धा वितरकांना माहिती नव्हते कि त्यांना हा चित्रपट वेळेवर मिळेल कि नाही ते. हे होते तिसरे कारण ‘अंदाज अपना अपना’ चित्रपट फ्लॉप होण्याचे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्याच वर्षी सलमान खानचा ‘हम आपके है कौन’, करिश्मा कपूरचे ‘राजा बाबू’ आणि ‘गोपी किशन’ तर रविना टंडनचे ‘लाडला’ आणि ‘मोहरा’ ह्याच वर्षी सुपरडुपर हिट झाले. फक्त ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटच बॉक्स ऑफिसवर टिकू शकला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नाही चालला. परंतु हा चित्रपट टीव्हीवरचा सर्वात मोठा चित्रपट मानला जातो. आणि आजच्या घडीला ह्या चित्रपटाला सर्व अस्सल कॉमेडी चित्रपट म्हणतात. तर ह्या होत्या ‘अंदाज अपना अपना’ चित्रपट फ्लॉप होण्याच्या गोष्टी.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *