मुलांचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आपल्याकडे आहे. अनेक वेळेस ते आपल्याला दिसूनही येतं. त्यातही अनेक वेळेस या लहान मुलांच्या बुद्धिमत्तेचा आवाका आपल्याला अवाक् करून जातो. मागे एकदा आमच्या टीमने एका मुलीच्या वायरल व्हिडियो विषयी लिहिलं होतं, जिची स्मरणशक्ती उत्तम आहे. आज अशाच एका लहान मुलाबद्दल आपण थोडंस जाणून घेणार आहोत. या मुलाचा एक वायरल व्हिडियो आमच्या टीमच्या नजरेस पडला. त्यात या मुलाकडून एक व्यक्ती सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारून त्याची उत्तरे घेताना दिसले. तुम्हाला तर माहितीच आहे. वायरल व्हिडियो असं ऐकलं जरी तरी आमच्या टीमची उत्सुकता शिगेला पोहोचते. या वायरल व्हिडियो मधील मुलाचं नाव आहे शौर्य विष्णू भोईर.
तो राहणारा नाशिकचा असल्याचं कळतं. त्याच्याकडे बघून आणि ऐकून त्याचे वय किती लहान असावे ह्याची कल्पना येते. सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची उत्तरे तो जेव्हा बोबड्या बोलांनी देतो तेव्हा त्याच वय कळतं आणि कौतुकही वाटतं. अनेक ऐतिहासिक प्रश्नांवर तसेच सद्य स्थितीतील प्रश्नांची उत्तरेही तो अगदी पट्कन देतो. अर्थात लहान असल्याने त्याच्या स्मरणशक्तीच्या जोरावर तो हे करतो, हे कळून येतं. पण यात अजून एका व्यक्तीचं कौतुक वाटतं ते म्हणजे कॅमेऱ्यामागील व्यक्तीचं. शौर्य आणि त्या व्यक्तीचं जे ट्युनिंग जमून आलंय, त्याला दाद द्यावीशी वाटते. हा व्हिडियो दोन ते अडीच मिनिटांचा. पण यात कित्येक प्रश्न विचारले जातात. अगदी वेगाने आणि उत्तरही त्याच गतीने मिळतात. पण ही तर फक्त तोंडओळख आहे. येत्या काळात वेगासोबत त्या उत्तरांचे खऱ्या आयुष्यातील महत्वही शौर्यच्या वाढत्या वयासोबत लक्षात येईल हे नक्की.
कारण सामान्य ज्ञान असावे हे उत्तमच आणि त्यामागच्या संकल्पना, महत्व यांची जाणीव असावी हे अतिउत्तम. उत्तम स्मरणशक्ती असणाऱ्या शौर्य याचे खूप कौतुक आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत नक्की पाहून घ्या. आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आपल्याला यासारख्या वायरल व्हिडियोज वरील आमच्या टीमने लिहिलेले लेख वाचायचे असल्यास वर उपलब्ध सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास विविध लेख उपलब्ध होतील. धन्यवाद ! त्याचसोबत मराठी गप्पाला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्व वाचकांचे मनापासून आभार.
बघा व्हिडीओ :