मोबाईलचा नाद कोणाला काय करायला लागेल याचा स्थान पत्ता नाही! एकविसाव्या शतकात आपण वावरत आहोत. आता डिजिटल युगाचा जमाना आला आहे. इंटरनेट, स्पीड कॉलिंग, डेटा वापर, सोशल मीडिया, मोबाईल फोटोग्राफी, ओटी प्लॅटफॉर्म इतकं काय काय भरभरून मोबाईलमध्ये आलंय कि जग आता फक्त काय ते मोबाइलच्या खिडकीतून आता दिसू लागलं. पण या मोबाईलचा अतिरेक इतका झाला की बऱ्याच वेळा नको नको त्या गोष्टी घडत असतात. आता काही लोक पब्जी साठी कोणाचा खराखुरा आयुष्यात जीव घेतील, काही लोक मोबाईलच्या अति वापरामुळे वारंवार नको त्या आहारी जातील अशा बातम्या आपण वरचेवर दररोज वाचत असतो. पण असा एक व्हिडीओ पाहण्यात आला, जो व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीसुद्धा म्हणाल या बाईने तर कहरच केला. आपल्या पोटच्या गोळ्याला रिक्षात ठेवून आली. नाही म्हणजे विचार काय आहे? मोबाईलवर गप्पा मारत मारत अर्धा रस्ता चालत आहे!
एक भला माणूस माणूस तिच्या बाळाला तिच्या मागं मागं गावात आला. आता लोक म्हणतील एक साध पोरही सांभाळता येईना आणि निघाली मिरवायला आणि गमतीचा भाग म्हणजे नेमका अशाच वेळी कोणी तरी कॅमेरा धरून उभा असतो. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद होतो. ‘मोबाईलच्या नादात पोटच्या मुलाला पण विसरलीस कि काय?’ असं कदाचित तो मूल घेऊन आलेला रिक्षावाला मनात पुटपुटत असेल. एवढं काय त्या मोबाईल मध्ये गर्क व्हायचं की पोटचा पोरगाच रिक्षात विसरून चालत सुटायचं. नाही म्हणतोय? एवढं कोणाचा फोन आलाय की त्यामुळे पोटच्या गोळ्याला मागं सोडून घेण्याची वेळ आली. असं कुठलं संभाषण चालू होतं की सोबत आपण एक मुलही घेऊन आलोय, याची साधी कल्पनाही डोक्याला चाटून गेलेली नाही? मग आम्ही म्हटलं की काही बोलावं तर आमचं तोंड दिसतं म्हणून काही बोलणं आपण टाळलं. तरीही सांगतो असं पोराला माझ्या टाकून येन एखाद्या आईला कितपत शोभतय? काळ इतका बदलला. मोबाईलच्या नादात आपण एवढे बोलून जातो की; आपण फोडणी टाकलीय, गॅस वर दूध उकळू ठेवलंय याची पुसटशी आठवण राहत नाही.
या सगळ्यात जेव्हा अशा गोष्टी पुढे येतात की समोर काय वाढून ठेवले हे कळायला मार्ग नसतो. आता हे पोर जर रिक्षावाल्याच्या रिक्षात असंच कुठेतरी राहिले असते, जर का दगाफटका झाला असता तर केवढा मोठा अनर्थ घडला असता याची कल्पना नाही. नशीब चांगलं होतं म्हणून आणि रिक्षावाला देवमाणूस होता म्हणून सर्व नीट निभावून गेले. त्यामुळे कितीबी मोठं काम असू द्या, मोबाईलमध्ये लक्ष देताना कोण आपल्या आजूबाजूला आहेत, आपण काय घेऊन चाललोय याचीही खबरदारी घ्यायला हवी. असं आपलं पोर कोण टाकून जातो. आपल्या पोटचा गोळा असा रस्त्यात विसरून जाण्यासाठी जर का मोबाईल कारणीभूत ठरत असेल. तर पहिलं त्या मोबाईल ला आग लावायला पाहिजे!
आजपर्यंत आपण रिक्षामध्ये दागिने, मोबाईल, रुमाल, पर्स-पाऊच ह्यासारख्या गोष्टी हरवल्याचे ऐकले-पाहिले असेल. पण चक्क ९ महिने कष्टाने जो पोटचा गोळा आपण वाढवला, तो रिक्षातच विसरून गेल्याचे हे नवीनच प्रकरण आहे.
बघा व्हिडीओ :