Breaking News
Home / मनोरंजन / मोरपंख विकणाऱ्या ह्या मुलाला येणाऱ्या भाषा पाहून तुम्हीदेखील तोंडात बोटं घालाल, बघा किती हुशार आहे पोरगं

मोरपंख विकणाऱ्या ह्या मुलाला येणाऱ्या भाषा पाहून तुम्हीदेखील तोंडात बोटं घालाल, बघा किती हुशार आहे पोरगं

आपल्या मराठीत एक म्हण आहे, बोलणाऱ्याचे गहूही विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे सोने पण विकले जात नाही. सध्या व्यवसायात असणाऱ्या अनेक लोकांना बोलायचे वावडे असते. त्यांचे लक्ष व्यवसायात कमी आणि मोबाईलमध्ये जास्त असते. काचा बदाम म्हणत एक व्यक्ती सोशल मीडियावर इतका फेमस झाला की काचा बदाम विकणे सोडून रिल्स करणे सुरू केले. त्याला त्यातून जास्त पैसे मिळाले. खरं तर कुठलाही व्यवसाय करण्यासाठी किंवा आपल्याकडे कला असायला हवी. अगदी शांतपणे बोलणे, थंड डोक्याने विचार करून गिर्हाईक जोडणे, ही सुद्धा कलाच आहे. एमबीए आणि इतर व्यावसायिक शिक्षण घेऊन पण जे जमत नाही, ते न शिकलेली आणि अशिक्षित असलेली लोकं करत आहेत आणि बक्कळ पैसे कमवत आहेत.

संगमनेरमधील अन्सारचाचाने वडापाव विक्री करताना आपला गोड स्वभाव आणि गोड शब्द वापरून तिखट वडापाव विकला. सगळ्यांना आपलेसे करून भारी भारी डायलॉग मारणारे अन्सारचाचा यांचा वडापाव कसा आहे, याविषयी जास्त बोललं जात नाही, त्यांच्या स्टाईल बद्दल जास्त बोललं जातं. नागपूरचा रजनीकांत चहावाला, नाशिकचा झटका पाणीपुरीवाला ही अशीच काही उदाहरणे आहेत, ज्यांनी हे दाखवून दिले की, बोलणाऱ्याचे गहू पण विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही.

असाच एक बोलक्या आणि वयाने अगदी 10 वर्षाच्या असणाऱ्या उद्योगी मुलाचा व्हिडीओ आमच्या समोर आला. या व्हिडीओत असणारा मुलगा फक्त मोरपंख विकतो. आणि हे तो पोटासाठी करतो आहे. म्हणजे लोक खूप मोठे होतात पण नवनवीन गोष्टी शिकत नाहीत पण हे 10 वर्षाचं पोरगं फक्त किरकोळ किमतीचे मोरपंख विकता यावेत, म्हणून चक्क फॉरेनची भाषा शिकलं. इंग्लिश, हिंदी आणि आपापल्या मातृभाषा सगळ्यांना येतात. मात्र हा पोरगा चक्क जवळपास 8-9 भाषा बोलतो. तेही फक्त रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटावा म्हणून…

इटालियन, जर्मन, अरबी, फ्रेंच, इराणी, इंग्रजी, रशियन, जपानी अशा वेगवेगळ्या भाषा तो मुंबईत येणाऱ्या टूरिस्ट लोकांसोबत बोलतो आणि आपले मोरपंख विकतो. इतक्या कमी वयात एवढं मोठं स्किल अवगत करणं, हे फक्त पोटंच शिकवू शकतं.

पुढे इंग्लिशमध्ये तो सांगतो की, इथे सगळ्या देशांचे लोक येतात. त्यांना इथली भाषा येईलच, असे नाही. पण मला मोरपंख विकायचे असल्याने मी त्यांची भाषा शिकलो. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे विकताना त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी प्रसन्नता आहे, जी खरे तर लोकांना खरेदी करायला भाग पाडते. आम्ही याचा हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झालो.

तुम्हीही व्यावसायिक असाल तर हा व्हिडीओ नक्कीच बघा आणि तुमच्या जवळचे कुणीही व्यावसायिक असतील तर त्यांना हा व्हिडीओ नक्कीच शेअर करा. आता हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.