Breaking News
Home / मनोरंजन / म्हणूनच हेल्मेट गरजेचं आहे.. बघा डोक्यावरून बस गेलेल्या तरुणासोबत काय घडलं ते

म्हणूनच हेल्मेट गरजेचं आहे.. बघा डोक्यावरून बस गेलेल्या तरुणासोबत काय घडलं ते

देव तारी त्याला कोण मारी? ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. म्हणजे एखाद्याचं दैव इतकं बलवत्तर असतं की तो मृ -त्यूच्या दाढेतूनही सहीसलामत बाहेर पडतो. याचिच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या डोक्यावरून अक्षरश: बस गेली तरी देखील त्याचा जीव वाचला. या चमत्कारीक घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. खरं तर ज्या चुकीमुळे त्याचा अपघात झाला तीच चूक त्याच्यासाठी वरदान ठरली. तो अक्षरश: मृत्यूच्या मिठीतून बाहेर पडला. आता याला नशीब म्हणायचं की चमत्कार? तर याला खबरदारी म्हणायचं… कारण त्याने हेल्मेट घालण्याची खबरदारी घेतली होती. आपल्यापैकी अनेक लोक केस, भांग बिघडतो, हेल्मेट वापरायला जड जाते… जवळच जायचे आहे, त्यासाठी कशाला हेल्मेट… अशा वेगवेगळ्या कारणांनी आपण हेल्मेट घालणे टाळतो… आजच्या या व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणाने हेल्मेट घातले नसते तर…. क्षणात तो तरुण जीवानिशी गेला असता.

हेल्मेट घालणं आपल्याला बऱ्याचवेळी कमीपणाचं वाटतं किंवा हेल्मेट न घालण्यासाठी अनेक कारणं दिली जातात. हेल्मेट सक्तीनंतर अनेक ठिकाणी तरुणांनी आंदोलनं केली. मात्र दुचाकी चालवताना हेल्मेट वापल्यामुळे आपलाच जीव सुरक्षित रहातो. असं वारंवार वाहतूक पोलीस आणि प्रशासन आवाहन करूनही त्याचं पालन होत नाही. सध्या एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हेल्मेट वापरल्यामुळे तरुणाचा थोडक्यात जीव वाचला आहे. हे हेल्मेट तरुणाच्या डोक्यावर नसतं तर मोठा अनर्थ घडला असता.

बऱ्याचदा हेल्मेट घालण्याचा आळस असतो. पण एक हेल्मेट जीव वाचवतं हे वारंवार आवाहन करूनही अनेकजण त्याकडे कानाडोळा करतात. मात्र एका हेल्मेटमुळे व्यक्तीचा जीव वाचल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अंगावर काटा आणणारा अपघा त आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर समजतं की चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट खरंच आपला जीव वाचवू शकतं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण वेगाने बाईकवरून चालला आहे. वाटेत खड्डा येतो म्हणून तो चुकवण्याचा प्रयत्न असतो. त्याचवेळी समोरून एक मोठी बस येते. बस पण वेगात असते. बस आणि या तरुणाच्या बाईकचा अगदी एका कॉर्नरला सामना होतो आणि या सगळ्यात तरुणाचा बाईकवरील नियंत्रण सुटतं आणि भीषण अपघात होतो. हा बाईकस्वार तरुण अक्षरशः बसच्या चाकाखाली येतो. त्याच्या डोक्यावरून त्या बसचे चाक जाते. या तरुणाचा जीव हेम्लेट घातल्यामुळे वाचला आहे. या व्हिडीओमध्ये ते स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. सुदैवानं हा तरुण एकटा होता कारण आपल्याकडे मागचा माणूस सहसा हेल्मेट घालत नाही.

हा अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. बाईक चालवताना तुम्ही जर हेल्मेट घालत नसाल तर आताच घालायला सुरु करा. कारण त्यामुळेच आज या तरुणाचा जीव वाचला आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *