मध्यंतरी आपल्याकडे प्रॅक्टिकल जोक्स करण्याची एक लाट आली होती. या लाटेवर स्वार होत अनेकांनी विनोदनिर्मिती केली. अनेकांनी यानिमित्ताने स्वतःची पाठ शेकवून घेतली होती. कारण ओळखीच्या माणसांवर असे विनोद करणं ठीक पण अनोळखी माणसांवर असे प्रॅक्टिकल विनोद अंगाशी येऊ शकतात. आज याची आठवण व्हावी असा एक वायरल व्हिडियो आपल्या टीमने पाहिला आणि जुन्या काही इतर व्हिडियोजच्या आठवणी ताज्या झाल्या. मग काय, एकमताने हा लेख लिहावा असं ठरलं. हा व्हिडियो आहे एका बाजारपेठतील. या बाजारपेठत आपल्याला नेहमीप्रमाणे काही दुकानं तर काही फेरीवाले दिसत असतात. एकूणच संध्याकाळची वेळ असते हे कळून येत असतं. काही माणसं आपली घरी जात असतात, तर काही जणं बाजारपेठेत काही खरेदि करावी म्हणून आलेली असतात.
त्यात एक निळ्या रंगाचा शर्ट घातलेला मुलगा एका कोपऱ्यात उभा असलेला दिसतो. त्याच्या पायाजवळ एक गोणी ठेवलेली असते. आपण हे निरीक्षण करत असतो तेवढ्यात समोरून एक माणूस जात असतो. हा निळा शर्ट घातलेला मुलगा त्या माणसाला काही सांगतो. त्याच्या देहबोली कडे पाहून कळतं की खाली ठेवलेली गोणी उचलून देण्यास सांगत असतो. हा माणूसही ही टोपली उचलण्यासाठी वाकतो आणि… त्याला चकित करण्यासाठी त्या गोणीत लपलेला लहान मुलगा चट्कन बाहेर येतो. हे एवढ्या वेगात घडतं की आपल्यालाही चकित व्हायला होतं आणि आपण नकळत हसायाल लागतो. क्षणभर बावरलेला हा माणूस मग या लहान मुलाला मा’रण्याचं नाटक करतो. लहान मुलंच आहे काय मा’रणार म्हणून जास्त काही करत नाही. कदाचित ओळखीचा ही असावा हा छोटा मुलगा. या दरम्यान त्या निळ्या शर्टवाल्या पोराची मात्र इथे पळू का तिथे पळू अशी भंबेरी उडालेली दिसते. त्यामुळे लहान मुलाला पकडण्यात हा माणूस व्यस्त असताना हा निळ्या शर्टवाला मुलगा मात्र धू’म ठोकतो. एव्हाना आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनाही काय घडलं हे कळलेलं असतं.
कदाचित ते ही यात सामील असतात असं एक वेळ वाटून जातं. पण एकूणच या घटनेनंतर सगळा माहोल हास्य रंगात रंगलेला असतो. कदाचित ज्यांची गंमत झाली ते काका ही तिथलेच रहिवासी असल्याने आजूबाजूच्यांचा ओळखीचे असावेत. पण एकूणच हा केवळ काही सेकंदांचा हा व्हिडियो मात्र क्षणात आपल्याला बराच आनंद देऊन जातो. नकळत आपल्या जुन्या आठवणी ताज्या करतो. आपल्या पैकी काहींनी अशा खोड्या केल्याचं यानिमित्ताने आठवतं. तर काहींना या अशा गंमती जंमती बघितल्याच्या आठवणी ताज्या होतात. असा हा कमी वेळेचा पण मनोरंजक व्हिडियो. पण यातून प्रेरणा घेऊन कोणत्याही म्हाताऱ्या आजी आजोबांची मस्करी करायला जाऊ नका हे मात्र आम्ही आमच्या छोट्या आणि तरुण वाचकांना नक्की सांगू. एक तर आजी आजोबांचं मोठं वय आणि दुसरं म्हणजे पाठीत धपा’टा पडणारच नाही, याची खात्री नाही. तेव्हा या व्हिडियोचा केवळ पाहण्यापुरता आनंद घ्या.
तसेच हा लेख कसा वाटला हे ही कमेंट्समधून सांगा. आपण आजपर्यंत मराठी गप्पाचे प्रत्येक लेख आवडीने शेअर केले आहेत. त्या लेखांमध्ये या लेखाचाही भर पडू दे. आपल्या सोशल मीडियावर हा लेख शेअर करा. आपल्या टीमने खास आपल्यासाठी लिहिलेल्या अन्य लेखांचाही आस्वाद घ्या. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :