Breaking News
Home / मनोरंजन / म्हणून मुलांना जास्त मोबाईलवर गेम खेळायला देऊ नका, बघा झोपेत काय बडबडतेय हे पोरगं

म्हणून मुलांना जास्त मोबाईलवर गेम खेळायला देऊ नका, बघा झोपेत काय बडबडतेय हे पोरगं

आजच्या युगात मोबाईल म्हणजे काळाची गरज झाली आहे. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी चुटकीसरशी मोबाईल मधून होत असतात. त्यामुळे मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीकडे असायलाच हवा असा जणू अलिखित नियमच झालेला आहे. आणि ज्याच्याकडे मोबाईल नसेल तो जणू वेगळ्याच ग्रहावरील आहे कि काय असं वाटून जातं. त्यामुळे अगदी वृद्धांपासून ते लहानग्या म्हणजे कालपरवा जन्माला आलेलं मूल असू द्या, त्यांच्या हातात मावत सुद्धा नसतो तरीदेखील त्यांना मोबाईल लागतो. ह्या मोबाईलचे जसे फायदे आहेत तसेच नुकसान देखील आहे. त्याचा वापर योग्य रीतीने केला पाहिजे. ज्याप्रमाणे मोबाईलचा वापर करून अनेक कठीण कामं करून वेळ वाचवता येतो त्याचप्रमाणे मोबाईलचे जर व्यसन लागले तर मात्र तुमचाच वेळ मोबाईलमुळे वाया जातो. मग ते व्यसन मोबाईलमध्ये असलेल्या गेम मुळे असेल किंवा मग वेबसिरीज, चित्रपट, व्हिडीओज पाहण्याचा छंद. तसेच त्यास भर म्हणून व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब ह्यासारखे वेड लावणारे ऍप्स. त्यामुळे मोबाईल जरी काळाची गरज असेलही तरीसुद्धा त्याचा वापर देखील योग्यरितीने केला पाहिजे.

आपल्या आजूबाजूस आपण अश्या अनेक लहान मुलांना पाहतो कि ते बाहेर जाऊन खेळण्यासाठी हट्ट करत नाहीत तर त्यांचा हट्ट असतो तो म्हणजे मोबाईलवर गेम खेळायला पाहिजे. मैदानी खेळ म्हणजे काय ते आजकालच्या बहुतेक मुलांना माहिती सुद्धा नसेल. माहिती तरी कसे पडणार हो, मुलांचा जन्म झाल्यापासून त्यांच्या हातात मोबाईल देऊन सेल्फी आणि गेम खेळण्याची सवय आपणच तर करून दिलेली असते. आणि आता तर सर्व ऑनलाईन झालं आहे. मुलांच्या शाळा, क्लासेससुद्धा मोबाईलमधूनच तर होत आहेत. पालकांना सुद्धा मग मुलांना मोबाईल द्यावाच लागतो. मग बहुतेक मुलं ऑनलाईन क्लासच्या वेळी व्हिडीओ आणि ऑडिओ म्यूट करून ठेवतात. आणि क्लास संपला रे संपला कि मोबाईलवर गेम किंवा युट्युबवर व्हिडीओ लावत बसतात. आता हे सर्व सांगण्याचा हेतू म्हणजे हे हळूहळू मुलांसाठीच घा’तक ठरत आहे. मुलांचे गेम खेळण्याचे व्यसन वाढत जाऊन त्यांची चिडचिड देखील खूप होत असते. त्यामुळे रोजच्या जीवनावर त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो.

 

आमच्या टीमच्या हाती एका मोबाईल वरील गेम खळणाऱ्या मुलाचा असा व्हिडीओ लागला आहे जे पाहून थोडं वेळ हसू तर येईल मात्र वेळीच योग्य धडा देखील घेता येईल. व्हिडिओमध्ये एक लहान पोरगं झोपेमध्ये मोठमोठ्याने बडबडत आहे. ‘अरे भाई मुझे रिवाईव्ह करो.. अरे भाई मुझे रिवाईव्ह करो…’ असे एकदम जोराने ओरडत आहे. हे ऐकून बिच्चारी आई मात्र काळजीत त्या मुलाच्या डोक्याजवळ बसते आणि ती तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवते. जेणेकरून पोरगा झोपेमध्ये घाबरू नये. ह्या मुलाचे गेमचे वेड तुम्हांला हा व्हिडीओ पाहूनच समजून येईल. आता ‘रिव्हाइव्ह’ हा शब्द बहुतेक करून पबजी मध्येच वापरला जातो. मुलगा कदाचित पबजीचा वेडा असेल. परंतु गेल्या वर्षीच भारतात पबजीवर बॅन आणल्यामुळे आता ह्याचे नवीन भारतीय व्हर्जन ‘बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया’ आले आहे. कदाचित ह्याच गेमबद्दल मुलगा झोपेत बडबडत असेल. असो, तुम्ही व्हिडीओ पहिल्या तुमचं मनोरंजन तर नक्कीच होईल. परंतु थोडा विचार देखील कराल कि, मुलासांठी मोबाईलचा वापर किती आणि कुठपर्यंत योग्य आहे ते.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.