वायरल वायरल म्हणत आमच्या टीमने लेख लिहायला घेतले आणि असंख्य विविध वायरल व्हिडियोज वर लेखन केलेलं आहे. त्या लेखांना आपला प्रचंड असा प्रतिसादही आम्हाला पाहायला मिळाला. आपल्या या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आज आमच्या टीमच्या नजरेस असा एक व्हिडियो पडला कि, जो आहे केवळ पाच सेकंदांचा. पण तो इतका वायरल झाला आहे की विचारता सोय नाही. परदेशातल्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चा हा व्हिडियो आहे. त्यात ती आणि तिचे मित्र मैत्रिणी बाहेर कुठे तरी फिरायला आणि पार्टी करायला गेले होते. आपण जिथे जातो त्याबद्दल माहिती देणं अनेकांना आवडतं आणि त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेल तर क्या कहने.
View this post on Instagram
या इन्फ्लुएन्सर मुलीचं नाव दनानिर मोबिन असं आहे. हा व्हिडियो सुरू होतो ते दनानिर हिच्या बोलण्याने. ‘ये हमारी गाडी है, ये हम हैं….’ ही तिची पहिली दोन वाक्ये आणि तिसऱ्या वाक्यामुळे हा व्हिडियो वायरल झाला. तिसरं वाक्य असं की, ‘यहा पै पॉरी हो रही है’. तिला म्हणायचं असतं, इथे पार्टी होत आहे. पण पार्टी चा उल्लेख ती ‘पॉरी’ असा करते आणि यामुळे हा व्हिडियो पुढे वायरल झालेला पाहायला मिळतो. तो एवढा वायरल होतो की तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर कित्येक लाखांहून अधिक लाईक्स मिळतात. तसेच इतर इन्फ्लुएन्सर पण प्रेरित होतात. त्यातील एक सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर म्हणजे यशराज मुखाते. या पाच सेकंदांच्या व्हिडियोज वर त्याने एक गंमतीदार व्हिडियो केला आहे. हा व्हिडियो ही वायरल झाला आहे. त्यातले बिट्स हे अगदी थिरकायला लावतील असे आहेत. दनानिर मोबिन ही तर सध्या सातव्या असमानात आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. ती स्वतःच्या सोशल मीडिया वर तिच्या वायरल व्हिडियो वर केले गेलेले मिम्स सध्या शेअर करते आहे. तसेच स्वतः सुद्धा या मिम्सची मजा घेते आहे.
आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तुम्हाला अशाच विविध वायरल व्हिडियोज वरील लेख वाचायचे असल्यास मराठी गप्पाच्या वेबसाईटवरील सर्च ऑप्शन मध्ये जा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च करा. आपल्याला विविध वायरल लेख वाचायला मिळतील. आपल्या उदंड वाचक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
बघा व्हिडीओ :