Breaking News
Home / मनोरंजन / याला म्हणतात आईच प्रेम, व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या डोळ्यांत देखील अश्रू येतील

याला म्हणतात आईच प्रेम, व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या डोळ्यांत देखील अश्रू येतील

माणूस असो वा प्राणी असोत, आपल्या प्रत्येकामध्ये काही जाणिवा या अगदी सारख्या असतात. ममत्व ही अशीच एक भावना आहे जी प्रत्येक सजीवामध्ये दिसून येते. खासकरून स्वतःच्या पुढील पिढीसाठी ही भावना ही नेहमीच तीव्र असते. कारण आपल्यापेक्षा लहान असल्याने पुढील पिढीचा अनुभव अर्थातच कमी असतो आणि त्यामुळे त्यांचं संरक्षण व्हावं याकडे आपलं विशेष लक्ष असतं. खासकरून लहान वयात तर अल्लडपणाच असतो, त्यामुळे हे लक्ष सदैव असतं. त्यामुळे जरा कुठे चूक होते आहे असं वाटलं तरी मग चट्कन प्रतिक्रिया दिली जाते आणि या पुढील पिढीस त्रास होणार नाही हे पाहिलं जातं.

आज हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आपल्या टीमने बघितलेला व्हिडियो होय. हा व्हिडियो तसा जुना असावा असं वाटतं. त्यामुळे त्यातील चित्रीकरण थोडं धुरकट धुरकट आहे. पण अस असलं तरी या व्हिडियोत बघायला मिळणारा किस्सा मात्र आपल्या मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहत नाही हे नक्की ! आता होतं काय तर व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक मनीमाऊ एका इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या छतावर असलेली दिसून येते. नीट बघितलं की कळतं की ती एकटीच नाहीये.

तर तिच्यासोबत काहीच दिवसांची तिची छोटी छोटी पिल्लं सुद्धा आहेत. चित्र धुरकट दिसत असलं तरी ती पांढरी शुभ्र पिल्लं लक्षात राहतात. आपण नकळतपणे मनातल्या मनात ती पिल्लं कशी दिसत असावीत याचं एक चित्र तयार करतो. हे सगळं आपल्या मनात चालू असताना समोर हालचाल ही होत असते. या तिघांमधली मनीमाऊ एका छज्यावरून उडी मारून दुसरीकडे जाते. तिच्यासाठी हे अगदी सहजपणे होऊन जातं. पण तिची पिल्लं अगदीच लहान असतात. त्यात ही उडी खालच्या दिशेने मारायची असते. अशावेळी ती पिल्लं थोडी घाबरलेली वाटतात. पण त्यांची माय एव्हाना दुसरीकडे जाऊन त्यांची वाट बघत असते. त्यामुळे मग त्यातील एक पिल्लू धाडस करून कसंबसं उडी मारायचा प्रयत्न करतं. पण त्याच वय, लांबी आणि अनुभव कमी असल्याने त्याची उडी धडपणे पोहोचत नाही. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी जाण्याऐवजी हे पिल्लू थेट खाली जातं. आपल्याला चट्कन वाईट वाटतं. एव्हाना या पिल्लाची आई खाली उडी मारून गेलेली असते. काही क्षण या दोघांच ही दर्शन होत नाही. या पिल्लाला लागलं असावं असा विचार आपल्या मनात पक्का होणारच असतो.

पण तेवढ्यात ही मनीमाऊ आणि तिचं ते पिल्लू खाली चालताना दिसतं. नाही म्हंटलं तरी जीवात जीव येतो. तसेच, ‘मनीमाऊचं पिल्लू ते, व्यवस्थित पायांवर पडलं असणार’ असा विचार चमकून जातो. एव्हाना त्याने चालायला आणि बागडायला सुरुवात केलेली असते. पण तिघांमधले दोन खाली आले असले तरी एक असहाय पिल्लू वरच असतं. पण ती माय थोडी त्या पिल्लाला मागे सोडेल. ती मघाशी ज्या झाडावरून खाली उतरली होती त्याच झाडावरून परत वर चढते. पण मागील वेळेस ती आपल्या समोरून उतरते. यावेळी ती आपल्याला दिसत नसलेल्या झाडाच्या भागावरून वर चढते. त्यामुळे अचानक एक आकृती त्या छज्यावर गेलेली दिसते. आता अर्थातच या दुसऱ्या पिलाला खाली घेऊन जाणं हे तिचं काम असतं. पण ती हे काम व्यवस्थित करते का आणि केलं असेल तर कस करते यासाठी आपल्याला हा व्हिडियो पाहायला हवा. काळजी नको हा व्हिडियो बघण्यासाठी इतरत्र जायची गरज नाही. आपली टीम आपल्या सोयीसाठी या लेखाच्या शेवटी शेअर करते आहे. या व्हिडियो बद्दल इत्यंभूत माहिती देता आली असती. पण मग हा व्हिडियो बघण्याचं आपलं समाधान आपल्याला मिळालं नसतं म्हणून आपल्या वाचकांसाठी हा खास प्रयत्न.

आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *