वर्ल्ड रेसलिंग इंटरटेन्मेन्ट म्हणजे डब्लूडब्लूई पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक दशका पासून चालत आलेल्या या शो मधे दुनियाभरचे रेसलर मनोरंजनासाठी आपापसात रिंगणात लढाई करतात. डब्लूडब्लूई सर्वात जास्त पसंती असणारा शो आहे. हा शो सरासरी सर्व वयाचे लोक बघतात. एक वेळ जी व्यक्ती डब्लूडब्लूई चा हिस्सा होते ती इंटरनॅशनल सेलिब्रेटी होते. भारता मधून हे सौभाग्य लाभले ‘दिलीप सिंह राणा’ म्हणजे ‘द ग्रेट खली’ ला. खली भारताची अशी व्यक्ती होती, ज्याने डब्लूडब्लूई मधे जाऊन संपूर्ण जगाला हैराण केले होते. जेव्हा पहिल्या वेळी खलीने एन्ट्री मारली तेव्हा डब्लूडब्लूई मधील सगळ्यात मोठा रेसलर अंडर टेकरला खूप धुतलं होतं. त्यांनतर त्याने बऱ्याच रेसलर बरोबर फाईट करून त्यांना धूळ चारली.
डब्लूडब्लूई मधे गेल्या नंतर खली पूर्ण जगात प्रसिद्ध झाला होता. पण आता खलीने डब्लूडब्लूई खेळणे सोडले. अशात त्याच्या फॅन्स च्या मनात नक्की प्रश्न आला असेल कि, खलीने असे का केले? असं काय झालं असेल की ज्यामुळे खलीने डब्लूडब्लूई मधून निवृत्ती घेतली. आज आम्ही याचे गुपित खोलणार आहोत. परंतु त्या अगोदर आम्ही खली बद्दल काही महत्वपुर्ण गोष्टी सांगणार आहोत. खली मुळात हिमाचल प्रदेशातील राहणारा. तो तिथे पोलीस विभागात काम करायचा. खलीने २००६ मधे डब्लूडब्लूई मधे काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००८ मधे तो जास्त चर्चेत आले. त्याचे कारण म्हणजे त्याने अंडरटेकर सारख्या बलाढ्य रेसलरला हरवले. डब्लूडब्लूई व्यतिरिक्त खली तीन हॉलिवुड आणि दोन बॉलिवूड सिनेमात दिसला आहे. एवढंच नाही तर २०१० मधे खली बिगबॉसच्या घरातही दिसला. हा बिगबॉसचा चौथा सीजन होता. यावेळी तो टॉप ३ मधे पोहोचला होता.
यासाठी खलीने सोडले डब्लूडब्लूई
द ग्रेट खली ने सांगितले की तो डब्लूडब्लूई च्या फाईट मधे भाग घेणार नाही. याचे कारण सांगताना खली म्हणाला की भारतात त्याच्या शिवाय अनुभवी आणि योग्य मार्गदर्शन करेल असा रेसलर नाही की जो तरुणांना रेसलिंगचे धडे देऊ शकेल. तो तरुणांना डब्लूडब्लूई ची ट्रेनींग देतो. अशातच तो एकटाच असा ट्रेनर आहे जो तरुणांना व्यवस्थित ट्रेनींग देऊ शकतो. जर तो डब्लूडब्लूई मधे खेळला तर त्याला त्याच्या अकॅडमी मध्ये शिकत असलेल्या रेसलरला योग्य मार्गदर्शन करता येणार नाही. त्यामुळे त्याच्या ऍकॅडमीत शिकत असलेले २५० रेसलरचे भविष्य गोत्यात येईल. त्याने पुढे सांगितले की, भारतात जेवढे रेसलर आहेत ते एवढे श्रीमंत नाहीत कि अमेरिकेला जाऊन ट्रेनींग घेऊ शकतील. म्हणून त्याने डब्लूडब्लूई मधून निवृत्त होऊन नवीन रेसलरला ट्रेनींग देऊन तयार करण्याचे काम चालू केले. आपल्या माहिती साठी सांगतो, द ग्रेट खलीची जालंधर ला एक रेसलिंग ऍकॅडमी आहे. यात तो पंजाब आणि हरियाणाच्या तरुण पिढीला रेसलिंगची ट्रेनींग देतो. खलीला अपेक्षा आहे कि इथून ट्रेनींग घेऊन खूप चांगले रेसलर तयार होतील आणि डब्लूडब्लूई मधे जाऊन आपल्या देशाचे नाव मोठे करतील.