Breaking News
Home / मनोरंजन / या चिमुकलीच्या आवाजाला तोडच नाही… आवाज ऐकल्यानंतर तुम्हीदेखील तिचे फॅन्स होऊन जाल

या चिमुकलीच्या आवाजाला तोडच नाही… आवाज ऐकल्यानंतर तुम्हीदेखील तिचे फॅन्स होऊन जाल

मनोरंजन हा आपल्या आयुष्यातील एक वाटत नसला तरी अतिशय महत्वाचा घटक आहे. मनावर असलेली ताण तणावाची जळमटे बाजूला सारायला यामुळे मदत होते. बरं प्रत्येकाची मनोरंजन करून घेण्याची व्याख्या वेगवेगळी असते. अर्थात मनोरंजन होण्यासाठी अनेकविध माध्यम सुद्धा उपलब्ध असतात. मग हे मनोरंजन कधी नाटक, कधी सिरियल्स-रियालिटी शोज, तर कधी सिनेमा तर कधी गाण्याचे लाईव्ह परफॉर्मन्स यातून होतं. अगदी गावाकडे तमाशा आणि लावणीचे फड ही असतात. अगदीच यातलं काही नसेल सोशल मीडिया असतोच.

पण अस असलं ना मंडळी तरी लाईव्ह परफॉर्मन्स मुळे होणारं मनोरंजन हे काही वेगळंच असतं. त्यामुळेच त्यातील प्रत्येक कलाकाराचा कस लागतो हे ही तितकंच खरं आहे. अगदी प्रातिनिधिक उदाहरण म्हणून नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्यांचं उदाहरण घ्या ना ! नाटकांत काम केलेल्या अभिनेते आणि अभिनेत्रींना इतर माध्यमांत विशेष मान असतो अस सहसा दिसून येतं. बरं हे आपल्या आणि परदेशातही दिसून येतं. कारण लोकांसमोर आपली कला सादर करण्यासाठी जसं धाडस लागतं तसेच प्रसंगावधान ही लागतं. कारण कलाकृती रेकॉर्ड करत असताना रिटेक्स मिळू शकतात.

पण लाईव्ह परफॉर्मन्स देताना मात्र रिटेक्स नसतात. तिथे आपण किती तालीम केली आहे आणि आपण किती चाणाक्ष आहात याची कसोटी लागते. त्यामुळे अशा लाईव्ह परफॉर्मन्स करणाऱ्या अभिनेते, गायक आणि इतर कलाकारांचं प्रत्येकाला कौतुक आणि अप्रुप हे वाटतंच असतं. त्यातही हे कलाकार जर वयाने लहान असतील तर या कौतुकाची पातळी नक्कीच वाढते. किंबहुना त्यांच्यातील धाडसाला मनोमन आपण सॅल्युट करत असतो. कारण आपल्यातले बहुतेक जण, वयाने मोठे असले तरी आजही चार चौघांसमोर बोलायचं झालं तरी कचरतात. अर्थात अस करणं काही चूक नव्हे. पण त्यामुळे लहान मुलांमधील धाडसाचं कौतुक वाटतं. आज आपल्या टीमला ही अशाच एका लहान मुलीचं कौतुक वाटलं. ही मुलगी गायिका आहे. ती एका म्युझिकल बँड साठी गात असावी असं वाटतं. त्या बँडचं नाव संगम बँड असल्याचं दिसतं. या बँडच्या मार्फत विविध सण समारंभ यांच्यावेळी गाणं आणि वादन होत असावं. आज आपल्या टीमने जो व्हिडियो पाहिला त्यातही एखादा समारंभ असावा आणि हा बँड कार्यरत असावा असं दिसून येतं.

या बँड सोबत ही छोटीशी गायिका ही गात असावी. अर्थात व्हिडियो सुरू झाल्यापासून सुरुवातीचे काही क्षण ही मुलगी गाते आहे याचा अंदाज येतो, पण तोपर्यंत ती फक्त आलाप घेत असते. बरं ती त्या बँडच्या वाहनापासून ही लांब उभी असते त्यामुळे ही लांब का उभी असं वाटून जातं. पण जेव्हा ती एकेक शब्द उच्चारत गायला लागते तेव्हा हे वाटणं कुठच्या कुठे पळून जातं. किंबहुना तिच्या गळ्यातील गोडवा लक्षात यायला लागतो. बरं या व्हिडियोत अजून एक गंमत अशी की सगळ्यांचं लक्ष बँड वाजवणाऱ्या मंडळींकडे असतं. त्यामुळे सगळे जण या मुलीकडे जवळपास पाठ करून उभे असतात. पण खरी जादू तर हिच्या आवाजात असते हे काही जणांना थोड्या वेळाने कळून येतं. आमची टीम ही काही गायन क्षेत्राशी थेट संबंधित नाही. त्यामुळे त्यातील तांत्रिक बाबी काही कळत नाहीत. पण या छोट्या मुलीचं गाणं ऐकताना फार छान वाटतं हे नक्की. आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही आवडलं असेल. पण आपण जर हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर पहा. आपल्याला ही आनंद होईल.

आपल्या टीमला तर हा व्हिडियो बघताच क्षणी आवडला होता. तेव्हाच ठरलं की या व्हिडियो विषयी आपण लिहायला हवं, जेणेकरून आपल्या वाचकांना या छोट्या गायिकेचा गोड आवाज अनुभवता येईल. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला आहे आणि खाली तो व्हिडियो ही शेअर केला आहे. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.