दारू चांगली की वाईट याबद्दल वाद घालणारे अनेक भेटतील पण दारूमुळे स्वतःची फजिती करणारे या व्हीडिओत आपल्याला भेटलेत. नाही म्हणजे काय मजाक लावलायस का ते कळना. पोरांनं शाळेच्या गॅदरींगला पहिला येण्यासाठी याच आजच्या दिवसासाठी महिनाभर या टेक्नोस्टेप, सिग्नेचर स्टेपची प्रॅक्टीस करून घेतलीयं आणि काय टायमिंग साधून या बे’वड्यानं त्याच्या डान्सचा कलेचा चोथा केलाय ना काय म्हणून सांगू. तुम्ही काय करा, एक सगळ्यात सुंदर इमारत बघा पण त्याच्या बाजूला जर कचरा, घाण असेल ना तर त्या इमारतिच्या सुंदरतेकडे तुमचंही लक्ष जाणार नाही. एवढं मात्र, खरं डान्स करताना पोरगा इतका छान स्टेप करत होता बे’वड्यानं येऊन सगळा कचरा केलायं. लहानपणी नवद्दीतल्या पोरांना आठवत असेल. गल्लीबोळात किंवा गावात असे सार्वजिक कार्यक्रम व्हायचे. गावात येणाऱया जाणाऱ्यानं प्रत्येकानं चांगले चुंगले कपडे घातले असायचे. तिथे खाण्यापिण्याचीही सोय असायची. पिण्याची म्हणजे तसली नाही. फक्त कोल्ड ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक असलंचं काहीच नाही.
या सगळ्यात तिथं पिण्याची पण सोय आहे, असं वाटून फिरणारे बे’वड्यांची संख्या काही एकदोनच असते. पण पूर्ण कार्यक्रमाची ऐशितैशी करायला एवढे एकदोघेच पुरेसे असतात. गावात एखादा मंत्री संत्री येऊन ठेपलेला असतो. त्यांच्या समोर लाज काढायला अशी मंडळी तत्पर असतात. बरं त्यांना दुसऱ्या दिवशी काय जाब विचारायला गेलं तर काहीच आठवतं नसतंयं. त्यामुळे अशा लोकांना कार्यक्रम असतील त्या दिवशी लांबच्या गावात निमंत्रणालाच धाडायचं म्हणजे ते काय कार्यक्रम संपेपर्यंत यायचं नाव काढणार नाही. गावात दिसले तरीही असल्या कार्यक्रमापासून दूरच ठेवून द्यायचं. नाहीतर अशी टेक्नो स्टेप मारायला स्टेजवर हजर होणार हे नक्की. एकदा काय झालं गावात अशाच एका पूजेचा कार्यक्रम सुरू होता. डान्स वैगरे होईपर्यंत बेवड्यांचं सगळं कसं चांगलं चांगलं सुरू होतं. पण त्याचं झालं असं की काहीच वेळात दशावतार सुरू झाला. स्टेजवरच्या राक्षस बनलेल्या व्यक्तीच्या हातात खरीखुरी गदा होती. राक्षस ज्याच्याशी युद्ध करणार होता तो झाला पसार, पण स्टेजजवळ बसलेला असाच एक बेवडा त्याला सापडला. असाच लोळत लोळत स्टेजपाशी गेला. राक्षसाच्या कॅरेक्टरमध्ये शिरलेल्याने जो दणका त्याला दिलाय ना आणि बेवड्याची जी झिंग उतरलीयं ना ती परत कधी स्टेज काय असल्या कार्यक्रमात न पिता जाण्याचीही हिम्मत त्यानं केली नाही.
हा व्हीडिओ पाहत असताना तुम्हालाही पोट दुखेपर्यंत हसू येईल. थोड्यावेळासाठी कळणार नाही की हा कसला ग्रुप डान्स तर नाही ना. बरं खरा डान्स करणार्याचे हावभाव तुम्ही पाहिलेत का त्यांच्या डोळ्यावरचा विश्वासच उडाला. याच्याकडे पाहून क्षणभरासाठी तो स्टेपच विसरुन गेलाय. या सगळ्यात डान्स करणाऱ्यांला क्षणभर सुचेनाच. ही आपण डान्स करतोय आणि कॉम्पिटीशनला कोण उतरलंयं. बरं डान्स करत करत गटांगळ्या खात खात पुन्हा जाऊन खाली पडला आणि प्रेक्षकांचा जो हशा पिकला त्यात या नवख्या डान्सरची एण्ट्री लेट झाली पण थेट झाली. हे सगळं डान्स करतानाचा व्हीडिओ इतका व्हायरल झालाय की त्या बेवड्याला स्वतःला हा व्हीडिओ पाहून लाज वाटतं असलं. पोटात दोन घोट गेल्यावर भान न राहणाऱ्यांकडून दुसरं काय अपेक्षित ठेवणार म्हणा. ती मंडळी स्वतःसोबत दुसऱ्याचीही फजिती करून घेणार आणि गावाची पण. असल्या पेताडाचा गटांगण्या खाणारी स्टेप पाहून प्रेक्षकांचं मात्र धमाल मनोरंजन झालं. म्हणजे त्या पोरानं महिनाभर प्रॅक्टीस करुन एवढ्या स्टेप शिकून काय मिळालं नाही ते फक्त दोन गटांगळ्या खात जाणाऱ्याला मिळालं. विचार करा हा बेवडा फ्रेममध्ये आलाच नसता तर का हा व्हीडिओ इतका व्हायरल झाला असता का, त्यामुळं खऱ्याची दुनियाच न्हाय असं म्हणायला हवं.
बघा व्हिडीओ :