जेव्हा पण आपण कोणत्याही सेलिब्रेटींच्या मुलांबद्दल बोलत असतो, तेव्हा लोकांचे हेच मानणं असतं कि जर आई वडील सेलिब्रेटी आहेत तर त्यांची मुले पण चित्रपटांत काम करतील. परंतु काही वेळेला असं होत नाही, बॉलिवूडमध्ये अशी अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांची मुले दिसायला खूप सुंदर आहेत, परंतु चित्रपटांत काम करत नाहीत. आणि जेव्हा आपण सौंदर्याची गोष्ट करतो तेव्हा त्यात अभिनेत्रींचे नाव येतेच. अनेकांना अभिनेत्री बनण्याचे स्वप्न असते. आणि त्यात जर गोष्ट बॉलिवूड स्टार्सच्या मुलींबद्दल असेल, तर त्यांना चित्रपटांत लगेच ब्रेक मिळून जातो. परंतु असे असूनही काही लोकप्रिय स्टार्सच्या मुलींनी चित्रपटांत काम केले नाही. काहींनी वेगळे करिअर निवडले तर काहींना स्वतःहून चित्रपटांत यायचे नव्हते. चला तर आज आपण त्या बॉलिवूड स्टार्सच्या मुलींबद्दल जाणून घेऊयात, ज्या खूप मोठ्या सेलिब्रेटींच्या मुली असूनही अजूनही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले नाही.
श्वेता बच्चन
बॉलिवूडचे सर्वात मोठे सुपरस्टार अमिताभ बच्चन ह्यांना मुलगी आहे जिचे नाव श्वेता बच्चन आहे. अमिताभ बच्चन ह्यांनी श्वेताला चित्रपटसृष्टीपासून दूर ठेवले. श्वेता एक जर्नालिस्ट असून तिला लेखनाची सुद्धा आवड आहे. २०१८ मध्ये तिची ‘पॅरॅडाईस टॉवर’ हि कादंबरी प्रकाशित झाली होती. श्वेताचे सध्या ४५ वय असून तिचा १९९७ मध्ये लोकप्रिय उद्योगपती निखिल नंदा ह्याच्याशी विवाह झाला आहे. दोघांनाही दोन मुले असून मुलीचे नाव नव्या नवेली आणि मुलाचे नाव अगस्त्य आहे.
(फोटोत : डावीकडे श्वेता बच्चन आणि उजवीकडे त्रिशला दत्त )
त्रिशाला दत्त
संजय दत्त ह्याला एक मुलगी आहे जिचे नाव त्रिशाला दत्त आहे. त्रिशाला हि संजय दत्तची स्वर्गीय पहिली पत्नी रिचा शर्मा हिची मुलगी आहे. ती दिसायला खूपच सुदंर आहे, ह्या गोष्टीत काहीच शंकाच नाही. परंतु इतके असूनही त्रिशलाने चित्रपटांत जाणे, हे संजय दत्तला बिल्कुल पसंत नाही. माझी मुलगी कधीच चित्रपटांत काम करणार नाही, असे त्याने ठाम मत व्यक्त केले होते. त्रिशालाचे सध्याचे वय ३२ असून तिने न्यूयॉर्क मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्रिशाला एक बिजनेस वुमन असून ती सध्या तिची मावशी इना शर्मा आणि आजी आजोबांसोबत न्यूयॉर्क मध्ये राहत आहे.
रिद्धिमा कपूर
बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असेलेले ऋषी कपूर ह्यांना मुलगी असून त्यांच्या मुलीचे नाव रिद्धिमा कपूर आहे. वडील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते असूनही रिद्दीमाने चित्रपटसृष्टीत करिअर केले नाही. रिद्दीमा तिच्या बिजनेस वर्ल्ड मध्ये व्यस्त असते. आणि अजूनपर्यंत तिने चित्रपटसृष्टीत कोणतेच काम केले नाही आहे. रिद्धिमा सध्या ३९ वर्षांची असून २००६ मध्ये उद्योगपती भारत साहनी ह्याच्याशी तिचा विवाह झालेला आहे. दोघांनाही एक मुलगी असून मुलीचे नाव साम्रा आहे.
(फोटोत : डावीकडे रिद्धिमा कपूर आणि उजवीकडे शनाया कपूर )
शनाया कपूर
अनिल कपूर ह्यांचा भाऊ अभिनेता संजय कपूर ह्याला एक मुलगी असून तिचे नाव शनाया आहे. शनायाला बॉलिवूडमध्ये काही खास रुची नाही आहे. त्याच कारणामुळे ती ह्या सर्वांपासून दूर असते. खरंतर, शनाया इतकी सुंदर दिसते कि जर ती चित्रपटसृष्टीत आली तर भल्या भल्या अभिनेत्रींना सौंदर्यामध्ये मागे टाकू शकेल. शनाया सध्या २० वर्षांची असून ती मीडियापासून खूप लांबच असते. जरी शनाया चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी असं बोललं जात आहे कि ती लवकरच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवू शकते.
टिना अहुजा
गोविंदाला तर सगळेच ओळखतात, जो एका जमान्यात खूप मोठा सुपरस्टार होता आणि त्याचे चित्रपट आज सुद्धा पाहिले जातात. गोविंदाला एक मुलगी आहे जिचे नाव टिना अहुजा असून ती खूप सुंदर आहे. टिनाचे सध्याचे वय ३० असून ती अविवाहित आहे. टिनाने जरी आजपर्यंत दोन चित्रपटांत काम केले असले तरीही अजूनही टिनाने बॉलिवूडला आपले करिअर म्हणून निवडलं नाही आहे. २०१५ मध्ये आलेल्या ‘सेकंड हॅन्ड हसबंड’ आणि २०१९ मध्ये आलेल्या ‘कागज’ ह्या चित्रपटांत तिने काम केलेले आहे.
सना पांचोली
बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली ह्याच्या मुलीचे नाव सना पांचोली आहे. परंतु बॉलिवूड चित्रपट दुनियेपासून ती खूप लांब आहे. सनाने अमेरिकेत लॉस एंजेलिस मधून अभिनय आणि चित्रपटसृष्टीचे शिक्षण घेतले आहे. २००७ मध्ये अशी चर्चा होती कि, सना चित्रपटसृष्टीत पर्दापण करेल. परंतु नंतर हा रोल कंगनाला देण्यात आला. जेव्हा सना शाळेत होती तेव्हा तिला ‘डायरेक्ट दिल से’ ह्या चित्रपटाची ऑफर आली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या, परंतु तिने त्या स्वीकारल्या नाहीत. सना गोआ येथील ‘न्यू फाईन इटालियन डायनिंग रेस्टारंट’ ची मालकीण आहे. तिच्याबद्दल भविष्यात चित्रपटांत अंदाज वर्तवणे खूपच चुकीचे ठरू शकते कारण कदाचित पुढे जाऊन सना चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा विचार सुद्धा करू शकते.
(फोटोत : डावीकडे टिना अहुजा आणि उजवीकडे सना पांचोली )