‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका प्रेक्षक पसंतीस उतरते आहे. यातील स्वीटू आणि ओंकारची प्रेम कहाणी, सोबत इतर कलाकारांच्या व्यक्तिरेखाही लोकप्रिय होत आहेत. या लोकप्रिय व्यक्तिरेखांमधली एक व्यक्तिरेखा म्हणजे मोमो. स्वीटू या व्यक्तिरेखेची बॉस म्हणजे ही मोमो. तिचं वागणं बोलणं यातून एका उदयोन्मुख अभिनेत्रीने ही व्यक्तिरेखा अतिशय उत्तमरीतीने साकार केलेली आहे. आजच्या या लेखातून आपण या उदयोन्मुख अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत. मोमो च्या भूमिकेतील ही अभिनेत्री म्हणजे ‘मीरा जग्गन्नाथ’. मीरा ही अभिनय क्षेत्रात येण्याआधीपासून कलाक्षेत्रात मॉडेल म्हणून कार्यरत होतीच. तिने पु. ना. गाडगीळ या प्रथितयश ब्रँड साठी अनेक जाहिरातींमधून काम केलेलं आहे.
मराठी मनोरंजन क्षेत्रात तिची पहिली कलाकृती म्हणजे झी युवा या वाहिनीसाठी केलेली एक जाहिरात होय. पुढे झी च्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून अभिनय ही केला. सध्या सुरू असलेली, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही तिची अजून एक मालिका. मालिकांसोबतच तिने चित्रपटातूनही अभिनय केलेला आहे. येत्या काळात ईलुईलु हा तिचा चित्रपट प्रदर्शित होईल. तिने ‘लिव्ह इंडिपेंडंट’ या वेब सिरीज मध्येही काम केलेलं आहे. ये साजना या म्युझिक व्हिडियोतही तिने अभिनय केलेला आहे. या व्हिडियोला आजतागायत १३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलेलं आहे. दिल बेजुबान, प्रेम जयती हे तिने अभिनित केलेले अजून काही म्युझिक व्हिडीओज. यांसोबतच तिने काही शॉर्ट फिल्म्स मधूनही अभिनय केलेला आहे. समीरा (Samira) या पारितोषिक विजेत्या शॉर्ट फिल्मचा ती भाग होती.
कलाक्षेत्रात सातत्याने कार्यरत असताना मीरा ही स्वतःच्या आरोग्याकडे ही विशेष लक्ष देत असते. आरोग्य उत्तम राहावं यासाठी तिने योगाभ्यास करणे हा पर्याय प्रामुख्याने निवडलेला दिसतो. तसेच यात तिने प्रावीण्य मिळवलेलं आहे हे तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून दिसून येतं. मीरा फिटनेस कडे लक्ष देत असली तरीही ती तेवढीच खवय्यी आहे. विविध पदार्थ बनवायला आणि खाऊन बघायला तिला आवडतात. तसेच भटकंती करणे ही तिला आवडते. मीरा ही सध्या तिच्या मालिकेत व्यस्त आहे. तसेच येत्या काळात तिचा चित्रपट ही प्रदर्शित होईल. तिच्या आत्ताच्या आणि यापुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! त्याचसोबत आम्ही येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील इतर कलाकारांच्या जीवनप्रवासाविषयी लेख लिहिले आहेत. तुम्ही आपल्या मराठी गप्पावर हे लेख स’र्च ऑप्शनच्या मदतीने वाचू शकता. तुमच्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.