Breaking News
Home / मराठी तडका / येऊ क’शी तशी मी नांदायला मालिकेतील ओंकारच्या आईची जीवनकहाणी, पती होते लोकप्रिय अभिनेते

येऊ क’शी तशी मी नांदायला मालिकेतील ओंकारच्या आईची जीवनकहाणी, पती होते लोकप्रिय अभिनेते

सध्या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने अल्पावधीत स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग तयार करण्यास सुरवात केली आहे. यातील व्यक्तिरेखा या लोकप्रिय होत आहेत. अनुभवी आणि उदयोन्मुख कलाकारांचा उत्तम मेळ या मालिकेत दिसून येतो. या मालिकेत नलिनी ही व्यक्तिरेखा साकार करणाऱ्या दीप्ती केतकर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा लेख आमच्या टीमने काही काळापूर्वी लिहिला होता. आज या मालिकेतील अजून एका अनुभवी अभिनेत्री विषयी आपण जाणून घेणार आहोत. या अभिनेत्रींचं नाव आहे, शुभांगी गोखले. होय, या मालिकेतील ओंकार ची आई. तसेच श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतील श्यामल. शुभांगीजींच्या प्रत्येक भूमिकेतून त्यांनी त्या त्या व्यक्तिरेखा अतिशय तन्मयतेने जिवंत केल्या आहेत.

सध्या सुरू असलेली ‘राजा राणीची गं जोडी’ ही मालिका आणि त्यातील आईसाहेब ही व्यक्तिरेखाही तशीच. शुभांगी यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिकांतून अभिनय केलेला आहे. त्यांची भूमिका असलेल्या मालिका म्हणजे मि.योगी, चिडीयाघर,एका लग्नाची तिसरी गोष्ट, काहे दिया परदेस,लपतागांज इत्यादी. मालिकांसोबतच शुभंगीजींनी नाटक आणि सिनेमा या माध्यमांतूनही अनेक उत्तम कलाकृती आणि व्यक्तिरेखा साकार केल्या आहेत. त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात झाली ती नाटकांपासूनच. त्यांनी अभिनयातील प्रशिक्षण घेतलेलं होतं. एकांकिका आणि नाटकातून अभिनय सुरू होताच. याच काळात त्यांच्या पतींची म्हणजेच मोहन गोखले यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांची भेट कशी झाली आणि त्यांचं नातं पुढे कसं बहरलं याविषयी त्यांनी आपल्या काही मुलाखतींतून सांगितलं आहेच. मोहन गोखले हे स्वतः उत्तम अभिनेते होते. देखणं व्यक्तिमत्व, उत्तम अभिनय यांच्यामुळे त्यांचा स्वतःचा असा चाहता वर्ग तेव्हाही होता आणि आजही शाबूत आहे. त्यांच्या अकाली नि’धनानंतर शुभांगीजींवर सगळी जबाबदारी येऊन पडली.

पण या सगळ्या परिस्थितीत त्यांनी स्वतःला आणि मुलीला – सखीला- सांभाळत वाटचाल केली. यात त्यांच्या घरच्यांची साथ होतीच. या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर आणि स्वतःच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर शुभांगीजींनी सदैव उत्तमोत्तम कलाकृती साकार करण्यात सिंहाचा वाटा उचलला. वर मालिकांचा उल्लेख झाला आहेच. त्यांनी अभिनित केलेले चित्रपट म्हणजे हे राम, मोक्ष, बोक्या सातबंडे, अगं बाई अरेच्चा, झेंडा, कोण आहे रे तिकडे, स सासूचा आणि इतर. तसेच त्यांनी अभिनित केलेल्या नाट्यकृती म्हणजे सूर राहू दे, साखर खाल्लेला माणूस. या कलाकृतींची केवळ नावं वाचूनच आपल्याला शुभांगीजींच्या कामाची व्याप्ती कळावी. कारण सातत्याने उत्तम काम करत राहणं आणि तेही विविध माध्यमांतून, हे एक मोठं आव्हान कलाकारांसमोर असतं. पण मोठे कलाकार आपल्या कारकिर्दीत मोठे का होतात याच्या मुख्य कारणापैकी एक कारण म्हणजे त्यांचं सातत्य.

जे आपल्याला शुभागींजींच्या कारकीर्दीत दिसून येतं. गेली काही दशकं शुभांगी जी कार्यरत आहेत. आता त्यांच्या जोडीला त्यांची आणि मोहन गोखले यांनी मुलगी सखी सुद्धा आहे. मुलगी सखी गोखले हि सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शुभांगी जींनी आपल्या कलाकृतींतून प्रेक्षकांना नेहमीच आनंद दिला आहे. या पुढेही त्यांच्या व्यक्तिरेखा आणि कलाकृती हा आनंद प्रेक्षकांना देत राहतील हे नक्की. शुभांगीजींनी त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! वर दीप्ती केतकर यांचा उल्लेख झाला. आपल्याला आमच्या टीमने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतलेला लेख वाचायचा असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन दीप्ती केतकर असं लिहून सर्च केल्यास आपल्याला त्यांच्या विषयीचा लेख वाचण्यास उपलब्ध होईल.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.