Breaking News
Home / मराठी तडका / येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील कलाकार आणि त्यांची थोडक्यात माहिती

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील कलाकार आणि त्यांची थोडक्यात माहिती

मराठी गप्पावरून गेल्या बऱ्याच काळात आपण वायरल व्हिडियोज विषयी वाचलं. त्यामानाने मालिकाविश्वाविषयी अंमळ कमीच लिहिलं आमच्या टीमने. पण आज हीच उणीव आमची टीम भरून काढणार आहे. आज आपण नव्याने दाखल झालेल्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील काही कलाकारांची आज थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. चला मग वेळ का दवडायचा ?

स्वीटू : व्यक्तिरेखेच्या नावाप्रमाणेच गोड अभिनेत्री. अभिनयाची लहानपणापासून आवड असणारी. नवनीत च्या जाहिरातीत लहानपणीच झळकलेली. पुढे तिने अभिनयाचं रीतसर शिक्षण घेतलं आणि आपली कारकीर्द सुरू ठेवली. या काळात तिने प्रहसन सादर करणाऱ्या मालिकांमध्ये काम केलं, टाईमपास सारख्या अफलातून सिनेमाचा ती भाग होती आणि आत्ता ती या नवीन मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत झळकते आहे. तिची भूमिका अनेकांना आवडते आहे. तिच्या सोशल मीडियावरील वाढत्या लोकप्रियतेवरून हे कळून येतं. मराठी गप्पाच्या टीमकडून अन्विता हिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

ओंकार : एवढी गोड नायिका असताना तिचा नायक सुदधा तेवढाच चार्मिंग हवा की नको. अर्थातच हवा आणि तसाच या मालिकेचा नायक आहे. शाल्व किंजवडेकर असं या नायकाचं नाव. शाल्व हा मूळचा पुणेकर. त्याने अनेक एकांकिका, नाटकं, शॉर्ट फिल्म्स मधून काम केलेलं आहे. स्वीटू सोबतची ओंकारची जोडी प्रेक्षकांना आवडते त्यात शाल्व याचाही महत्वाचा वाटा आहेच. अन्विता प्रमाणे शाल्व याचेही चाहते वाढत असून, त्या दोघांचा उत्तम अभिनय आणि कॅमेऱ्यासमोरील आणि कॅमेऱ्यामागील ट्युनिंग कारणीभूत आहे. शाल्व यास त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

नलिनी : स्वीटू आणि ओंकार यांची जेवढी चर्चा या मालिकेच्या चाहत्यांमध्ये होते, तेवढ्याच प्रमाणात नलिनी ही व्यक्तिरेखाही चर्चिली जाते. याच श्रेय जातं, उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना दीप्ती केतकर यांना. दीप्ती यांना आपण अनेक मालिकांतील लोकप्रिय व्यक्तिरेखांसाठी जसे ओळखतो तसेच त्यांच्या नृत्याविष्कारासाठीही. गेल्या काही काळात दीप्ती यांनी स्वतःचा लुकही उत्तम रीतीने बदलला असून, त्यांच्या या मॉडर्न लुकचीही चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये होतंच असते. दीप्ती यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

वसंतराव : स्वीटू चे वडील ही अजून एक प्रसिद्ध झालेली व्यक्तिरेखा. त्यांचं साधं राहणीमान त्यांच्या व्यक्तिरेखेला शोभतं. ही व्यक्तिरेखा साकार केली आहे, उदय साळवी यांनी. उदय साळवी यांना आपण याआधी काही मालिकांमधून ही पाहिलं आहे. घाडगे अँड सून ही त्यातलीच एक सुपरिचित मालिका. उदय यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

मालविका : आदिती सारंगधर म्हणजे वैविध्यपूर्ण भूमिका यांची हमखास हमी. कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी, शिव काळातील व्यक्तिरेखा अथवा मालविका सारखी खल भूमिका. आदिती या अगदी उत्तम रीतीने प्रत्येक भूमिका साकार करत असतात. तसेच रंगभूमी, सिनेमा, मालिका अशा विविध माध्यमांत त्यांचा वावर असतो. कोणत्याही नायक नायिकेला महत्व मिळते त्यात त्यांचा चांगुलपणा असतोच सोबत खल व्यक्तिरेखाही तेवढीच तगडी असावी लागते. आदिती या ही जबाबदारी अगदी उत्तम रीतीने पार पाडताना दिसतात. आदिती यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

मोमो : उत्तम मॉडेल आणि अभिनेत्री, म्हणून नावारूपास येणाऱ्या मीरा जग्गन्नाथ हिने मोमो ही व्यक्तिरेखा अगदी खुबीने सादर केली आहे. मीरा हिला आपण पी.इन.जी. ज्वेलर्स आणि इतर प्रथितयश ब्रँड्स च्या जाहिरातीतून पाहिलं असेलंच. मीरा हिने काही म्युझिक व्हिडियोज मधूनही अभिनय केला आहे आणि येत्या काळात तिचा इलुईलु हा चित्रपट प्रदर्शित होईल. अभिनयासोबतच ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगा करते. असं असलं तरीही खाण्यावरही तिचं तितकंच प्रेम आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून हे प्रामुख्याने दिसून येतं. या उदयोन्मुख अभिनेत्रीस मराठी गप्पाच्या टिमकडून पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

शकू : शुभांगी गोखले. बस्स नाम हि काफी है. व्यक्तिरेखा विनोदि असो, गंभीर असो वा अजून कोणतीही. प्रत्येक व्यक्तिरेखेचं मर्म ओळखून ती त्या पद्ध्तीने साकार करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शुभांगी जी. त्यांनी साकार केलेली श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतील श्यामला ही व्यक्तिरेखा आपल्या आजही लक्षात आहेच. त्याचप्रमाणे या मालिकेतील प्रेमळ सासूची व्यक्तिरेखाही लक्षात राहते आहे आणि यापुढेही लक्षात राहील हे नक्की. त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

मोहित : निखिल राऊत या गुणी अभिनेत्याला आपण त्याच्या विविध भूमिकांसाठी ओळखतो. मालिका, नाटकं, चित्रपट अशा विविध माध्यमांतून त्याचा वावर सदैव प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळतो. त्याने फर्जंद, फत्तेशिकस्त अशा लोकप्रिय चित्रपटांतून कामे केली आहेत. तसेच गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमातून त्याने खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकार केली होती. त्याचं अभिनेता म्हणून वेळोवेळी कौतुक हे झालेलं आहेच. त्याच्या मोहित या भूमिकेसाठीही त्याचं कौतुक होतं आहे. अशा या गुणी अभिनेत्यास मराठी गप्पाच्या टिमकडून पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

चिन्या : मालिकेतील अजून एक महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे चिन्या. स्वीटूचा भाऊ. ही व्यक्तिरेखा साकार केली आहे अर्णव याने. अर्णव हा मूळचा मुंबईकर. शालेय जीवनापासूनच त्याने अभिनय क्षेत्रात रस घेतला होता. त्याने आणि त्याच्या मित्र मैत्रिणींनी अभिनय स्पर्धांमध्ये शाळेसाठी अनेक पारितोषिकं पटकावली आहेत. क्रिकेट आणि महेंद्र सिंघ धोनी यांचा चाहता असलेला आपला मित्र, अभिनयातही उत्तम फटकेबाजी करतो आहे. अर्णव यांस त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

रॉकी : रॉकी ही दमदार व्यक्तिरेखा तितक्याच दमदार अभिनेत्याने वठवली आहे. त्रियुग मंत्री असं या अभिनेत्याचं नाव. त्याला आपण याआधी संकट मोचक महाबली हनुमान, विघ्नहर्ता गणेश, महाराणा प्रताप या मालिकांमधून पाहिलं आहेच. येत्या काळात त्याचा ‘अजिंक्य’ हा चित्रपट ही येतो आहे ज्यात तो रुहान ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. त्रियुग यांस त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.