Breaking News
Home / मराठी तडका / ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील हा अभिनेता हिंदीत आहे खूप लोकप्रिय, बघा रॉकीची जीवनकहाणी

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील हा अभिनेता हिंदीत आहे खूप लोकप्रिय, बघा रॉकीची जीवनकहाणी

मराठी गप्पाच्या टीमने ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील अनेक कलाकारांची थोडक्यात ओळख करून देणारा लेख लिहिला आहेच. तसेच त्यातील अनेक कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे लेख वेळोवेळी लिहिले गेले आहेत. या सगळ्यांना उत्तम वाचक प्रतिसाद मिळाला. पण या मालिकेतील काही कलाकारांविषयी लेख लिहिणं राहून गेलं होतं. पण आता मराठी गप्पाची टीमने ही बाब लक्षात घेऊन, आपल्या भेटीस या मालिकेतील एका महत्वपूर्ण कलाकाराच्या कारकिर्दीचा आढावा आजच्या या लेखातून आणला आहे. इतर कालाकारांविषयी टप्प्याटप्प्याने लिहुच. या कलाकाराचं नाव आहे त्रियुग मंत्री. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत त्याने रॉकी ही भूमिका साकार केली आहे.

त्रियुग याने याआधीही अनेक मालिकांमधून अभिनय केलेला आहे. प्रामुख्याने पौराणिक मालिकांतील त्याची ऐतिहासिक पात्रं खूप गाजली. विघ्नहर्ता गणेश या मालिकेत त्याने यमराज ही भूमिका साकार केली होती. तसेच संकट मोचक हनुमान या मालिकेतही त्याने अभिनय केला होता. अशोका या मालिकेत सम्राट अशोक याच्या सेनापतीची व्यक्तिरेखा त्याने साकारली होती. तर महाराणा प्रताप या मालिकेत चक्रापाणी ही व्यक्तिरेखा त्याने उभी केली होती. त्याने अन्य हिंदी मालिकांतही अभिनय केलेला आहेच. कुल्फी कुमार बाजेवाला, फियर फाईल्स, सावधान इंडिया ही त्याची उदाहरणं. मराठीतही त्याने मालिकांतून अभिनय केलेला आहे. लक्ष्य ह्या गाजलेल्या मालिकेचा तो भाग होता. काही लघु चित्रपटातूनही त्याने अभिनय केलेला आहे. त्रियुग याचे कुटुंबिय सुद्धा कला क्षेत्राशी निगडित आहेत आणि होते. त्रियुग याचे आई वडील दोघेही नाट्यक्षेत्राशी निगडित होते. तसेच त्रियुग याची मोठी बहीण नेश्मा चेंबूरकर या प्रसिद्ध व्हॉइस ओवर आर्टिस्ट आहेत. तसेच नेश्मा यांच्या लहान मुलांनी सुद्धा व्हॉइस ओवर क्षेत्रात पदार्पण केलेले आहे.

अभिनयासाठी कसून मेहनत घेणारा हा कलाकार आपल्या आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्वासाठी व्यायामासाठी ही कसून मेहनत घेतो. तसं असलं तरीही तो एक खवय्या सुदधा आहे. त्रियुग हा प्राणी प्रेमी असून त्याच्याकडे एक श्वान आहे, ज्याचं नाव मिस्टर ह्युज असं आहे. तसेच त्रियुगला मोकळ्या वेळेत व्हिडिओ गेम्स खेळायलाही आवडतं, असं दिसतं. हिंदी मराठी मालिकांतून घराघरात पोहोचलेला हा कलाकार येत्या काळात आपल्याला बहुप्रतिक्षित ‘अजिंक्य’ या चित्रपटातुन दिसेल. तसेच त्रियुग याची कारकीर्द पाहता तो सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करत आलेला दिसून येतो. येत्या काळातही त्याचं हे वैविध्यपूर्ण सातत्य कायम राहील हे नक्की. त्याच्या नवीन चित्रपटासाठी आणि पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून त्रियुग यांस मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.