लहान मुलं कधी काय बोलतील ह्याचा नेम नसतो. त्यांच्या निरागसपणा मुळे जे मनात ते ओठांवर अशी त्यांची मानसिकता असते. त्यामुळे अनेक वेळेस आजूबाजूंच्यांना हसू आवरत नाही तर काही वेळेस ते रडवेले झाले तर आपल्यालाही वाईट वाटतं. अशा या लहान मुलांच्या करामती, त्यांचं वागणं हे पूर्वी कॅमेऱ्यात कैद करता आलं तर असं वाटे. मोबाईल फोन्स मुबलक झाल्याने हे प्रत्यक्षात आलं आणि पाहता पाहता, लहान मुलांचे अनेक गंमतीशीर व्हिडियोज वायरल होऊ लागले. सध्या तर तसा ट्रेंडचं रुजू झाल्यासारखी परिस्थिती आहे. अशावेळी असाच एक वायरल व्हिडियो लक्ष वेधून घेतो.
हा व्हिडिओ आहे एक लहान मुलीचा. तिला इंग्रजी शाळेत दाखल केलं आहे. पण शाळेत गेल्यावर या मुलीला भूक लागते आणि दूध हवं असतं, म्हणून ती रडत असते. शिक्षिकेच्या लक्षात येतं. भर वर्गात रडणं असल्यामुळे ती त्या मुलीला त्याबद्दल विचारते. पण रडणं अनावर झाल्याने शिक्षिका आपल्याला काय सांगताहेत हे तिच्या लक्षात येताना दिसत नाही. परिणामतः थोडे शाब्दिक विनोद घडतात. जसे की हँड इन द बॅक म्हणजे हात पाठी घेऊन उभी राहा असं म्हंटलं असता, तिला बिचारीला वाटतं की शाळेसाठी आणलेल्या बॅग विषयी शिक्षिका बोलते आहे. तिला शिक्षेकेने वेफर्स दिलेले असतात, पण तिला बिचारीला दूध हवं असतं. तिचं रडणं थांबवण्यासाठी शिक्षका तिला डोळे पुसायला सांगते, तर तिला अजून रडू येतं. शिक्षिकेचा राग अनावर होऊ लागतो. आवाज चढू लागतो. पण मग खरं कारण कळल्यावर मात्र आजूबाजूने हास्याचे धुमारे फुटतात.
कारण आईने हातरुमाल नाही दिला म्हणून आता तिला रडायला येत असतं. तिची ही तक्रार ऐकून शिक्षिका, त्या मुलीच्या आईला ओरडणार असं म्हणते. पण आईला नका ओरडू म्हणून ही मुलगी त्यांना सांगते. का? असं विचारल्यावर आईकडून उद्या हातरुमाल घेऊन येईन असं वचनही देते. एकूणच पूर्ण व्हिडिओमध्ये तिची अवस्था पाहून तिची किवही येते आणि तिच्या निरागस उत्तरांनी हसू ही उमटतं. आम्ही तो व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पहा. आणि व्हिडीओ मनोरंजन म्हणून पाहून त्या मागील मुलीच्या निरागस वागण्यामुळे घडणारा विनोद हेच ह्या व्हिडीओचा मुख्य उद्देश आहे.
बघा व्हिडीओ :