Breaking News
Home / मनोरंजन / “रडून झालं कि सांग तोपर्यंत मी पुस्तक वाचते”… व्हिडीओचा शेवट पाहून हसू आवरणार नाही

“रडून झालं कि सांग तोपर्यंत मी पुस्तक वाचते”… व्हिडीओचा शेवट पाहून हसू आवरणार नाही

लहान मुलं घरात असली म्हणजे घर कसं बोलतं राहतं. हसत खेळत आपला वेळ कधी जातो कळत नाही. त्यांचं निरागस वागणं, लहान असतील तर बोबडे बोलणं, प्रश्न विचारून भंडावून सोडणे हे सगळंच मनात साठवुन ठेवतो आपण. पण काही वेळा रागही येतो. दोन चापट्या ठेऊन द्याव्यात असही वाटतं. पण शेवटी त्यांचा तो निरागस चेहरा बघितला की राग कुठच्या कुठे पळून जातो.

याच सोबत काही वेळा मुलांचं वागणं हे अगदी अंदाज बांधता येण्यासारखं ही असतं. त्यामुळे आता पुढे ही मुलं काय बोलू शकतील किंवा करू शकतील याचा अंदाज बांधता येतो. पण ते प्रत्येकाला जमतं अस नाही. मात्र या मुलांचे सगळे स्वभाव वैशिष्ट्य त्यांच्या आयांना अगदी पाठ होऊन जातात. त्या अगदी त्यांचं वागणं कोळून प्यायलेल्या असतात. त्यामुळे शाळेत असताना आपण कितीही गुड बॉय असलो तरी घरी आपण किती मस्तीखोर आहोत हे आईला माहीत असतं. तसंच काही वेळा एखादं लहान मूल रडताना पाहतो आणि आपल्याला वाईट वाटतं. अरे त्याच्याकडे कोणीतरी लक्ष द्या अस आपलं म्हणणं असतं. पण त्याचवेळेस त्या मुलाची वा मुलीची आई अगदी शांत असते. आजच्या भाषेत अगदी चिल असते म्हणा ना. ती एक तर काही तरी कृती करते किंवा असा काही डायलॉग मारते की थोड्या वेळाने वातावरण शांत झालेलं असतं. जणू काही त्या मुलांचं रडणं, रागावणं आणि रुसणं किती वेळ चालणार आहे याचा जणू त्यांना अंदाज आलेला असतो.

त्यामुळे काहीच वेळात आपल्या समोर रडणारं पोर शांत होतं आणि आईला बिलगत. तेव्हा वाटतं अरे आता रडत होतं ना हे बाळ. अर्थात आया पोरांना रडूच देत असतात असं नाही. सहसा रडू येणार नाही आणि आलं तरी जास्त वेळ टिकणार नाही याकडे त्यांचा कटाक्ष असतो. पण काही वेळा गोष्टी थोड्या जास्त होतात. अशा वेळी मग वर उल्लेख केलेला एखादा डायलॉग किंवा कृती काम करून जाते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे काही काळापूर्वी आपल्या टीमने पाहिलेला एक व्हिडियो होय. हा व्हिडियो आहे एका आईचा आणि त्यांच्या लहान मुलाचा. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा लहान मूल आपल्या समोर बसलेलं दिसून येत. ते रडत असतं. अरे या बाळाला काय झालं ही आपली पहिली प्रतिक्रिया असते. तेवढ्यात आपल्याला त्या बाळाच्या आईचा आवाज ऐकू येतो. या बाळाची आई एक वाक्य म्हणतात आणि तेच वाक्य पूर्ण व्हिडियोभर आपल्या लक्षात राहतं. त्या म्हणतात ‘तुझं रडून झालं की सांग, तोपर्यंत मी पुस्तक वाचते’. त्यांचं हे बोलणं ऐकून क्षणभर आपल्याला काही कळत नाही. अस काय बोलताहेत या ताई अस वाटून जातं. पण एवढ्या वर्षांचा अनुभव हेच सांगतो की प्रत्येक आईला आपल्या मुलामुलींची नस माहिती असते. त्यामुळे त्यांच्या या बोलण्यात काही ना काही मतितार्थ असणार हे कळून येतं.

बरं इथे वेळ जात असतो. समोरचं बाळ तर रडतच असतं. आता काय होणार अस वाटत असतं. काही सेकंद अशीच जातात. हा व्हिडियो तसा मोठा नाहीये. पण या मधल्या वेळेमुळे तो थोडा मोठा वाटण्याची शक्यता आहे. पण तो व्हिडियो बघत राहण्यात आनंद आहे. कारण व्हिडियोच्या शेवटी हे बाळ रडायचं थांबत पण सोबत असा काही डायलॉग मारतो की आपल्याला हसूच फुटतं. हा डायलॉग अख्खा व्हिडियोची मजा देऊन जातो. एवढा वेळ आपण थांबुन हा व्हिडियो पाहिला याचं बरं वाटतं. या व्हिडियोतील त्या ताईंचा आत्मविश्वास आणि या पोरांचं निरागस बोलणं आपलं मन जिंकून जातं. आपण ही हा व्हिडियो एव्हाना पाहिला असेल तर आपल्याला ही आवडला असेल. पण आपण नसेल पाहिला तर जरूर पहा. आपल्याला मनापासून आवडून जाईल. पण त्यासाठी व्हिडियो पूर्ण बघा बरं का. थोड्याच वेळेचा आहे. तेव्हा घाई करू नका. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.