टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा जरी ८२ वर्षांचे असले तरी त्यांची कामाप्रती असेलेली सक्रियता अजिबात कमी झालेली नाही. कामात सक्रिय असतानाच ते सोशिअल मीडियावर देखील आवर्जून लक्ष देत आहेत. नुकतिच सोशल मीडियावर त्यांनी आपली सक्रियता वाढविली आहे. सोशल मीडियावर त्यांनी काही वैयक्तिक माहितीही शेअर केली आहे आणि व्हॅलेंटाईन वीक मध्ये आपल्या प्रेमाची कहाणी सांगितली आहे. त्यांनी आपल्या प्रेमाची कहाणी ह्यूमन्स ऑफ बॉम्बे या फेसबुक पेजवर शेअर केली. त्यांचे लग्न होणारच होते परंतु एका घटनेनंतर त्यांचा संबंध संपला. तुम्हाला सांगू इच्छितो कि या नंतर रतन टाटाचे लग्न झाले नाही आणि ते अजूनही पण अविवाहित आहेत.
सोशल मीडियावर लिहिली ही गोष्ट
त्यांनी लिहिले कि, लॉस एंजेलिसमध्ये कॉलेज पूर्ण केल्यानंतर मी एका आर्किटेक्चर कंपनीत नोकरी सुरू केली. १९६२ चा तो काळ बराच चांगला होता. लॉस एंजेलिस मध्येच मी प्रेमात पडलो. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. हळू हळू आमचे प्रेम वाढत गेली. त्यानंतर लग्नाचीही पुष्टी झाली. त्याच दरम्यान माझ्या आजीची तब्येत थोडी खराब असल्यामुळे मी परत भारतात जाण्याचा निर्णय घेतला. मला वाटलं कि, ज्या व्यक्तीशी मी लग्न करू इच्छितो ती देखील माझ्याबरोबर येईल. पण त्याकाळात भारत आणि चीन यांच्यात युद्ध चालू होते आणि यामुळे तिचे पालक तयार नव्हते आणि आमचे नातं तिथेच संपलं.
आणखी काही वैयक्तिक गोष्टीही शेअर केल्या
रतन टाटांनी बर्याच गोष्टी शेअर केल्या. त्यांनी सांगितले की त्यांचे आईवडील घटस्फोटित होते. आजीने त्यांचे पालन केले. आईवडिलांच्या विभक्ततेमुळे, त्यांना आणि त्यांच्या भावाला काही समस्या आल्या परंतु तरीही बालपण आनंदी होते. टाटांनी सांगितले की घटस्फोट आज इतका सामान्य त्या काळात न्हवता. आईने दुसरे लग्न केले होते. शाळकरी मुले सर्व प्रकारच्या गोष्टी बोलत असत पण आजी अशा परिस्थितीत शांत कसे राहायचं, हे सांगायची. त्यांनी सांगितले की दुसर्या महायुद्धानंतर आजी दोन्ही भावांना सुट्टीसाठी लंडनला घेऊन गेली आणि तिथेच तिने जीवनातील मूल्यांचे महत्त्व सांगितले. प्रतिष्ठा ही सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे असं आजी म्हणायची. रतन टाटा म्हणाले की, वडिलांसोबत बर्याचदा त्यांचे भांडण होत असत. मला व्हायोलिन शिकायचे होते आणि वडिलांनी मला पियानो शिकायला हवे असे म्हणत होते. मला अमेरिकेला जायचे होते आणि त्यांना मला ब्रिटनला पाठवायचे होते. मला आर्किटेक्ट व्हायचे होते आणि त्यांना मला इंजिनिअर बनवायचे होते.