सिग्नलपासून ते हेल्मेटपर्यंत वाहतुकीचे नियम मोडणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहात असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एका रिक्षाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या रिक्षाने वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावर बसवून कार्यक्रम केला. खरं तर तुम्हाला वाटलं असेल की, नियम रिक्षाने नाही तर रिक्षाचालकाने मोडलेला असतो… पन इथे विषय वेगळाचय भावांनो…. पोलिसांकडून वाहतूक नियमाचे पालन करण्यासाठी वारंवार सांगितलं जातं. तरी काही लोकं वाहतूक नियमाकडे सर्रास दुर्लक्ष करतात. एका रोडवर वाहतूक पोलिसांनी एका ऑटो रिक्षा चालकाला वाहतूक नियमाचं उल्लंघन करताना पकडलं, असं सगळ्यांना सुरुवातीला वाटू शकतं. पण इथं इलोन मस्कने बनवलेली म्हणजे चालकाविरहित रिक्षा आहे की काय? असाही प्रश्न पडू शकतो. पण इथं आहे वेड लागलेली रिक्षा, ती पण आऊट ऑफ कंट्रोल…
या आउट ऑफ कंट्रोल झालेल्या रिक्षाचा प्रकार पाहून सगळे लोकही चक्रावले. तर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सही अवाक झाले. तर विषय असाय की, एका बंगाट म्हणजे फुल तर्राट असलेल्या रिक्षा चालकाने जोरात रिक्षा चालवली पण पुढे त्याच्या डोक्यात आले की, आपण एखादा स्टंट मारू… पण स्टंट राहिला बाजूला, वेगळाच खेळ इथे होऊन बसला. हा रिक्षाचालक रिक्षातून बाहेर फेकला गेला आणि सगळ्यांना झटकाच बसला. कारण म्हणजे रिक्षाचालक जखमी झाला नाही, सुखरूप होता पण रिक्षा मात्र चालूच होती. तीही एकच दिशेने फिरत असल्याने गोल गोल वेढे घालत त्या रिक्षाचे फिरणे चालुच होते. ड्रायव्हर नसताना खूप वेळ रिक्षा एकाच चौकात फिरत होती. ट्विटर यूजर सदफ आफरीन या यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच हैराण आहेत आणि हसतही आहेत. तुम्ही सिनेमात रिमोटने चालणारी गाडी पाहिली असेल किंवा काही सीन्समध्ये भूतांकडून गाडी चालवली जाते.
असाच नजारा प्रत्यक्षात दिसला तर नक्कीच अवाक् व्हाल ना… हा व्हायरल व्हिडीओसुद्धा अगदी असाच आहे. व्हिडीओ बघताना पुढे दिसून येते की, रिक्षाला आवरण्याचा अनेक लोक प्रयत्न करत आहेत पण रिक्षा काही कंट्रोल।होत नाहीयेत. विशेष बाब म्हणजे रिक्षाचा स्पीड पण कमी झालेला नाहीए… शेवटी एक जण कसाबसा रिक्षाचा स्पीड कमी करतो आजूबाजूला असणारे लगेच रिक्षावर झेप घेतात आणि शेवटी रिक्षावर नियंत्रण मिळवण्यात लोक यशस्वी होतात. व्हिडीओ शेअर करत तरूणीने लिहिलं की, ‘एक ऑटो रिक्षा आउट ऑफ कंट्रोल झाला. ड्रायव्हरशिवाय तो रस्त्यावर फिरत होता. लोकांनी या रिक्षाला कंट्रोल. सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही’. हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :