Breaking News
Home / मनोरंजन / रशियन डान्सरचा नादखुळा, भारतीय गाण्यावर केलेला डान्स पाहून तुम्हीसुद्दा अभिमानाने कौतुक कराल

रशियन डान्सरचा नादखुळा, भारतीय गाण्यावर केलेला डान्स पाहून तुम्हीसुद्दा अभिमानाने कौतुक कराल

आपल्या भारतीय गायन आणि नृत्याची चर्चा तसेच प्रशंसा ही जगभर होत असते. या दोहोंचा चाहतावर्ग हा जगभर पसरलेला आहे. त्यातही रशियन नागरिकांना आपल्या भारतीय नृत्य आणि गायन कलेचं विशेष आकर्षण असल्याचं दिसून येतं. यातील नृत्य प्रकारात तर त्यांनी अगदी मनापासून आपलासा केला आहे असंच काही वेळेस वाटतं. हे म्हणण्याचं कारण म्हणजे अनेक रशियन युवती या भारतीय नृत्यप्रकार शिकताना दिसतात. तसेच अनेक जणी या स्वतःचे डान्स ग्रुप्स ही चालवत असतात.

आता डान्स ग्रुप म्हंटला की अनेक वेळेस त्यांचं स्वतःचं असं युट्युब चॅनेल ही असतं. या युट्युब चॅनेल वरून या सगळ्या रशियन युवतींचा उत्तम असा डान्स बघता येतो. बरं त्या केवळ एकच एक परफॉर्मन्स करतात अस नाही. बॉलिवूड पासून ते लावणी आणि बरेच नृत्यप्रकार त्या करताना दिसतात. पण त्यातही बॉलिवुडच्या गाण्यांवर त्यांचं विशेष प्रेम असलेलं दिसून येतं. रशियन नागरिकांचं आणि बॉलिवूड सिनेमा, गाणी आणि नृत्याचं हे नातं अगदी राज कपूर साहेबांच्या काळापासून किती घट्ट आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे या रशियन युवती जेव्हा बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करतात तेव्हा अगदी मनापासून डान्स करत असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो होय.

खरं तर हा चार वर्षांपूर्वीचा वायरल व्हिडियो आहे. पण आजही तेवढाच मनोरंजक आहे. कारण यात एका रशियन युवतीने जो डान्स केला आहे तो आजही आवडून जातो. या रशियन युवतीचं नाव अलेस्या असं आहे. अलेस्या यांनी काही वर्षांपूर्वी स्वतःचं एक युट्युब चॅनेल सुरू केलं होतं. नंतर त्यात त्यांनी जास्त पोस्ट केल्या नाहीत. पण ज्या पोस्ट केल्या त्या तुफान प्रसिद्ध झाल्या आहेत. यातीलच त्यांची पहिली पोस्ट म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो. या व्हिडियोत अलेस्या आपल्याला ‘रंगीलो मारो ढोलना’ या गाण्यावर परफॉर्मन्स करताना दिसतात. हे गाणं किती लोकप्रिय आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण यांमुळे काही वेळेस परफॉर्मन्स देत असताना थोडं दडपण येऊ शकतं. पण अलेस्या मात्र अगदी सहजपणे हा डान्स करून जातात. बरं सहज करतात म्हणजे इतक्या सहज की एखादी भारतीय मुलगीच डान्स करते आहे असं वाटावं. पण हे अस का वाटतं ? तर त्याचं उत्तर आहे की त्यांचे हावभाव. डान्स करताना हातांचा आणि पायांचा मुबलक वापर होत असतोच. पण सोबतच त्याला अनुसरून चेहेऱ्याचे हावभाव ही असावे लागतात. अनेक परदेशी नागरिक जेव्हा भारतीय डान्स करू पाहतात तेव्हा नेमक्या याच गोष्टीत थोडे कमी पडतात. त्यामुळे होतं काय की बाकी स्टेप्स उत्तम करूनही चेहऱ्यावरचे भाव जास्त न बदलल्याने परफॉर्मन्स म्हणावा एवढा परिणामकारक होत नाही. पण हीच बाब अलेस्या यांच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत होताना दिसत नाही.

त्यांचा हा परफॉर्मन्स अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपल्याला अगदी आपलासा वाटतो. त्यांच्या डान्स स्टेप्स, हावभाव यातून त्या या भारतीय गाण्याला पूर्णतः न्याय देतात. तसेच गाण्यानुसार त्या स्वतःच्या डान्सचा वेगही कमी जास्त करताना दिसतात. त्यामुळे गाण्याला अनुसरूनच असा हा परफॉर्मन्स होतो. त्यामुळे आपसूकच हा परफॉर्मन्स जसा आवडून जातो तसाच लक्षात ही राहतो. आपणही जर हा परफॉर्मन्स बघितला असेल तर आपण आम्ही वर उल्लेख केलेल्या बाबींच निरीक्षण केलं असेलच. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. त्याचा आस्वाद घ्या आणि मग विचार करा. आम्ही लिहिलेल्या गोष्टी आपल्याला ही जाणवतील. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *