Breaking News
Home / मनोरंजन / रस्तावर डान्स करत होती मुलगी, बाजूने अचानक कुत्रा आला आणि बघा पुढे काय केले ते

रस्तावर डान्स करत होती मुलगी, बाजूने अचानक कुत्रा आला आणि बघा पुढे काय केले ते

प्राण्यांविषयी आपल्याला नेहमीच एकप्रकारचं कुतूहल असतं. तसेच हे प्राणी, पाळीव असतील तर त्यांच्या विषयी विशेष कौतुक ही असतं. कारण पाळीव प्राणी म्हंटले की आपण म्हणू ते ऐकणार, नाही ऐकलं तरी गोड नखरे करणार, त्यामुळे आपल्याला ते अजून गोड वाटणार हे होत असतं. त्यामुळे एकप्रकारे आनंद आणि समाधान मिळत असत. ज्यांच्या ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांच्याकडे हे होत असतं. त्या सगळ्यांत वेळ कसा जातो ते कळतही नाही. तसेच या सगळ्यांत प्राण्यांना अगदी जवळून निरखता येतं. प्राण्यांचे मूड ही कसे बदलतात, त्याला कारणं काय वगैरे सगळं अगदी नंतर तोंडपाठ होऊन जातं.

पण हे सगळं पाळीव प्राण्यांच्या बाबतीत शक्य होतं. तरीही प्राणी म्हंटले की थोडी तरी अनिश्चितता असतेच. अर्थात त्यांच्या अनिश्चित वागण्याला कारणं बरीच असू शकतात. त्यामुळे सर्वस्वी त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी जबाबदार धरता येत नाही. पण त्यांचं हे वागणं काही वेळा आपल्या अंगाशी येऊ शकतं. प्राणी पाळीव नसेल तर त्यांचा मूड अचानक का बदलला वगैरे कारणं ही पटकन कळू शकतीलच अस नाही. तसेच त्याचा अंदाज ही लावता येत नाही.

खासकरून सदर प्राणी मोकाट असले आणि पाळीव गणले जात असले तरी ! याचाच काहीसा प्रत्यय एका ताईला आला. म्हणजे तिला अनुभव आला आणि तो पुढे सोशल मीडियावर आला. खरं तर हा अनुभव या ताई करत असलेल्या डान्स व्हिडियो मधेच रेकॉर्ड झालेला पाहायला मिळतो. होतं असं की या ताई एके ठिकाणी उभ्या असतात. सायंकाळ वा रात्रीची वेळ असावी. ताई आणि एक कुत्रं सोडून रस्त्यावर कोणी दिसून येत नाही. अर्थात नंतर कोणी एक व्यक्ती कॅमेरा सांभाळत असावी हे जाणवतं. तसेच दूर एक दुसरा कुत्रा नंतर दिसून येतो. असो. पण हे सगळं कळेपर्यंत मूळ घटना होऊन गेलेली असते. होतं काय, तर ताई एका मस्त गाण्यावर डान्स करत असते. ‘बिन तेरे इस जहां मैं’ असं एक सुप्रसिद्ध गाणं आहे. त्यावर ताईंचा डान्स चालू असतो. ताईंच्या स्टेप्स बहुधा बरोबर असतात पण जागा चुकते. कारण त्या ताई एका इमारती जवळच्या रस्त्यावर नाचत असतात. जवळच उभा असलेला कुत्रा हे सगळं निरखत असतो. आता ताईंचा डान्स त्याला आवडत नाही की काय कळतं नाही (अर्थातच कारण दुसरं असणार), पण तो येतो आणि थेट ताईंना चावतो. नेमकं त्यावेळी गाण्यातील, ‘किस मी, किस मी’ या ओळी चालू असतात. यापेक्षा दुर्दैवी योगायोग तो काय म्हणावा. पण एव्हाना ताईंना हा कुत्रा चावल्याचं जाणवतं आणि ती जोरात हात झटकते. ती तरी काय करेल.

अचानक स्वसंरक्षणासाठी जे सुचेल ते करते. त्या नादात, त्या कुत्र्याला ही चपराक बसते आणि तो दूर निघून जातो. नशिबाने ही बाब एवढ्यावरच टळते. निदान आपल्याला तरी एवढंच दिसतं. त्या नंतर काही झालं असावं तर कल्पना नाही. आता हा कुत्रा पिसाळलेला होता वा अजून काही कारण आहे याचीही कल्पना नाही. पण जे होतं ते दुर्दैवी होतं. त्या ताईला जास्त इजा झाली नसावी आणि त्यातून ती लवकर बरी झाली असावी हीच सदिच्छा ! असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *