आपण इंटरनेटवर अनेक वेळेस व्हिडियो बघत असतो. त्यात काही वेळेस दैव बलवत्तर असलेल्या लोकांचे व्हिडियोज ही आपण पाहतो. यात अनेक वेळेस ज्यांना एखाद्या अपघातात दुखापत होऊ शकली असती असे काही जण आश्चर्यकारकरित्या सुखरूप बचावलेले बघतो. एखादा अनर्थ टळला तर आपल्याला अर्थातच बरं वाटतं. त्यामुळे हे व्हिडियोज बघताना भीती वाटत असली तरीही त्यांचा शेवट गोड होतो तेव्हा बरं वाटतं. असाच एक व्हिडियो आपल्या टीमच्या नजरेस पडला. त्याची काहीशी चर्चा ही झाली होतीच. पश्चिम बंगाल येथे झालेल्या एका घटनेबद्दलचा हा व्हिडियो आहे. त्यातील घटना बघून आपणही याविषयी लिहावं असं वाटलं आणि आता हा लेख लिहिला जातो आहे.
या व्हिडियोतील घटना घडते ती केवळ काही सेकंदात. प्रथमतः आपल्याला स्क्रीनच्या उजव्या बाजूने येणारा ट्रक दिसतो. हा मालवाहू ट्रक आपल्याला दिसतो न दिसतो तोच डाव्या बाजूने दोन दुचाकीस्वार आपल्या दुचाकी सकट त्या ट्रक च्या खाली गेलेले आपल्याला दिसून येतात. हे सगळं होतं ते आपली पापणी लवते न लवते तेवढ्यात. त्यामुळे आपली पहिली प्रतिक्रिया ही ‘अरे बाप रे !’ अशीच असते. पुढचा विचारही आपल्याला करवत नाही. पण तेवढ्यात जाणवतं की ट्रक ची गती काहीशी कमी झाली आहे. तेवढ्यात काही क्षणांत ट्रकच्या खालून पहिला माणूस रांगत रांगत बाहेर येतो. एव्हाना आजूबाजूचे काही जण धावत आलेले असतात. तेवढ्यात दुसरा बाईकस्वार ही ट्रकच्या खालून बाहेर येताना दिसतो. नकळत पणे आपले हात तोंडावर जातात. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण चट्कन मनात चमकून जाते. एव्हाना जवळून जाणारी रिक्षा थांबलेली असते.
त्यातील चालक आणि प्रवाशी काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेत असतात. तर आधी आलेला एक माणूस ट्रक ड्रायव्हर कडे जाऊन त्याच्याशी बोलतो. याच सुमारास आपल्याला दिसतं ते ट्रक च्या पुढे असलेलं एकांड बॅरिकेड. कदाचित त्यामुळे सुद्धा ट्रक काहीशा धीम्या गतीत असावा असं वाटतं. तसेच चालकानेही चट्कन इमर्जन्सी ब्रेक दाबले असणार. कारण काही असो, पण त्या दोन तरुणांनी प्रत्यक्ष यमा देवाला आपल्या डोळ्यांसमोरून जाताना पाहिलं असणार. सुदैवाने दोघेही या घटनेत जीवानिशी वाचले हे बघून बरं वाटलं.
या व्हिडियोप्रमाणेच आपली मराठी गप्पाची टीम सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करत असते. आपल्याला ही हे लेख आवडतात. आपण त्यांना सोशल मीडियावर शेअर करता त्यामुळे आमच्या टीमला प्रोत्साहन मिळतं. नवनवीन विषयांवर लेखन करण्याची ऊर्जा मिळते. तेव्हा आपला हा पाठिंबा आपल्या टीमच्या पाठी कायम असू द्या. लोभ असावा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :