Breaking News
Home / ठळक बातम्या / रस्त्यावर थंडीने कुडकुडत होता भिकारी, पोलिसांनी जवळ जाऊन ओळखले तेव्हा धक्काच बसला

रस्त्यावर थंडीने कुडकुडत होता भिकारी, पोलिसांनी जवळ जाऊन ओळखले तेव्हा धक्काच बसला

सद्य परिस्थितीत बदल होणं ही खूपच नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण काही जणांच्या आयुष्यात बदल हा इतका टोकाचा असू शकतो की आपण विचारही करू शकत नाही. आता हीच एक घटना घ्या ना. मध्य प्रदेशात घडलेली ही घटना. तेव्हा मध्य प्रदेशातील पोट निवडणुकांचं वारं वाहत होतं. नेहमीप्रमाणे निवडणूकांत मतदान प्रक्रिया पार पडली आणि मतमोजणीची प्रक्रियाही पार पडली. सगळे पांगले. या काळात पोलिसांवर अर्थातच अतिरिक्त ताण असतो तो होताच. मतमोजणी झाल्यावर डी. सी.पी. रत्नेश तोमर आणि विजय भदौरिया हे आपलं काम संपवून आपापल्या घरी निघाले होते. कडाक्याची थंडी पडली होती. रस्त्यात एक भिकारी अंग चोरून बसला होता. थंडीने कुडकुडत होता. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारपूस करण्यासाठी म्हणून गाडी थांबवली.

विचारपूस केली असता त्यांना धक्का बसला. त्यांनी या भिकारी व्यक्तीला चक्क ओळखले. तो त्यांच्याच बॅचचा अधिकारी निघाला. मनीष मिश्रा असं या पूर्वाश्रमीच्या अधिकाऱ्याचं नाव. रत्नेश यांच्यासोबत त्याने एकत्र पोलीस सेवेत प्रवेश घेतला होता. ही बाब आहे १९९९ सालची. एक उमदा पोलीस ऑफिसर म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या सेवा काळात अनेक ठिकाणी त्याने ठाणेदार या पदावर काम केले होते. एक उत्तम नेमबाज म्हणून त्याची ओळख होती. पण आधी म्हंटल्याप्रमाणे परिस्थिती बदलत गेली. झालं असं की त्यांना सुमारास मानसिक आजार जडल्याचं निदान झालं. त्याचं लग्न झालं होतं. पत्नी आणि इतर नातेवाईकांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केले पण ते निष्फळ ठरले. त्याला वैद्यकीय उपचार देण्यासाठी मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पण ज्या ज्या मनोरुग्णालयात त्यांना दाखल केलं गेलं तिथून ते प्रत्येक वेळी पळून गेले. शेवटी त्याच्या नातेवाईकांनी प्रयत्न सोडले. पत्नीनेही घटस्फो ट दिला. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत गेली आणि शेवटी भिकारी म्हणून रस्त्यावर जगण्याची वेळ आली. डी.एस.पी. रत्नेश तोमर आणि विजय भदौरिया यांनी त्यांना तत्काळ स्वतःचे बूट, जॅकेट देऊ केलं. त्यांना स्वतः सोबत चलण्याचा आग्रह केला पण ते बधले नाहीत. शेवटी त्यांना एका स्वयंसेवी संस्थेकरवी मदत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मनीष यांचे काही नातेवाईक हे उत्तम पदांवर काम करतात असे कळते. मनीष यांचं आयुष्य उत्तम चालु होतं. पण परिस्थितीची चाके फिरली आणि त्यांची आजची हलाखीची परिस्थिती आली.

– Vighnesh Khale

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *