आजच्या ह्या युगात खूपच कमी वेळा असं पाहायला मिळते कि जेव्हा एक व्यक्ती कोणत्याही स्वार्थाशिवाय दुसऱ्या व्यक्तीची मदत करतो. चेहऱ्यावर समाधान देणारे हे दृश्य काही दिवसांअगोदरच उत्तरप्रदेश येथे पाहायला मिळाला. सध्या थंडीने संपूर्ण देशभर उच्चांक गाठले आहे. रात्री सगळी कडे गारठा पडतो. जे घरात आहेत ते चादर किंवा थंडीचे कपडे घालून आपली व्यवस्था करून घेतात. परंतु जे निराधार आहेत, रस्त्यावर राहत आहेत त्यांची मात्र ह्या थंडीच्या गारठ्याने खूप वाईट परिस्थिती झाली आहे. त्यांना नाईलाजाने ह्या थंडीचा सामना कोणत्याही जाड कपड्यांशिवाय किंवा योग्य निवाऱ्याशिवाय करावा लागत आहे. उत्तरप्रदेश येथे सुद्धा खूपच थंडी वाढली आहे. ह्याच दरम्यान एक असे दृश्य पाहायला मिळाले ज्याने माणुसकी अजूनही जिवंत आहे ह्याची प्रचिती येते.
येथील एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहेत. इथे एक पोलीस कॉन्स्टेबल रात्री ड्युटीच्या दरम्यान ज्याप्रकारे एका निराधार व्यक्तीची मदत करतो ते पाहून मनाला खूप बरं वाटतं. खरंतर सोशिअल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ खूप वायरल होत आहे. ह्या व्हिडिओत आपण पाहू शकता कि रस्त्यावर रात्री उशिरा एका निराधार व्यक्ती कोणत्याही गरम कपड्यांशिवाय एका रस्त्याशेजारी कुडकुडत उभा असतो. त्याच्या अंगावर पातळ कपडे घातलेले दिसत आहे. जे थंडीपासून बचाव करण्यास अपुरे पडत आहेत. त्यामुळे ती व्यक्ती थंडीचा मा’रा सहन करत हातात हात दुमडून कुडकुडत उभी आहे. अश्या परिस्थितीत तिथे एक पोलीस कॉन्स्टेबल त्याला आपली खाकी वर्दीतील जॅकेट देऊन थंडी पासून बचाव करण्यासाठी मदत करतो. पोलीस कॉन्स्टेबलचे इतके मोठे मन पाहून निराधार व्यक्ती भावुक होऊन जातो आणि कॉन्स्टेबलचे चरणस्पर्श करतो.
ह्या व्हिडीओला ट्वि’टरवर शिवानी वशिष्ठा नावाच्या एका युजरने शेअर केले आहे. हा व्हिडीओ १० फेब्रुवारीला शेअर केला गेला. त्यानंतर हा व्हिडीओ खूप वायरल झाला आहे. आणि आयपीएस ऑफिसर दीपांसू काब्रा ह्यांनी सुद्धा हे ट्वि’ट ला’ईक केले आहे. व्हिडीओ शेअर करताना शिवानी ह्यांनी कॅप्शन मध्ये लिहलं आहे – ‘मी खाकी आहे. माणुसकी पेक्षा मोठे पुण्य कार्य ह्या जगात कोणते नाही. थंडी पासून कुडकुडत असणाऱ्या एका गरिब व्यक्तीला रात्री ड्युटीवर असणाऱ्या युपीमधील पोलीस कॉन्स्टेबल ह्यांनी आपले जॅकेट काढून त्या व्यक्तीला घातले.’ आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. त्याचसोबत आम्ही आपल्या मराठी गप्पा वेबवर विविध विषयांवरील वायरल लेख लिहिले आहेत. तुम्ही नक्की पहा. आणि तुमच्या भरघोस प्रतिसादाबद्द मनापासून आभार.
बघा व्हिडीओ :
मैं #खाकी हूँ
मानवता से बढ़कर दुनिया मे कोई पुण्य कार्य नही…
ठंड से कांप रहे एक गरीब को रात्रि ड्यूटी पर तैनात यूपी पुलिस के कॉन्स्टेबल ने अपनी जैकेट उतार कर उसे पहना दी।#UPPolice #khakhi pic.twitter.com/qYc6KYaCzE— shivani vashistha (@Shivani_Mzn) February 10, 2021