Breaking News
Home / मनोरंजन / रस्त्यावर पाणी तुंबलं असताना ह्या भावाने आपल्या बहिणीसाठी जे केले ते पाहून तुमचंही मन भरून येईल

रस्त्यावर पाणी तुंबलं असताना ह्या भावाने आपल्या बहिणीसाठी जे केले ते पाहून तुमचंही मन भरून येईल

मुली या नाजूक फुलासारख्या असतात. आई, वडील, भाऊ या सगळ्यांसाठी घरातील मुलगी ही एकदम नाजूक फुलासारखी जपली जाते. वेळप्रसंगी आपल्याला कमी पडलं तरी चालतं पण तिला मात्र काहीच कमी पडणार नाही, याची काळजी घेतली जाते. अगदी तिला असलेला मोठा पण वयाने छोटा भाऊही बहिणीची अगदी आई वडिलांप्रमाणे काळजी घेत असतो.

एखाद्या मुलीच्या आयुष्यात पहिला मित्र, पहिला मुलगा, पहिला जपणारा, जीव लावणारा आणि तेवढाच खोडी काढणारा, प्रत्येक गोष्टींसाठी भांडणारा असा एकच येतो, तो म्हणजे भाऊ. सगळ्या पहिल्या गोष्टी आपण त्याच्यासोबत करतो. मोठा असो की लहान, भाऊ हा भाऊच असतो. जगातील कितीही खडूस भाऊ असू द्या किंवा रागीट भाऊ असू द्या, पण हा भाऊ नावाचा व्यक्ती आणि नाते नेहमीच बहिणीच्या पाठीशी उभे असतात. तो आपली प्रत्येक भूमिका नेटकेपणाने निभावतो.

भावासाठी सगळ्या बहिणी सारख्या असतात, त्यामुळे तो सगळ्यांना समान प्रेम नेहमी व्यक्त करत असतो. हे सगळे भाऊ पडद्याआड राहून, सगळ्या भूमिका चोख पार पाडत असतात. पण कधी कधी त्यांची भूमिका थेट कॅमेऱ्यात कैद होते. आज आमच्याकडे एका भावाचा व्हिडीओ आला आहे. जो आपल्या लहान बहिणीबद्दल ज्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत आहे, ते पाहून तुमचं मन भरून येईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. आपल्या बहिणीसाठी आपण काही वेगळं करतोय, हे भाव त्या मुलाच्या चेहऱ्यावर नव्हते. किंवा त्याला कुणीतरी आपला व्हिडीओ काढत आहे, याचीही कल्पना नव्हती. या व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येईल की, एक लहान मुलगा आणि त्याची बहीण शाळेतून येत असतात. त्यांना रस्ता ओलांडून पलीकडे जायचे आहे. मात्र रस्त्यावर खूप पाणी असल्याने त्याच्या लहान बहिणीला पलीकडे जाणे, सहज शक्य नाही.

मग पुढे आपल्याला दिसून येईल की, हा मुलगा आपल्या लहान बहिणीला पाठीवर घेऊन पाणी साचलेला रस्ता ओलांडत आहे, जेणेकरून त्याची बहिण रस्त्यावर पडू नये किंवा तिचे कपडे, बूट ओले होऊ नयेत. बहिणीच्या खांद्यावर शाळेची दप्तरही लटकली आहे. तो यशस्वीपणे रस्ता ओलांडतो. त्याचे वय बघता असं वाटत नाही की, त्याला खूप समज असेल. पण त्याला नात्यांची समज नक्कीच आहे, हे आपल्याला लगेच कळून येते.

प्रत्येक भाऊ बहिण कितीही एकमेंकासोबत भांडले, तरी जेव्हा केव्हा दोघांपैकी एक जरी अडचणीत आला की मग स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता ते एकमेकांच्या मदतीला धावतात. मायेची ऊब देणारं हे नातं, सुंदर असं निखळ प्रेमाचं नातं असतं. बहिणीच्या मनातले भावना भावाला न सांगता कळतात. मग तो भाऊ मोठा असो वा मग चिमुकला. अशाच या गोड बहीण भावाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *