Breaking News
Home / बॉलीवुड / रस्त्यावर पुस्तके विकत असलेल्या मुलाने मागितली मदत, पहा मग जान्हवी कपूरने काय केले

रस्त्यावर पुस्तके विकत असलेल्या मुलाने मागितली मदत, पहा मग जान्हवी कपूरने काय केले

‘धडक’ चित्रपटातून पर्दापण करणाऱ्या जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ सोशिअल मीडियावर व्हायरल होत आहे. ह्या व्हिडीओला जान्हवी कपूरच्या फॅन पेजने इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहे. ज्यामध्ये एक पुस्तक विक्रेता मुलगा जान्हवीला त्याच्याकडून एक पुस्तक विकत खरेदी करण्यासाठी सांगत आहे. परंतु जान्हवीला पुस्तक घ्यायचे नव्हते म्हणून ती तिच्या गाडीच्या दिशेने जाते. परंतु तो मुलगा सुद्धा तिच्या मागोमाग गाडीपर्यंत पोहोचतो. बघा नेमकं काय घडलं होतं ते. अभिनेत्री जाह्नवी कपूरचा हा व्हिडीओ सोशिअल मीडियावर सध्या खूप चर्चेत आला आहे. यामध्ये ती एका गरीब मुलाला पैसे देतानाचे दृश्य दिसत आहे. खरंतर, रस्त्यावर पुस्तके विकणाऱ्या एका गरीब मुलाने जाह्नवी कडे पुस्तक विकत घेण्याचा हट्ट धरला. तेव्हा जाह्नवीने आपल्या कडे पुस्तक विकत घेण्यासाठी पैसे नसल्याचे विनम्रतेने त्या मुलास सांगितले. परंतु तो मुलगा तरीही हट्टास अडून राहिल्यामूळे, जाह्नवीने कोणतेही पुस्तक विकत न घेता आपल्या ड्राइवर कडून पैसे घेऊन त्या मुलाला देऊ केले.

व्हिडिओ मध्ये बारकाईने निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येते की, जाह्नवी ने गाडीत बसल्यानंतर आपली पर्स उघडून बघितली. त्या मध्ये कॅश नसल्या कारणाने सुरुवातीला तिने पुस्तक घेण्यास नकार दिला, परंतु नंतर आपल्या ड्रायव्हर कडून पैसे उधार घेऊन त्या मुलाला देऊ केले. त्या नंतर जाह्नवी चेहऱ्यावर एक स्मित हास्य घेऊन तेथून निघून गेली. त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच आनंद दिसून येत होता. भलेही जान्हवीसाठी हि गोष्ट छोटी का असेना. परंतु त्या मुलासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि हि गोष्ट आपल्या सर्वांनाही एक चांगला संदेश देऊन जाते. आपण नेहमी बॉलिवूड सेलेब्रेटींवर टीका करत राहतो. कि ते गरिबांना मदत करत नाहीत. परंतु त्यांना नावे न ठेवता आपणही स्वतःहून अश्या गरजू लोकांना मदत केली पाहिजे.

सोशिअल मिडिया वर झाली वाह वाह!

जान्हवीचा हा व्हिडीओ चर्चेत आल्यानंतर सोशिअल मिडियावरही चाहत्यांकडून जाह्नवी भरपूर स्तुती करण्यात आली. एक चाहता लिहितो, “हा श्री देवी यांच्या शिकवणीचा प्रभाव आहे. तुम्ही त्यांना भलेही नाव ठेवू शकतात, परंतु एक गोष्ट तुम्हालाही मानावीच लागेल की त्या खूप मोठ्या मनाच्या आहेत. श्रीदेवीजींनासुद्धा स्वर्गातून त्यांच्यावर गर्व वाटत असेल.” आणखी एक चाहता लिहितो, “दयाळूपणाचे कार्य कितीही छोटे असुद्यात, ते कधीच वाया जात नाही. श्रीदेवी यांनी आपल्या मुलांना हेच शिकवले असावे.” तसेच अजून एकजण लिहितो “नेहमी खुश रहा. पैसे कमावणे खूप सोपे आहे. परंतु एक चांगली व्यक्ती बनणे तितकेच कठीण.!” बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *