Breaking News
Home / जरा हटके / रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यासोबत ह्या माणसाने जे काही केले ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यासोबत ह्या माणसाने जे काही केले ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

क’रोना महामारीचं संकट आपल्या जगावर घोंगवायला सुरुवात झाली तेव्हा या संकटामुळे आपल्या आयुष्यात एवढे आमूलाग्र बदल होतील याची पुसटशी कल्पनाही आली नव्हती. या संपूर्ण काळात आपल्या सगळ्यांच्याच जीवनात कमी अधिक फरकाने बदल झाले आहेत. अर्थार्जन करण्याच्या आपल्या पद्धती बदलल्या आहेत. पूर्वी नोकरी करणारे आज स्वतःचा व्यवसाय उभारू पाहत आहेत, तर काही जण नोकरी सांभाळत सांभाळत साइड बिझनेस करता येतो का ते बघत आहेत. एकंदर काय, तर जे दीड दोन वर्षांपूर्वी होतं त्यात बराच बदल झाला आहे. पण हे तर आपल्या सारख्या माध्यमवर्गीयांचं झालं. ज्यांचं हातावर पोट आहे किंवा रोजगार नाही त्यांचं काय होत असेल. हा विचार जरी मनात आला तरी डोकं चक्रावतं. पण अशा वेळी युट्युब आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही व्हिडियोज असे बघायला मिळतात की त्यामुळे माणुसकी अजूनही जिवंत आहे आणि बरेच लोकं या गरीब आणि असाह्य जनतेसाठी चांगलं काम करताहेत हे दिसून येतं. असाच एक व्हिडियो आपल्या टीमच्या पाहण्यात आला. आजचा हा लेख त्यावरच आधारित आहे.

हा व्हिडियो आहे हेल्प देम फौंडेशनचा. काही तरुणांनी एकत्र येत ही संस्था उभारली असल्याचं त्यांच्या युट्युब चॅनेल वरून कळतं. या तरुणांचं कार्यक्षेत्र आहे रस्त्यावरील गरीब, गरजुंना मदत करणे. त्यांच्या या कामाचं डॉक्युमेंटेशन आपल्याला त्यांच्या युट्युब चॅनेलवर बघायला मिळतं. त्यातील एक व्हिडियो आपल्या पाहण्यात आला. हा व्हिडियो आहे एका गरीब माणसाचा. या तरुणांपैकी एक जण दोन गरीब गरजूंना घेऊन जवळच्या एका हॉटेल मध्ये जातो. पण त्यातील एक गरीब व्यक्ती हॉटेल मध्ये जाऊ इच्छित नसते. त्यांना भूक तर प्रचंड लागली आहे असं वागण्यावरून दिसत असतं. पण आत न येण्याचं कारण विचारलं तर पर्सनॅलिटी खराब झाली आहे असं उत्तर येतं. रस्त्यावर राहणारा माणूस इंग्रजी बोलतो हे बघून आश्चर्य वाटतं. अर्थात याचं उत्तर नंतर मिळतं म्हणा. पण त्यावेळी मात्र या गरीब माणसाला भावना अनावर झालेल्या असतात. तरुणाने जास्त प्रश्न विचारल्यावर तो थेट जायलाच निघतो. पण तरुण त्याला थोपवून धरतो. पहिल्यांदा त्याला खाऊ देतो, अजून काही पाहिजे आहे का असं विचारतो.

मग त्याची विचारपूस करतो. व्हिडियो जसा पुढे सरकतो, तसं त्या माणसाचं जेवण झालेलं दिसतं. जेवणानंतर जी तृप्त भावना काय असते हे त्याच्या चेहऱ्यावरन कळत असतं. चार दिवस भुकेला असलेल्या माणसाची क्षुधा शांती झालेली असते. आता हा तरुण त्या माणसाला घेऊन एके ठिकाणी घेऊन जातो आणि बसायला सांगतो. आपल्या सहकाऱ्याला तिथे थांबायला सांगून तो या माणसासाठी कपडे आणायला जातो. परत येतो आणि त्याला एके ठिकाणी अंघोळीसाठी घेऊन जातो. अंघोळ झाल्यावर नवीन कपडे घातल्यावर या माणसाच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी चांगला दिवस बघितल्याचे भाव असतात. पण अजून एक बाब असते जी यायची बाकी असते. हा तरुण या माणसाला दारू सोडण्याविषयी सांगतोच आणि सोबतच त्याला एक वजन काट्याचं मशीन घेऊन देतो. अर्थार्जन करण्यासाठी काही तरी साधन हवं म्हणून या तरुणाने त्याला हा वजन काटा दिलेला असतो. हा तरुण आपल्यासाठी एवढं सगळं करतो हे हे पाहून हा माणूस गलबलून जातो. काय बोलावं हे सुचत नाही. या दसरम्यान एक गोष्ट कळते की या माणसाला इंग्लिश वाचता येतं.

त्याचं एम ए पर्यंत शिक्षण झालं असल्याचं कळतं आणि आपण अवाक होऊन ऐकत राहतो. परिस्थितीने पिचलेल्या या गृहस्थाच्या आयुष्यात या तरुणाच्या रूपाने देवदूतच धावून आला असल्याची भावना त्याची असते. त्याच्या तोंडून सतत दुवा निघत असतात. आपलं मनही हेलावून जातं. व्हिडियो तसा बऱ्यापैकी मोठा आहे. पण यातील घटना आपल्याला खिळवून ठेवते. विचार करायला भाग पाडते. गरिबांना, गरजूंना आपल्या पैकी अनेक जण मदत करत असतील. पण त्यांना अर्थार्जन करण्यासाठी मदत करणारं हे उदाहरण बरंच काही शिकवून जातं. जुने जाणते म्हणतात त्या प्रमाणे भुकेल्या माणसाला केवळ अन्न देऊ नका, तर ते अन्न कसं मिळवता येईल हे शिकवा. त्याचा प्रत्यय या व्हिडियोतुन येतो. यातील तो तरुण मुलगा ज्याचं नाव पंकज आहे असं कळतं, त्याला आणि त्याच्या टीमला त्यांच्या या सकारात्मक आणि अभूतपूर्व कामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! त्यांच्या कामामुळे जो बदल घडून येतो आहे तो वाखाणण्याजोगा आहे हे नक्की.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. तसेच नेहमीप्रमाणे हा लेखही मोठया प्रमाणावर शेअर करा. आपण जेव्हा लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करता तेव्हा तेव्हा आपल्या टीमला नवनवीन विषयांवर लेख लिहिण्यास प्रोत्साहन मिळतं. या प्रोत्साहनातूनच आपली टीम उत्तमोत्तम विषय शोधून काढते आणि त्यावर लेख लिहीत असते. तेव्हा आपला हा स्नेह कायम असू द्या. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *