Breaking News
Home / ठळक बातम्या / रस्त्यावर वाघांचा मुक्तसंचार, लोकं बेफिकिर होऊन जवळून व्हिडीओ काढत होते

रस्त्यावर वाघांचा मुक्तसंचार, लोकं बेफिकिर होऊन जवळून व्हिडीओ काढत होते

वायरल व्हिडियोजच्या निमित्ताने आपण नेहमीच विविध विषयांवर अचंबित करायला लावणारे व्हिडियोज बघत असतो. या व्हिडियोज मधून अनेक वेळेस मनोरंजन होत असतं. तर काही वेळेस या व्हिडियोज मध्ये दिसणारी माणसं नक्की काय विचार करत होती असं वाटून जातं. असंच वाटायला लावणारी एक चित्रफीत माध्यमांमध्ये वायरल झाली होती. ही चित्रफीत आहे ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील. यात घडलेला प्रकार बघून यातील बघे नक्की काय विचार करत होते असं वाटल्यावाचून राहत नाही. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला अनेक दुचाकीस्वार दिसून येतात. ते सगळेच पाठी वळून पाहत काय चाललंय याचा अंदाज घेत असतात. आपलीही उत्सुकता ताणली जाते. तेवढ्यात यातील काही दुचाकीस्वार हे आपल्या दुचाकी सुरू करून पटकन निघून जातात. त्यामुळे त्यांच्या पाठी हालचाल झाली आहे याची जाणीव होते. नीट बघितलं की जाणवतं, दोन वाघ रस्त्याच्या कडेने चालत येत असतात.

एव्हाना कॅमेऱ्यासमोरील दृश्य सुद्धा बघायला मिळतं. अनेक जण चारचाकी आणि दुचाकी गाड्यांतून या वाघांच्या जोडीला पाहत असतात. जस जसे दोन्ही वाघ पुढे येत असतात, तस तसे कॅमेऱ्यामागील आणि पुढील माणसं आपल्या गाड्या मागे पुढे करत असतात. एक वेळ अशी येते की बाकी सगळे पाठी निघून येतात. फक्त एक भाऊ तेवढे दुचाकीवर बसून असतात. व्हिडियो काढत असावेत. पण आपल्या मनात कुठे तरी त्यांच्या विषयी काळजी वाटते. कारण एव्हाना वाघांची जोडी अगदी जवळ आलेली असते. मग हे दादा तसेच उलट्या पावली (चाकी) पाठी येत जातात. त्यांच्या पाठी एक बुलेट वाले दादा असतात. कॅमेऱ्यामागून कोणी एक आवाज प्रत्येकाला आवाज करू नका अशा सूचना देत असतो. या सगळ्या प्रकारात वाघ अगदी रुबाबात पुढे येत असतात. काहीसे थांबत, वेध घेत ते येत असतात. जेवढी उत्सुकता आणि भीती या उपस्थित माणसांमध्ये दिसून येते तेवढी त्यांच्यात दिसून येत नाही. सुदैवच म्हणावं लागेल. कारण त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघेही वाघ बिथरले असते तर काय झालं असतं याची केवळ कल्पना करवते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत न होता, हे दोन्ही वाघोबा आपल्या पावली जंगलात नाहीसे होतात.

हा व्हिडियो आपली जेवढी उत्कंठा वाढून ठेवतो तेवढीच चिंता सुद्धा. वाघा सारख्या हिंस्त्र श्वापदा सोबत माणसांनी एवढ्या जवळ जावं आणि तेही एवढ्या मोकळ्या वातावरणात हे योग्य नाही. अर्थात या विषयावरून तेथील प्रशासनाने काही व्यक्तींवर कार्यवाही केल्याचं कळतं. याविषयी जास्त माहिती नसल्याने आपली टीम काहीही भाष्य करू इच्छित नाही. पण झाला प्रकार यापुढे होऊ नये यासाठी सगळेच जण योग्य ती काळजी घेतील हे नक्की. आपल्या वाचकांसाठी आपली टीम सातत्याने विविध विषयांवर लेखन करत असते. यातीलच एक प्रयत्न म्हणजे हा लेख. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसेच आपण नेहमीच आमचे लेख शेअर करत असता. त्यामुळे आमच्या टीमला प्रोत्साहन मिळत राहतं. असंच प्रोत्साहन यापुढेही मिळत राहू दे ही सदिच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *