Breaking News
Home / मनोरंजन / रस्त्यावर से’ल्फी घेत असाल तर सा’वधान, बघा का’य घडलं ह्या मुलींसोबत

रस्त्यावर से’ल्फी घेत असाल तर सा’वधान, बघा का’य घडलं ह्या मुलींसोबत

सेल्फी हा प्रकार आपल्या जगात काही वर्षांपूर्वी आला आणि अगदी आपलाच झाला. त्याची व्याप्ती इतकी वाढली की डिक्शनरीत ही याला जागा मिळाली. आधी मनात आणि मग डिक्शनरीत असा प्रवास करणारा हा प्रकार आता जगण्याचा भाग झाला आहे. अनेक वेळेस हा प्रकार तापदायकही ठरतो. आपल्या पैकी ज्यांना याच्या त्रासास सामोरं जावं लागलं आहे, त्यांना आम्ही काय म्हणतो आहोत ते कळलं असेलच. अनेक वेळेस काही जण सेल्फीच्या नादात खाली पडतात आणि इतर अनेक गोष्टी. या इतर गोष्टींपैकी एक गोष्ट झाली आपल्या भारतातल्या उत्तरेकडील राज्यात. ह्याचा व्हिडियोही वायरल झाला होता. हा वायरल व्हिडियो म्हणजे एक सी.सी.टी.व्ही. फुटेज आहे. यात जवळच एखादं लग्न असावं असं वाटतं. या लग्नातील दोन मुली मंडपाच्या बाहेर येऊन एकत्र सेल्फी घेत असतात.

सी.सी. टी. व्ही. फुटेज असल्याने पुढे काय वाढून ठेवलंय असं वाटत राहतं. या मुली रस्त्यावर अंमळ जास्त पुढे पार्क केलेल्या गाडीच्या पुढ्यात उभ्या असतात. पहिल्यांदा एक गाडी या मुलींच्या समोरून जाते. मग एक टांगेवाला निघून जातो. आता एखादा अ’प’घा ‘त दिसणार की काय असा निष्कर्ष आपण काढणार, तेवढ्यात एक बाईकस्वार येतो. आपल्या डाव्या हाताने त्या मुलींच्या हातातील फोन घेतो आणि बघता बघता पसार होतो. क्षणभर कोणालाच काही कळत नाही. मग त्या मुलींपैकी एक त्या चोराच्या पाठी जाण्याचा प्रयत्न करते. पण कसचं काय. मग आरडा ओरडा केल्याने बाकीचे बाहेर येतात. त्यातील अनेकांना काय घडलंय हे कळेपर्यंत अनेक वाहनं त्यांच्या बाजूने निघून जातात आणि काही क्षणात हा व्हिडीओ संपतो. आपल्यापैकी अनेकांची अवस्था हसू की रडू अशी झाली असणार हे नक्की. पण याचा गांभीर्याने विचार केला तर आजूबाजूचं भान विसरल्याने काय होऊ शकतं याची कल्पना यावी. सेल्फी वाईट नव्हे पण सदानकदा सेल्फी घेताना स्थळकाळाचं बंधन नसणं हे कसं अंगलट येऊ शकतं हे आपण पाहिलंच.

त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अ’तिरे’क वाईटच हे केवळ लक्षात घ्यावं. या लेखातून कोणाच्याही आवडीनिवडीबाबत भाष्य करण्याचे आमच्या टीमचे प्रयोजन नाही. पण आजूबाजूस घडणाऱ्या घटनांतून आपल्याला जमेल तितके सतर्क करणे आम्हाला योग्य वाटते. तेव्हा सेल्फी घ्या आणि आनंद लुटा. पण त्यामुळे आजूबाजूचा विसर पडून स्वतः लु’टले जाल, असं काही होऊ देऊ नका. सतर्क राहा. आणि यासोबतच मराठी गप्पाचे नियमित वाचकसुद्धा व्हा आणि नवनवीन लेखांची मेजवानी अनुभवा. आमच्या वे’बसाईटला बु’कमार्क करा आणि मित्रमंडळींसमवेत शे’अर करायला विसरू नका. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *