Breaking News
Home / मनोरंजन / राजपाल यादवने शूटिंग संपल्यावर सेटवरच केला अतरंगी डान्स, डान्स पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

राजपाल यादवने शूटिंग संपल्यावर सेटवरच केला अतरंगी डान्स, डान्स पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

आपल्या सगळ्यांना मनोरंजन क्षेत्र अतिशय आवडतं. त्यातील विविध कलाकृती अगदी आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात. त्यामुळे या क्षेत्राविषयी एकप्रकारच आकर्षण असतं. या आकर्षणातून आपण अनेक वेळेस बिहाइंड द सीन्स बघत असतो. कॅमेऱ्यामागे कलाकारांची जी मजा चाललेली असते ती बघणं, एखादा सिन कसा शूट होतो हे बघणं हे आपल्याला आवडतं. ही आपली आवड लक्षात घेऊनच आपली टीम सुद्धा असे व्हिडियोज मिळाले तर त्याविषयी लिहीत असते. आज आपल्या टीमला असाच एक व्हिडियो सापडला आहे. चला त्याविषयी जाणून घेऊयात. हा व्हिडियो आहे एका सिनेमाच्या गाण्याच्या शूटचा. या सिनेमाचं नाव हंगामा २ असं आहे. हा सिनेमा काही काळापूर्वीच प्रदर्शित झाला होता. यातून प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन आणि प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी पुन्हा एकदा अनेक वर्षांनी बॉलिवूडमधील एखाद्या सिनेमात काम केलं होतं. तसेच सोबत परेश रावल, मिझान जाफरी, प्रणिता सुभाष आणि राजपाल यादव हे नावाजलेले कलाकार होते.

यातील मिझान जाफरी आणि राजपाल यादव यांच्यावर लग्नातील काही सिन चित्रित झाले होते. या शूटिंग दरम्यान एका टेकच्या वेळी राजपाल यांनी जो डान्स केला त्याचा हा वायरल व्हिडियो आहे. व्हिडियो सूरु होतो तेव्हा आपल्याला सगळे कलाकार एकत्र उभे असलेले दिसतात. त्यात मिझान आणि राजपाल हे मध्यभागी असतात. बाकीची मंडळी अर्धगोलाकार उभी असतात. क्यू मिळतो आणि गाणं सुरू होतं. एकदा गाणं सुरू झालं की मग राजपाल यांचं जे धमाल मस्ती करण सुरू होतं त्यास तोड नाही. मिझान पण जवळच असतो. पण राजपाल असे काही सुटलेले असतात की आपल्यासकट सगळ्यांचं लक्ष फक्त त्यांच्यावर असतं. सुरुवात होते तेव्हा ते दारू पिऊन नाचल्याचा अभिनय करतात. त्यामुळे या डान्सचा एक टोन सेट होतो ज्यातून आता पुढे धमाल येणार हे आपल्याला कळलेलं असतं. ते होतं न होतं तोच राजपाल मस्तपैकी ठुमके मारत नाचायला सुरुवात करतात. जवळच असलेले बाकीचे कलाकार सुद्धा ठुमके मारत नाचण्याचा प्रयत्न करत असतात पण राजपाल यांची सर त्यांना येत नाही.

राजपाल हे एव्हाना त्या गाण्यात एवढे घुसलेले असतात की अंगातला ब्लेझर काढून तो कधी गरागरा फिरवत नाचतात ते कदाचित त्यांनाही कळत नाही. याच कारण पुढच्या काही स्टेप्स मध्ये तो ब्लेझर त्यांच्या पायाखाली येतो पण त्यांचं लक्ष कुठे असतं. ते डान्समध्ये एकदम मश्गुल झालेले असतात. एवढे मश्गुल की मिझानच्या कडेवर जाऊन बसतात आणि हात हलवत नाचायला लागतात. एव्हाना सगळ्या सेटवर जबरदस्त चैतन्य पसरलेलं असतं. सगळेच जण एकदम उत्साहाने भारलेले असतात. खरंच एखादं लग्न चालू आहे आणि कोणाचा तरी डान्स रंगात आलाय असच वाटत असतं. राजपाल यांच्या स्टेप्स तर एकापेक्षा एक होत असतात. आता त्यांना येऊन मिझान ही मस्त मस्त स्टेप्स करू लागतो. पण या संपूर्ण व्हिडियोत निर्विवादपणे लक्ष राहतं ते राजपाल यांच्यावर. डान्स संपत आलेला असताना ही त्यांनी लोळत केलेला नागीण डान्स भाव खाऊन जातो. हा डान्स रंगात आलेला असतानाच हा व्हिडियो संपतो.

पण असं असलं तरी जो काही आपण या व्हिडियोतून या डान्सचा भाग बघतो तो बघून आपण जबरदस्त आनंद घेतलेला असतो. आपल्या टीमला तर हा उर्जावान डान्स परफॉर्मन्स आवडला. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याही पसंतीस पडला असेलच. तसेच आपल्याला या विषयावर आमच्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. कारण आपल्या प्रतिक्रियांतून आम्ही शिकत असतो आणि आम्हाला प्रोत्साहन ही मिळत असतं. यातूनच मग आपल्याला भावणारे उत्तमोत्तम लेख तयार होत असतात. तेव्हा आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट बघतो आहोत. आपल्यात आणि आमच्यात जे या लेखांमुळे स्नेहबंध तयार झाले आहेत ते यापुढेही वाढत जावेत ही सदिच्छा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *