अक्षय कुमार आजच्या घडीला बॉलिवूडचा सर्वात टॉपचा सुपरस्टार आहे. त्याचे वर्षाला किमान ३ ते ४ चित्रपट येत असतात आणि त्यातले जवळजवळ सर्वच चित्रपट सुपरहिट ठरत आहेत. आता येणाऱ्या ‘हाउसफुल ४’ बद्दल सुद्धा खूपच चर्चा चालू आहे. तो बॉलिवूडचा सर्वात जास्त फी घेणारा अभिनेता आहे. २०१९ मध्ये तो जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सेलेब्रेटींमध्ये चौथ्या क्रमांकाचा सेलेब्रेटी ठरला. परंतु बॉलिवूडमध्ये स्वतःची जागा बनवण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली आहे. अक्षय कुमारला आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूपच रिजेक्शन सहन करावे लागले. एकेवेळी तर त्याचाच सासर्यांनी म्हणजेच राजेश खन्नांनी त्याला चित्रपटात घेण्यास नकार दिला होता. तर आजच्या लेखात आम्ही सांगणार आहोत कि केव्हा अक्षय कुमारला ह्या चित्रपटासाठी रिजेक्ट केले गेले, का ह्या चित्रपटात त्याला घेतले नव्हते आणि कश्याप्रकारे ज्या मुलाला आपल्या चित्रपटात घेतले नव्हते त्या मुलाला राजेश खन्नांनी मुलगी दिली.
हि गोष्ट आहे १९९० सालची, त्याकाळी राजेश खन्ना आपल्या एका सुपरहिट गाण्यावर चित्रपट बनवत होते त्या चित्रपटाचे नाव होते ‘जय शिवशंकर’. ह्या चित्रपटाला स्वतः राजेश खन्ना प्रोड्युस करत होते. ह्या चित्रपटात राजेश खन्ना व्यतिरिक्त जितेंद्र, पूनम ढिल्लो आणि डिम्पल कपाडिया सुद्धा होती. चित्रपटाच्या इतर भूमिकेसाठी ऑडिशन्स चालू होत्या. अश्याच एक ऑडिशन्स साठी अक्षय कुमार डिम्पल कपाडियाच्या ऑफिसमध्ये गेला. तिथे त्याने आपले ऑडिशन पूर्ण केले. ह्यानंतर तो काही वेळ डिम्पल कपाडियासोबत थांबला आणि तिच्यासोबत गप्पागोष्टी करू लागला, जेणेकरून काही काम मिळेल. जेव्हा डिम्पल कपाडियासोबत गप्पा मारल्या तेव्हा अक्षय कुमारने डिम्पल कपाडिया ह्यांना राजेश खन्ना ह्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा डिम्पल कपाडिया ह्यांनी अक्षय कुमारला नाराज केले नाही आणि सांगितले कि ह्यावेळी तर ते व्यस्त आहेत. परंतु जेव्हा त्यांना वेळ असेल तेव्हा तुला त्यांच्याशी नक्की भेट करून देईल.
ऑडिशन संपल्यानंतर डिम्पल कपाडिया ह्यांनी अक्षय कुमारचे ऑडिशन राजेश खन्ना ह्यांना दाखवले तेव्हा राजेश खन्ना ह्यांना ते ऑडिशन आवडले नाही. त्यांना वाटले कि ह्या भूमिकेसाठी अक्षय कुमार योग्य नाही आहे. ह्यामुळे त्यांनी त्यावेळी अक्षय कुमारला रिजेक्ट केले. ह्यानंतर त्याच्या जागी अश्या अभिनेत्याला घेतले गेले जो त्याकाळी स्टार होता. तो अभिनेता म्हणजे चंकी पांडे. ‘जय शिवशंकर’ चित्रपट पूर्ण बनून तयार होता. परंतु हा चित्रपट कधीच रिलीज होऊ शकला नाही. हा चित्रपट राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडियाचा पहिला आणि शेवटचा एकत्र चित्रपट होता, परंतु जनता त्यांना एकत्र कधी पाहूच शकली नाही कारण हा चित्रपट रिलीजच होऊ शकला नाही. ह्या चित्रपटातून रिजेक्ट झाल्यानंतर अक्षय कुमारने आपला संघर्ष चालूच ठेवला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने स्वतःचे एक वेगळे स्थान बनवले आणि एक वेळ अशी आली जेव्हा त्याची राजेश खन्ना ह्यांची मुलगी ट्विंकल खन्ना हिच्याशी भेट झाली. दोघांच्या भेटी वाढल्या. दोघांमध्ये हळूहळू प्रेम झाले आणि २००१ मध्ये अक्षय कुमारने ट्विंकल खन्ना सोबत लग्न केले. तो अक्षय कुमार ज्याला राजेश खन्नांनी आपल्या चित्रपटात घेतले नव्हते, त्याला आपली मुलगी दिली होती. आजच्या घडीला अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या जोडीला बॉलिवूडची एक आदर्श जोडी मानली जाते.