रानू मंडल गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत राहिली आहे. ‘एक प्यार का नगमा’ हे गीत तिने गायले होते, जे खूप लवकर लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांना हिमेश रेशमिया यांनी स्वतःच्या चित्रपटातील तीन गाणी गायची संधी दिली. एक गाणं प्रदर्शित झाल्यानंतर हिट सुद्धा झाले.आता रानू मंडल कोणत्या सेलिब्रिटीपेक्षा काही कमी नाहीये. एक सामान्य जीवन जगणारी व्यक्ती अचानक स्टार झाल्यावर अनेक न्यूज चॅनेल्सने त्यांना डोक्यावर घेतलं. टीआरपी साठी रात्रंदिवस त्यांच्या बातम्या. त्यात काही खोट्या बातम्यासुद्धा पसरू लागल्या. त्यानंतर, त्यांबद्दलं इंडस्ट्री मधे आल्यानंतर रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. त्यातली एक गोष्ट म्हणजे सलमान खानने त्यांना 55 लाख रुपयांचा घर भेट दिलं आहे. सर्वांनी या गोष्टीला खरे मानले, कारण रानू मंडल कडून काही प्रतिक्रिया आल्या नव्हत्या.
नंतर त्यांच्या मैनेजर अतिंद्र चक्रवर्ती यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. आता मैनेजर नंतर रानू मंडलने सुद्धा काही गोष्टी स्पष्ट केल्या, एनबीटीला दिलेल्या इंटरव्यू मधे रानू म्हणाल्या की, सलमान खानने मला कोणतेही घर भेट म्हणून दिलं नाही. जर त्यांनी मला घर दिले असते, तर सगळ्यांसमोर बोलले असते. रानूचं म्हणंन आहे की, तिनेही घर देण्याबाबतची गोष्ट ऐकली होती पण विश्वास ठेवला नाही. जर स्वतः सलमान खाननी ही गोष्ट सांगितली असती, तर कदाचित तिने विश्वास ठेवला असता. रानूला जेव्हा विचारलं गेलं की, ती सलमान खानला तिच्या सोबत काम करायला विनवणी करेल का? त्यावर तिने साफ नकार दिला आणि म्हणाली की तिने आजवर ना कोणाची मदत घेतली ना कधी घेणार . हिमेश ने तिला एक संधी दिली. जे गाणं तिने गायलं ते हिट गेलं व लोकांनाही खूप आवडलं आणि भावलं . यासाठी ती नेहमी हिमेशची आभारी आहे आणि यापुढेही असेल.
काही दिवसांअगोदर लता मंगेशकरांना एका इंटरव्ह्यू दरम्यान रानू मंडल बद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले होते कि, ” जर माझे नाव आणि कामावरून कुणाचं भलं होत असेल तर मी स्वतःला नशीबवान समजते. परंतु माझं हे सुद्धा मानणं आहे कि नकल करून मिळवलेलं यश जास्त दिवस टिकू शकत नाही.” ह्याबद्दल रानू मंडलला लता मंगेशकर ह्यांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या. “मी लताजींच्या वयोमानाने लहान आहे आणि पुढे जाऊन सुद्धा राहणार. मला लहानपणापासून त्यांचा आवाज आवडतो.”