Breaking News
Home / मनोरंजन / राणू मंडल चक्क नववधूच्या अवतारात, कच्चा बदाम गाण्याची नक्कल करून वेधलं सर्वांचं लक्ष

राणू मंडल चक्क नववधूच्या अवतारात, कच्चा बदाम गाण्याची नक्कल करून वेधलं सर्वांचं लक्ष

इंटरनेट सेन्सेशन ठरलेली राणू मंडल ही आता जगात व्हायरल होणारी गोष्ट आहे. तिला कुठलेही गाणं गायला सांगा सुरात सांगा नाहीतर बेसूरात सांगा. ती व्हायरल होणार. एकेकाळी लोकांनी दया दाखवली म्हणून तिला सगळ्यांनी डोक्यावर उचलून घेतले होते. पण प्रसिद्धीचा अतिरेक आणि पाय जमिनीवर न राहिल्यानं तिला लोकांनी उचलून आपटलयंं. आता राणू मंडलं काय करतेयं तर जो व्हायरल होईल त्याचं गाणं स्वतः गात आणखी व्हायरल व्हायचा प्रयत्न. राणू मंडलचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये ती पूर्ण पणे नवरीच्या पोशाखात दिसतेंयं. होय, होय, तुम्ही ते अगदी बरोबर वाचले आहे. ती नवरीचे कपडे घालून तिनं लग्न तर केलं नाहीयं. पण त्या बाईनं व्हायरल होण्यासाठी आता नवी शक्कल लढवलीयं. फेसबुक आणि यूट्यूबवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, रानू मंडल लाल साडी आणि दागिन्यांमध्ये बंगाली वधूच्या रूपात दिसत आहे. तसेच, ती व्हायरल बंगाली गाणे ‘कच्चा बदाम’ गाताना दिसत आहे.

पश्चिम बंगालमधील भुवन बाड्याकर या शेंगदाणे विक्रेत्याचे गाणे काही दिवसांपूर्वी ऑनलाइन ट्रेंड करत होते. याच गाण्याची नक्कल करत त्यांनी ‘कच्चा बदाम’ हे गाणे आपल्या आवाजात गायलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रानू मंडल वधूच्या पेहरावात कच्च बदाम हेच गाणं गाताना दिसून येतेंयं. हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या व्हिडिओने सोशल मीडियावरील वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. कधी काळी एक प्यार का नगमा है म्हणणारी राणू मंडल आता रातोरात स्टार बनली आहे. अगदी गायक आणि संगीत दिग्दर्शकाने त्यांच्या ‘हॅपी हार्डी अँड हीर’ या चित्रपटासाठी त्यांना संधी मिळाली होती.

आता चित्रपट रिलीज झाला की नाही, त्याचं पुढं काय झालं याबद्दल काहीही कळलेलं नाही. मात्र, चित्रपटाच्या गाण्यापेक्षा राणू मंडलचं हे रुप पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागलं. तिच्या पेहरावामुळं काही लोकं तिचे कौतुक करत आहेत तर काही लोकं तिला पुन्हा एकदा ट्रोल करू लागले. तिला पुन्हा एकदा काय हा प्रकार म्हणून डिवचू लागलेयंत.

आता हे नवं सोंग घेतलंयं का, असं म्हणत राणू मंडलनं अगदी तिच्या सगळ्या गोष्टींना ट्रोल केलं जाऊ लागलं आहे. काही लोकांनी तर राणू मंडलला सवाल विचारला आहे. की आता आणखी किती पैसे कमावून प्रसिद्ध होणार. राणू मंडलला आता दोनच गोष्टींसाठी कास्ट केलं जाऊ शकतं एकतर बिग बॉस आणि दुसरं कंगना रणौतचं लॉकअप पण तिथं काय होईल याची कल्पना न केलेलीच आपण कधीही बरी. तोपर्यंत राणू मंडलचं हे बेसूरं कच्चा बदाम ऐका तिच्या भडक मेकअप कडं बघायला हिम्मत होत नसली तरीही बघून सोडून द्या जास्त लोड घ्यायला जाऊ नका. आयुष्यात देव सगळ्याला कमी जास्त देऊ शकतो. कधी कुणाची लायकी नसताना जास्त देतो तर लायकी असल्यांना उशीरानं देतो पण देतो जरूर. चील मारा आणि मूळचं कच्चा बदाम गाणं ऐका राणू मंडल काय आणखी कोणीही येऊदेत आपल्याला किंमत फक्त द्यायची आहे ती म्हणजे खऱ्या टॅलेंटला हे विसरू नका. राणू मंडलला फेमस करणारा भेटला ना तर त्याच्या जाहीर सत्कार केला पाहिजे. हा व्हीडिओ बघून तुम्हाला काय वाटतंंय ते आम्हाला कळवायला विसरु नका.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *