Breaking News
Home / मराठी तडका / ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेची शूटिंग अश्याप्रकारे होते, बघा सेटवरचे फोटोज

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेची शूटिंग अश्याप्रकारे होते, बघा सेटवरचे फोटोज

आजपर्यंत मराठी मालिकाविश्वात अनेक मालिकांनी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं. प्रेक्षकांचं मनोरंजन करत करत त्या लोकप्रिय ठरल्या. पण या सगळ्या मालिकांतील आजची अतिशय लोकप्रिय मालिका कोणती, असं विचारलं असता सहज उत्तर येतं – ‘रात्रीस खेळ चाले’. कारण या मालिकेच्या दोन्ही पर्वांनी तुफान लोकप्रियता मिळवली हे आपण अनुभवलंच. या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाच्या आगमनाने ही बाब अजून ठळकपणे जाणवते. मराठी गप्पाच्या टीमला तर विशेष. कारण आम्ही मागच्या दोन आठवड्यात सायंकीत कामत आणि भाग्या नायर यांच्या विषयी जे लेख लिहिले त्यातून आम्हाला ही लोकप्रियता विशेष करून जाणवली, इतका उत्तम प्रतिसाद मिळाला. मग आता पुन्हा काय लिहायचं असा विचार असताना मालिकेतील कथानक आता अण्णा नाईकांचा वाडा विकण्याकडे झुकलेले दिसते. मग ठरलं की या वाडयाविषयी आणि पर्यायाने सेट विषयी थोडं लिहू.

तर आपल्या सगळ्यांना निदान ही कल्पना तरी आहेच की हा सेट आहे तो कोकणात. या मालिकेतील व्यक्तिरेखांप्रमाणे या वाड्याची स्वतंत्र अशी ओळख आहे, एक व्यक्तिरेखा आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. सावंतवाडी आणि कुडाळ यांच्या दरम्यान असणाऱ्या आकरी या जागेजवळ हा सेट असल्याचं कळतं. सेट म्हणजे एक खराखुरा वाडाच आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. आपण या सेट वर येताना आपल्याला एक पाटी दिसते. रात्रीस खेळ चाले चं शूटिंग पाहायला येणाऱ्या चाहत्यांनी रहदारीच्या रस्त्यावर गर्दी करू नये, जेणेकरून ग्रामस्थांना वाहतुकीस अडथळा येऊ नये अशा आशयाची ही पाटी. मागे एकदा एका लेखात प्रेक्षक या सेट वर कलाकारांना भेटायला आवर्जून येतात, हे सांगितलं होतं याची यावेळी आठवण झाली. पुढे थोडं चालत गेलं की हा वाडा आपल्याला दिसतो. एकमजली पण टुमदार वाडा पाहताच क्षणी आपल्याला आवडतो. यात अण्णांचा लाडका झोपाळा सुद्धा आपल्या दृष्टीस पडतो. शूटिंग चालू असताना आत जाता येत नाही.

पण वर उल्लेख केल्याप्रमाणे हा खरा खुरा वाडा असल्याने आतील बऱ्याचश्या गोष्टी अगदी खऱ्या वाड्यातीलच असल्याचं दिसून येतं. बाहेर पडल्यावर आजूबाजूचा परिसर अगदी प्रसन्न वाटतो, निसर्गाने नटलेला. अर्थात थोडी भी’ती वाटते जेव्हा आपण अण्णांच्या विहिरीकडे जातो. गंमतीचा भाग सोडला तर विहीरीचं बांधकाम ही अगदी पक्कं असल्याचं जाणवतं. तिथूनच दिसते ती अण्णांची पहिल्या मजल्यावरची खिडकी. एरवी निसर्गाच्या सानिध्यात नटलेली ही जागा रात्रीस खेळ चाले सारख्या थरारक मालिकेसाठी ही योग्य ठरु शकते असा ज्यांनी विचार केला आणि हे लोकेशन ज्यांनी शोधून काढलं त्यांच्या कल्पकतेचं कौतुक. त्यांच्या कल्पक दृष्टीसाठी त्यांना मानाचा मुजरा.

सध्या मालिकेचं तिसरं पर्व सुरू झालं असलं तरी त्यात अगदी पहिल्या दिवसापासूनच रंजकता निर्माण झाली आहे. खासकरून अण्णा नाईकांचा हा वाडा विकायला निघालेली सुशल्या, इतर पात्र आणि त्यांना विरोध करणारी इंदू यातील संघर्ष जसा रंजकता निर्माण करतो, तसाच अण्णा आणि शेवंता यांचा मृ’त्यूनंतर ही त्यांचा वाड्यातला संचार मग तो इतरांच्या अंगात शिरून का होईना पण प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. या वाड्यात आणि सेटवरील इतर जागांत जिवंतपणा निर्माण करण्याचं काम ही कलाकार मंडळी आणि तंत्रज्ञ आपल्या कामाने करत असतात. त्यांच्या मेहनतीमुळे या वास्तुचे स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व ठळकपणे दिसून येते. या मालिकेविषयी, त्यातील कलाकारांविषयी आणि सेटविषयी बोलावं तेवढं थोडंच. या लेखाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या या मालिकेच्या संपूर्ण टीमला या तिसऱ्या पर्वानिमित्त पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!!

या लेखाप्रमाणेच आमच्या टीमने अन्य लेखही लिहिले आहेत. आपण त्यांचाही आस्वाद घ्या. तसेच नेहमीप्रमाणे हे सगळे लेख जेव्हा जेव्हा वाचाल तेव्हा शेअर करायला विसरू नका. मराठी मुलांच्या या टीमला आपल्याकडून या सहकार्याची अपेक्षा आहे. आपल्या वेळेसाठी आम्हाला सातत्याने प्रोत्साहन देत राहण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!! आम्ही सोबत एक व्हिडीओसुद्धा देत आहोत नक्की पाहून घ्या.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *