Breaking News
Home / मराठी तडका / रात्रीस खेळ चाले मालिकेतील अभिराम खऱ्या आयुष्यात क’सा आहे, बघा अभिरामची जीवनकहाणी

रात्रीस खेळ चाले मालिकेतील अभिराम खऱ्या आयुष्यात क’सा आहे, बघा अभिरामची जीवनकहाणी

‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका टीव्ही विश्वात दाखल होऊन काही वर्षे झाली. या काळात या मालिकेची लोकप्रियता ही नेहमीच वाढत राहिलेली आहे. त्याचमुळे जेव्हा या मालिकेचा दुसरं पर्व संपलं तेव्हा आपण चाहते म्हणून हळहळलो होतो. पण आपल्यात काही दिवसांपासून पुन्हा एकदा उत्साह संचारला जेव्हा या मालिकेचं तिसरं पर्व दाखल झालं. आता तर काय आपल्या सगळ्यांमध्ये या मालिकेत घडणाऱ्या प्रत्येक भागाची खमंग चर्चा होत असते. यात अनेक नवीन कलाकार आपल्याला दिसून येतात तसेच अनेक जुने कलाकारही पुन्हा आलेले दिसून येतात. आज याच जुन्या संचातील एका कलाकाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या कलाकाराचं नाव आहे, सायंकीत कामत. होय, आज आपण अभिराम ही व्यक्तिरेखा साकार करणाऱ्या सायंकीत बद्दल जाणून घेऊयात.

सायंकीत हा मूळचा गोवेकर. प्रत्येक गोवेकराप्रणाने वृत्तीने कलंदर. तसेच कलाक्षेत्रात काम करावं अशी त्याची तीव्र इच्छा होतीच. त्यासाठी त्याने पुणं गाठलं. पुण्यनगरीत अनेक कलाकार येतात आणि आपली कारकीर्द घडवतात. या काळात सायंकीत याने ललित कला केंद्रातून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. अनेक एकांकिकांमधनं त्याने स्वतःतील अभिनेत्याला पैलू पाडले. या अनुभवाचा वापर त्याला पुढे त्याच्या अनेक कलाकृतींतून करता आला. त्याने अभिनित केलेली नाट्यकृती म्हणजे ह्या ‘गोजिरवाण्या घरात’. या नाटकातील त्याची भूमिका गाजली. तसेच त्याने मिरांडा हाऊस या सिनेमातही अभिनय केलला आहे. मिलिंद गुणाजी आणि पल्लवी सुभाष या मात्तबर कलाकारांसोबत त्याने या सिनेमात अभिनय केला. नाटक, सिनेमा यांसोबत तो गाजला तो रात्रीस खेळ चाले या मालिकेतील भूमिकेसाठी.

त्याची अजून एक गाजलेली मालिका आपल्याला आठवत असेलंच. ‘तुझं माझं ब्रेकअप’ ही ती मालिका. यातील त्याची समीर ही व्यक्तिरेखाही गाजली. प्रेक्षकपसंतीस उतरली. या माध्यमांसोबतच त्याने वेब सिरीज या नवमाध्यमातही उल्लेखनीय असं काम केलेलं आहे. ‘अपने तो लग गये’, ‘naxalबाडी’ या त्याची भूमिका असलेल्या वेब सिरीज. एकूणच काय तर कलाक्षेत्रातील जवळपास प्रत्येक माध्यमातून त्याने अभिनयाचा अनुभव एकत्र केलेला आहे. अतिशय कमी काळात त्याने केलेली प्रगती ही नक्कीच स्पृहणीय ठरते. अशा या उदयोन्मुख कलाकाराला त्याच्या भावी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !!! त्याच्याकडून येत्या काळात अजून उत्तमोत्तम काम प्रेक्षकांना पाहायला मिळेल हे नक्की.

(फोटोत – अभिनेता सयांकितचा अभिनेत्री मीरा जोशीसोबत ‘तुझं माझं ब्रेकअप’ सीरिअल दरम्यानचा फोटो)

आपण मराठी गप्पाचे केवळ वाचकच नाहीत तर आधारस्तंभ आहात. आपल्याकडून येणाऱ्या विविध सूचना, नवनवीन विषय यांवर आपली टीम सातत्याने काम करत असते. त्यातूनच विविध लेख जन्माला येत असतात. आपणही त्यांना सतत शेअर करत असता. जसा की हा लेखही शेअर कराल. आपल्या या भरभक्कम पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.