Breaking News
Home / मराठी तडका / ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेत अभीरामच्या बायकोची भूमिका निभावणारी हि अभिनेत्री नक्की आहे तरी को’ण

‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेत अभीरामच्या बायकोची भूमिका निभावणारी हि अभिनेत्री नक्की आहे तरी को’ण

गेल्या काही दिवसांपासून ‘अण्णा नाईक परत येणार?’ या टॅगलाईनने सगळ्यांची उत्सुकता वाढवली होती. त्यात ‘रात्रीस खेळ चाले ३’ चे कल्पक प्रोमोज दाखल झाले आणि ही उत्सुकता शिगेला पोहोचली आणि आता मालिका सुरू झाल्यावर या मालिकेतील विविध व्यक्तिरेखांविषयी चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. पहिल्या दोन भागांतील काही व्यक्तिरेखा आपल्याला पुन्हा या भागातही आलेल्या दिसताहेत. तर काही नवीन व्यक्तिरेखाही दाखल होताना दिसतात. यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे अभिरामची बायको. एक सुपरिचित चेहरा यानिमित्ताने आपल्याला मालिकेतून पदार्पण करताना दिसतो आहे. मालिकेतील ही व्यक्तिरेखा साकार करणारी अभिनेत्री म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी भाग्या नायर. भाग्या हिला आपण itsuch या युट्यु’ब चॅनेल वरील वेबसिरीज मधील भूमिकांतून वारंवार पाहिलं आहे.

itsuch हे चॅनेल आणि त्यांच्या वेबसिरीज जशा लोकप्रिय आहेत त्याचप्रमाणे यातील कलाकार सुदधा. भाग्या ही या कालाकारांपैकी एक मुख्य कलाकार. भाग्या हिला अभिनयाची आवड पहिल्यापासून. तिने महाविद्यालयीन काळात अनेक एकांकिका स्पर्धांतून स्वतःतील अभिनेत्रीला पैलू पाडले. तिचा सहभाग असलेल्या अनेक एकांकिकांनी पारितोषिकं ही पटकावली आहेत. सुंदरी, दादाची रक्षण सेना, उत्खनन या तिची भूमिका असलेल्या काही नाट्यकृती. यापैकी सुंदरी या नाटकातील तिच्या भूमिकेसाठी तिला पारितोषिकही मिळालेलं आहे. रंगभूमीवर वावरत असताना तिने नवमाध्यम असणाऱ्या वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म्स मध्येही काम केलेलं आहे. वर तिने अभिनित केलेल्या वेबसिरीज चा उल्लेख झालाच. तसेच तिने क्षणिक ही हिंदी शॉर्ट फिल्मही केलेली आहे. त्यात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकार केली होती. तसेच itsuch च्या who’s next या शॉर्ट फिल्म मध्येही काम केलं होतं. एका अतिशय संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या शॉर्ट फिल्मचा १४ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलं आहे.

अभिनयासोबतच भाग्या ही उत्तम नृत्यांगना ही आहे. तिने भरतनाट्यम चे प्रशिक्षण घेतलेले आहे. तसेच तिने अनेक उत्तम ब्रँड्स साठी मॉडेलिंग केलेलं आहे. महाविद्यालयीन जीवनात कलाक्षेत्रासोबतच भाग्या ही खेळातही अग्रेसर होती. आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी भाग्या ही ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत दाखल होणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुखद धक्काच. आजतागायत आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकणारी भाग्या या मालिकेतही उत्तम अभिनय साकार करत तिची व्यक्तिरेखा संस्मरणीय करेल हे नक्की. तिच्या या मालिका क्षेत्रातील पदर्पणासाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! हा लेख वाचून तर झालाय, आता शेअर ही करा मंडळी. आणि हो, आपल्या टीमने ना, अनेक उत्तमोत्तम लेख लिहिले आहेत. त्यांनाही वाचायला आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *