आपण सर्वजण लहानपणीच्या सुखी कालावधीतून गेलो आहोत. बालपणाच्या दिवसांमध्ये आपण रविवार पर्यंत वाट बघायचो. रविवारची प्रतीक्षा घरी विश्रांती साठी नव्हे तर, अन्य कारणांमुळे केली जायची. या दिवसाची लोक उत्सुकतेने वाट बघायचे, जेणेकरून ते एकत्र बसून रामायण पाहू शकतील. रामायण काळात, जेव्हा घरातला विद्युत पुरवठा अचानक बंद व्हायचा, तेव्हा आपण त्या घरांकडे पळायचो, जिथे वीज येत होती. आपल्या सर्वांना रामायणचे चरित्र अगदी तोंडपाठ आहे. ९० च्या दशकात १९८७ मध्ये रामायणाची सुरुवात झाली होती. रामायनाणे हिंदुस्थानियांच्या हृदयात एक वेगळीच छाप सोडली होती, जी आजवर कायम आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा रामायण सुरू व्हायचे, तेव्हा रस्ते आगदि सामसूम होऊन जायचे, जसे भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान घडते.
‘रामानंद सागर’ यांच्या रामायणाबद्दल विशेष गोष्ट अशी होती कि, रामायणमधील सर्व वर्णांनी भारतीय लोकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. त्यांच्यापैकीच चरित्र वर्ण होते ‘आई सीताचे’. असे म्हटले जाते की, सीताच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री ‘दीपिका चिखलिया’ ला लोक खरच आई सीता समजू लागले होते. जेव्हा लोक त्यांना भेटायचे, तेव्हा लोक त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेण्यास सुरुवात करू लागले होते. त्या काळातील ‘दीपिका’ सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. तीने ‘आई सीताची’ चोख भूमिका निभावली. ती या भूमिकेत अशा पद्धतीने रूरळी गेली, जसे कि हि भूमिका खास तिच्यासाठीच होती. दीपिकाने सीताची भूमिका आपल्या अभिनयासह जिवंत केली होती. अनेक लोकांच्या मनात आजवर, दीपिकाची प्रतिमा सीता म्हणूनच राहिली आहे.
त्यावेळेसचे पंतप्रधान ‘राजीव गांधी’ यांनीदेखील दीपिकाला आपल्या कामगिरीबद्दल सन्मानित केले होते. रामायण या मालिकेतून दीपिकाला इतके यश मिळेल, याचा तिने विचारही केला नसेल. पण मालिका संपल्यानंतर, दीपिका कुठे तरी हरवूनच गेली होती. रामायणानंतर दीपिका कुठेच दिसली नाही. पण ती अदृश्य झाली नसून तिचा विवाह झाला. दीपिका ने कॉस्मेटिक कंपनीचे मालक ‘हेमंत टोपीवाला’ यांच्याशी लग्न केले. आता दीपिका याच कंपनीच्या संशोधन आणि मार्केटिंग टीमची हाताळणी करते. दीपिकाच्या दोन मुली आहेत, ज्यांचे नाव ‘निधी’ आणि ‘जुही’ असे आहे. नुकत्याच आलेल्या एका बातमी नुसार, दीपिका तिच्या लहान पडद्यावरील अभिनयानंतर बॉलीवुड चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर आपले आगमन करणार आहे. अहवालाच्या मते, या चित्रपटाचे नाव ‘गालिब’ असेल आणि ते अफजल गुरूचे पुत्र ‘गालिब गुरु’ यांच्या जीवनावर आधारित असेल. हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होत आहे.