Breaking News
Home / राशिभविष्य / राशीनुसार कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस, ४ सप्टेंबर २०१९

राशीनुसार कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस, ४ सप्टेंबर २०१९

मेष : मेष वाल्यांसाठी आजच्या दिवशी ग्रहांचा परिणाम तुमच्यावर कसा असणार आहे पहा. तुमच्यासाठी आजचा दिवस भाग्यवान असणार आहे. मेषवाल्यांसाठी आजचा दिवस प्रेम आणि उत्साहपूर्ण असणार आहे. कुटुंबासोबत चांगले क्षण अनुभवाल. मान सन्मानात वाढ होईल. नवीन वस्त्रांची खरेदी करू शकाल. कार्यक्षेत्रात चांगले अनुभव मिळतील. काही अपूर्ण कामे पूर्ण होत असल्याचे सुख मिळेल. सेल्स आणि मार्केटिंगशी निगडित असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. भाग्य ९८ टक्के पर्यंत साथ देईल.

वृषभ: वृषभ राशीमध्ये आजारी असलेल्या लोकांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवेल. आज सकाळपासूनच मड ऍक्टिव्ह असेल. प्रतिस्पर्धी अथवा शत्रूंवर विजय मिळवाल. अपूर्ण कामे आज पूर्ण होऊ शकतात. घरासाठी काही खरेदी सुद्धा करू शकता. बेपर्वा होऊ नका. जखम होण्याची शक्यता आहे. ७५ टक्के पर्यंत भाग्य तुमचे साथ देईल.

कर्क : प्रकृती अस्थिर असणार, मन गोंधळलेले असणार. आजच्या दिवशी महत्वपूर्ण निर्णय टाळणेच योग्य राहील. संयम ठेवला नाहीत तर घरचे वातावरण बिघडू शकतात. दूरच्या नातेवाईकांसोबत भेट अथवा बोलणं होऊ शकतं. नोकरी किंवा व्यवसायासंबंधी वृद्धीसाठी मित्रांशी चर्चा कराल. पैश्यांच्या व्यवहारासंबंधी सावध राहा. नशीब ५९ टक्के साथ देईल.

 

मिथुन : आज तुम्ही कल्पनांच्या विश्वात रमणार. अर्थहीन गोष्टी डोक्यात येऊन मनाची चलबिचल वाढेल. परंतु लेखक किंवा कला क्षेत्रांसंबंधित लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. कल्पनाविस्तार वाढेल. वाणी वरून लाभ उठवू शकाल. बुद्धिचर्चेत भाग घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. भाग्य ६९ टक्के पर्यंत साथ देईल.

सिंह : तुमची एखादी चिंता दूर झाल्यामुळे आज तुम्हाला आराम मिळेल आणि स्वतःला प्रसन्न अनुभवाल. बुद्धी आणि कार्यक्षमतेत तुमची कामे होतील. आर्थिक स्थिती अनुकूल राहील. घरासंबधी सामान खरेदी साठी योजना बनवाल. मुलांच्या शिक्षणासंबंधीत गोष्टींपासून चिंतीत राहू शकता. भाग्य ८० टक्के पर्यंत साथ देईल.

कन्या : आजची ग्रहदशा तुम्हाला पैश्याच्या व्यवहारात सावधानता बाळगण्याचा सल्ला देत आहे. नकारात्मक विचारांना मनात जागा देऊ नका. कामात मन लागणार नाही. थकवा आल्यासारखे जाणवाल. मनावर संयम ठेवा नाहीतर बजेट बिगडू शकते. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. नशीब ५० टक्के साथ देईल.

तूळ : दिवसाची सुरुवात चांगली असेल. जीवनसाथीच्या व्यवहाराने आनंदित व्हाल. प्रकृती चांगली असेल ज्यामुळे उत्साहपूर्ण कामे होतील. भागीदारीच्या कामामध्ये फायदा होईल. कलात्मक विषयात तुमचे प्रदर्शन चांगले राहील. विद्यार्थ्यांची अभ्यासात ओढ राहील. नोकरी इंटरव्हू मध्ये यश मिळेल. भाग्य ९२ टक्के साथ देत आहे.

वृश्चिक : आज थकवा आणि सुस्त असल्याचे वाटेल. मानसिक स्तिथी अस्थिर राहील. जमल्यास महत्वपूर्ण निर्णय घेणे आज टाळा. आज आर्थिक व्यवहारात बेपर्वा होऊ नका. उधाराची देवाण घेवाण करू नका. प्रवासादरम्यान समस्या होऊ शकते. ध्यान योग करणे लाभदायक ठरेल. नशीब ५१ टक्के साथ देईल.

धनु : आजचा दिवस उत्साहपूर्ण असणार आहे. व्यवसायात लाभ आणि नोकरीत प्रगती होईल. कुठूनही धनलाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनातील सुखात वाढ होईल. प्रेमसंबंधातील चालू असलेले मतभेद दूर होऊ शकतात. व्यायसायिक भागेदारीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. भाग्य ८६ टक्क्यांपर्यंत साथ देईल.

मकर : आज तुम्ही प्रत्येक कामात यश मिळवाल. नोकरीत उच्च पदाधिकारी खुश राहतील. पद प्रतिष्टेत वाढ होईल. कामानिमित्त प्रवास होऊ शकेल. रुचकर भोजन मिळल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी यश लाभेल. भाग्य ९३ टक्के साथ देईल.

कुंभ : धार्मिक किंवा मंगल कार्यात व्यस्त राहू शकता. भाग्य उजळण्याचे प्रबळ योग आहेत. मित्र आणि संबंधित लोकांचा सहवास लाभेल. सरकारी क्षेत्रात रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक क्षेत्रात केलेला प्रयत्न सफल ठरू शकतो. उधारी दिलेले धन मिळू शकते. भाग्य ८४ टक्के सोबत असेल.

मीन : आज ग्रहदशा तुमच्या अनुकूल नसेल. प्रकृती अस्थिर असेल. मनाची चलबिचल असेल. जखम होण्याची शक्यता आहे. जोखीम पत्करू नका. प्रिय व्यक्ती सोबत मतभेद होऊ शकतात. कार्यक्षेत्रात परिश्रमाच्या दृष्टीने खूप कमी लाभ मिळेल. भाग्य ६२ टक्के सोबत असेल.
– ज्योतिषी आशुतोष वार्ष्णेय

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.