Breaking News
Home / मराठी तडका / रिंकू ठरली मराठीतली सर्वात महागडी अभिनेत्री, मेकअप चित्रपटासाठी घेतले तब्बल इतके मानधन

रिंकू ठरली मराठीतली सर्वात महागडी अभिनेत्री, मेकअप चित्रपटासाठी घेतले तब्बल इतके मानधन

‘सैराट’ चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. ह्या चित्रपटाने तब्बल १०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर हा चित्रपट लोकप्रिय झाला. ह्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक रेकॉर्ड्स तोडले. चित्रपटांप्रमाणेच ह्या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक सुद्धा खूप लोकप्रिय झाले. त्यातील सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली ती म्हणजे परश्या म्हणजेच आकाश ठोकर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू. रिंकूला सैराट साठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. रिंकूची प्रसिद्धी हळूहळू आकाशच्या प्रसिद्धीपेक्षा वाढत गेली. तिला अनेक शो मध्ये बोलावण्यात आले. सैराटच्या लोकप्रियतेमुळे तिला सैराटचा कन्नड रिमेक चित्रपटामध्ये सुद्धा ऑफर आली. त्यानंतर रिंकूने ‘कागर’ ह्या मराठी चित्रपटांत काम केले. ह्या चित्रपटाला सैराट इतके यश मिळाले नसले तरी ‘कागर’ चित्रपटातील रिंकूच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ह्यामुळे रिंकूचा भाव देखील चांगलाच वधारला आहे.

रिंकूचा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर झाला होता. मराठीतला सुपरहिट चित्रपट अगोदरच आपल्या नावे असलेल्या रिंकूची दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकप्रियता पाहून अनेक चित्रपटांची ऑफर्स तिला येत आहेत. रिंकूचा चित्रपट असला म्हणजे मीडियावाले सुद्धा तिच्या चित्रपटांना खूप प्रसिद्धी देतात. त्यामुळे आपसूकच चित्रपटाचे प्रमोशन होऊन जाते. रिंकूची लोकप्रियता, तिचे ग्लॅमर आणि तिच्या चित्रपटांना मिळणारी प्रसिद्धी ह्यामुळे, रिंकूने आपल्या चित्रपटात काम करावे ह्यासाठी चित्रपट निर्माते सुद्धा धडपड करत आहेत. रिंकूची लोकप्रियता पाहता चित्रपट निर्माते सुद्धा तिला हवी ती रक्कम द्यायला तयार आहेत. अश्यातच तिला ‘मेकअप’ ह्या मराठी चित्रपटाची ऑफर आली. ह्या चित्रपटासाठी रिंकूला जी फीस देण्यात आली आहे. ती आजपर्यंत मराठी अभिनेत्रीला मिळालेली सर्वात मोठी रक्कम असल्याचे बोलले जात आहे. तिच्या मानधनात जबरदस्त वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत आपण सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर ह्यांना चित्रपटासाठी चांगले मानधन मिळाल्याचे ऐकले होते. सध्याच्या आघाडीच्या ह्या नायिका एका चित्रपटासाठी साधारण १५ लाख रुपये घेतात.

परंतु रिंकू ह्या सर्वांना मागे टाकत मराठीतली महागडी अभिनेत्री ठरली आहे. रिंकूला तिच्या आगामी ‘मेकअप’ चित्रपटासाठी तब्बल २७ लाख रुपये इतके मानधन देण्यात आलेले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या नवख्या अभिनेत्रीला एखाद्या चित्रपटासाठी इतकी भरघोस रक्कम मिळाल्याची हि पहिलीच वेळ. ह्या चित्रपटाचा टिझर अगोदरच प्रेदर्शित झालेला असून ह्या टीझरमध्ये ती मद्य पिऊन शिव्या देतानाही दिसत आहे. ह्या चित्रपटात ती गावाकडच्या तरुणीची भूमिका साकारत आहे. सैराट चित्रपटाला ३ वर्षे होऊनही ह्या चित्रपटातील कलाकारांचे स्टारडम अजून कमी झालेले नाही. सैराटच्या वेळी रिंकू नववीत शिकत होती. आता ती बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. रिंकूने एक अभिनेत्री म्हणून कमी कालावधीतच स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटामुळे तिला जे प्रसिद्धीचे वलय मिळाले ते क्वचितच कोणत्या मराठी अभिनेत्रीला मिळाले असेल. ह्यामुळेच रिंकूने आपल्या मानधनात इतकी भरघोस वाढ केली आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *