बॉलिवूडमध्ये सध्या जवळजवळ एकाच धाटणीचे चित्रपट बनत आहेत. त्यात सुद्धा आता रिमेक चित्रपटांचा बोलबाला आहे. क्वचितच असे चित्रपट येतात जे प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. बॉलिवूडच्या ह्याच धर्तीवर आता वेगळ्या धाटणीचा चित्रपट येण्यास सज्ज आहे. एक व्हिलन चित्रपट हिट ठरल्यानंतर पुन्हा एकदा रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा हि जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज झाले आहेत. एका पोस्टर मध्ये रितेश तर दुसऱ्या पोस्टर मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा. आणि दोन्ही पोस्टर मध्ये त्यांच्यासोबत रावणाची प्रतिमा दिसत आहे. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा रघु राम नावाच्या रागीट व्यक्तीचा रोल करत आहे. तर रितेश देशमुख विष्णू नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. हे पात्र भगवान विष्णूच्या पाचवे अवतार वामन रुपावरुन प्रेरित आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘एक व्हिलन’ चित्रपटानंतर रितेश देशमुख पुन्हा एकदा सिद्धार्थच्या विरुद्ध निगेटिव्ह रोल मध्ये दिसणार आहे.
ह्या चित्रपटात रितेश देशमुख ह्यास खास भूमिका दिलेली आहे. रितेश एका साडेतीन फूट उंचीच्या ठेंगण्या व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा एक हलका फुलका रोमँटिक ड्रामा चित्रपट असणार आहे. आता चित्रपटाचा पहिला लूक आला आहे आणि हा खूपच वेगळा आहे. सिद्धार्थ मल्होत्राने एका बटुक रुपी रितेश देशमुखच्या पहिल्या लूकचे पोस्टर टाकले आणि लिहिले, “प्रत्येक गोष्टीची उंची सांगायची तुला शौक आहे ना? आज माहिती पडेल बदला घेण्याची उंची काय असते ते. मरजावा २२ नोव्हेंबर २०१९ ला रिलीज होणार आहे.” ह्याअगोदर, रितेशच्या बटुक आकाराच्या खलनायकी भूमिकेवर, मिलाप जव्हेरी ह्यांनी सांगितले कि, “रितेशची खलनायकी भूमिका पहिल्या पेक्षा खूप छान आहे. मी त्याला उंचीने छोटे करून भूमिका चांगली करण्याचा निर्णय घेतला. जरी तो बुटका आहे पण त्याचे चरित्र जीवनापेक्षा मोठे आहे. त्याचे अजब हसणं, महान पंच लाईन्स आणि काही चित्रविचित्र चेहर्यामुळे त्याचे पात्र खूप दृष्ट वाटत आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार रितेशने ह्या रोलसाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याने त्याच्या रोलसाठी वर्कशॉप अटेंड केले होते आणि ह्यासाठी खास ट्रेनिंग सुद्धा घेतली होती. रितेशच्या अगोदर कमल हसन ह्यांनी अप्पू राजा तर शाहरुखने फॅन चित्रपटात बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारलेली होती. आणि ह्या दोन्ही भूमिका लोकप्रिय ठरल्या होत्या. आता पाहूया रितेशची जादू कितपर्यंत चालते ती. चित्रपटात ह्या दोघांव्यतिरिक्त रकुल प्रीत सिंह आणि तारा सुतारिया ह्या अभिनेत्री लीड रोल करणार आहेत. रकुलने ने अजय देवगण आणि तब्बू सोबत ‘दे दे प्यार दे’ चित्रपटात काम केले होते. तर ताराने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ दि इअर’ चित्रपटातून डेब्यू केले होते. ह्यांच्या व्यतिरिक्त शाद रंधावा (आवारापन, आशिकी २ ) आणि भोजपुरी सुपरस्टार रवी किशन ह्यांच्या सुद्धा चित्रपटात भूमिका असणार आहेत. मरजावा हा चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज होणार होता. परंतु व्हीएफएक्स वर अजून काम चालू असल्यामुळे त्यासाठी अजून वेळ लागणार आहे. त्यामुळे हा चित्रपट आता २२ नोव्हेंबर २०१९ ला रिलीज होणार आहे. हा चित्रपट निखिल अडवाणी आणि टी-सिरीज ह्यांनी प्रोड्युस केला असून मिलाप जव्हेरी ह्यांनी दिग्दर्शन केले आहे.