रुग्नवाहीकेचे महत्त्व आणि गरज आपल्या सर्वांनाच माहित आहे. ही आपत्कालीन आरोग्य सेवेच्या माध्यमातून लोकांची जीव वाचवते. आपण जेव्हाहि रस्त्यावर कोणती रुग्नवाहीका बघतो. तेव्हा मनात भीती वाटते की कोणीतरी व्यक्ती गंभीर स्तिथीत आहे. लोक शक्य असेल तसा रस्ता मोकळा करतात आणि त्या व्यक्तीचा जीव वाचो, अशी प्रार्थना करतात. रस्त्यावर धावणारी ही गाडी लोकांच लक्ष आकर्षित करते. जेणेकरून समोरचा रस्ता मोकळा होईल. अश्या काही कारणांमुळे रुग्नवाहीकेवर ‘AMBULANCE’ हा शब्द उलटा लिहिलेला असतो. आज आम्ही तुम्हाला या मागची कारणे प्रमुख सांगणार आहोत. रुग्नवाहीकेच्या समोर आपण नेहमीच ‘एम्बुलेंस’ हा शब्द उलट्या अक्षरात लिहिलेला पहिला असेल. यामगिल उद्देश म्हणजे समोर चालणारया वाहनाच्या चालकाला मागुन येणार्या वाहनावरील अक्षर नीट दिसेल. आरश्यात बघितल्यावर सगळ उलटे दिसते, त्यामुळे रुग्नवाहीकेवर अक्षरे उलटी लिहलेली असतात. जेणेकरुण समोरील वाहानातील व्यक्ति ते वाचू शकेल आणि मागुन येणाऱ्या रुग्नवाहीकेला पुढे जाण्यासाठी रास्ता मोकळा करून देईल.
लोकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी वापरली जाणारी काही पद्धति. चला आपण जाणून घेऊया -ह्या ख़ास पद्धति सोबतच लोकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रिक सायरन, फ्लशिंग लाईट, स्पीकर, रेडिओ फोन आणि अन्य साधने वापरली जातात. जेणेकरून रस्त्यावरील लोक रुग्नवाहीकेसाठी रस्ता सोडतील. सुरुवातीच्यात रुग्नवाहीकेमधे फक्त घंटाच्या उपयोग केला जात असे. त्यानंतर सायरनचा वापरू जाऊ लागले. सायरन हवेच्या दाबावर चालत असे. आजकाल हेलेन इलेक्ट्रिक सायरन चा वापर केला जातो.
गडद रंग वेधते लक्ष -रुग्नवाहीकेला सगळ्या वाहणापासून वेगळे ,दिसण्याचा हेतू साफ असतो. हि गाडी वेगळी दिसली म्हणजे लोक हि गाडी लवकर ओळखतील आणि गाडीस पुढे जाण्यास रस्ता देतील. रुग्नवाहीका वेगळी दिसण्यासाठी तिला चमकदार रंग दिला जातो. मग तो रंग कोणताही असू शकतो, असे महत्वाचे नाही कि रंग फक्त लाल आणि निळाच असायला हवा. पिवळी, हिरवी, नारंगी आणि दुसर्या रंगाची रुग्नवाहीकासुद्धा दिसतात. याचा उद्देश फक्त एवढाच की लोक ह्या गाड्या लवकर ओळखून जाण्यास रस्ता मोकळा करतील. रुग्नवाहीका फक्त मोटारगाडी मधे नसते तर विमान, हेलीकॉप्टरपासून घोडागाडी, मोटारसायकल मध्येसुद्धा असते.